या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. ११९ म्हणेन भुवनत्रयीं तरि तुला 'भला मैद' मी ॥ ४३ होय. हा श्लेष तीन प्रकारचा आहे:-१ प्रकृतानेकार्थविषयक, २ अप्रकृतानेकार्थविषयक व ३ प्रकृताप्रकृतानेकार्थविषयक. वरील तिन्ही यांचीच क्रमाने उदाहरणे आहेत. पहिल्या उदाहरणांत स्तवनीयत्वाने प्रकृत अशा शिवविष्णूंचे वर्णन आहे म्हणून तो प्रकृतश्लेष. शरण=१ रक्षण, २ रक्षक. देवो माधव=१ देव उमाधव, २ (पक्षी) माधव (विष्णु) [सुशरण] देवो. अचला=१ गोवर्धन पर्वतास, पृथ्वीस, (पक्षी)२ स्थिर. सुरवाहिनी=१ देवसेना, २ भागीरथी. दुसऱ्या उदाहरणांत 'जलज' म्हणजे 'कमळ' आणि 'चंद्र' ही दोन्हीही उपमानेच असल्यामुळे अप्रकृत असून त्यांचे वर्णन आहे म्हणून तो अप्रकृत श्लेष होय. हरिणे संयुत=१ हरिणाने संयुत, २(हरिने) सूर्याने युक्त. तिसऱ्यांत वाहिनीपाळ म्हणजे १ समुद्र आणि २ सेनापति. त्यांत रणांगणामध्ये शस्त्रप्रहारांनी ज्यांचें कीलाल म्ह. रक्त वर उडत आहे अशा प्रकृत सेनापतीचे तसेंच कीलाल म्हणजे जळ ज्यांत फार उसळते त्या अप्रकृत समुद्राचेही वर्णन आले आहे म्हणून हा 'प्रकृताप्रकृत श्रेष' जाणावा'. (अ.वि.) गोवर्धनपर्वत फार जड असून तो तुम्ही उचलला म्हणून तुमची कीर्ति झाली, मी (मोरोपंत) देखील जड (मूर्ख, पापी) आहे व कर्दमी(पापरूपी चिखलांत) रुतलेला आहे, म्हणून ज्याप्रमाणे गोवर्धनधारण तुम्ही एकट्याने केले, त्याचप्रमाणे माझा उद्धार इतर देवांच्या साहाय्याशिवाय जर तुम्ही केलात, तर त्यांत तुमची फार मोठी कीर्ति होईल. पंतांची श्लेषयोजनाः-पंतांना जरि श्लेपचमत्काराची म्हणण्यासारखी गोडी नव्हती, तरी त्यांनी आपल्या काव्यांत मधून मधून श्लेषयोजना केलेली आढळते. जेथे जेथे शेष आले आहेत तेथे तेथे ते सहज रीतीने येण्याजोगे असून त्यांत ओढाताण मुळीच दिसून येत नाही. फिरून कांही नेमक्या शब्दांवरच, त्यांनी श्लेपयोजना केलेली आढळते; हा सर्व प्रकार येथून तेथून साधा, सरळ, सरस आणि हृदयंगम आहे. याची काही उदाहरणे पुरवणींत दिली आहेत ती पहावी ६. चिखलांत. पापरूपी चिखलांत. कर्दम चिखल. [ निपद्वरस्तु जम्बाल: पंकोऽस्त्री शादकर्दमौ' इत्यमरः । चिखलाला पांच शब्द संस्कृतांत आहेत, निषद्वर, जम्वाल, पंक, शाद आणि कर्दम.] या कर्दमी-या कर्दमापासून या भवतापापासून. येथे भवताप' पदाचें निगरण करून त्याचे प्रतिद्वंद्वि में 'कर्दम' पद त्याने बोध केला आहे. तसेंच कवि (आपण) पदाचें निगरण करून त्याजबद्दल 'जड पद ठेविलें आहे, म्हणून येथें रूपकातिशयोनि झाली आहे. १. 'भला मर्द' अशी तुझी स्तुति करीन. २. हुशार, बहादूर, पराक्रमी. हा शब्द फारशी आहे. पापरूपी चिखलांतून जड अशा मला जर देवा! तुम्हीं बाहेर काढले तर मात्र तुम्ही बहाद्दर खरे, नाही तर गोवर्धनधारणादि आपले सर्व पराक्रम मी व्यर्थ समजेन. 'रामप्रार्थनादशकां'तील पुढील श्लोक पहा:-'तुझ्या प्रतापें आम्हांतें या काळी जरि पाळिलें । तरी सांभाळिलें सर्व यश नातरि वाळिलें ॥' तूं जर मला या कर्दमापासन उचलशील, तर तुला मी मर्द म्हणेन, अमुक झाले तर अमुक होईल अशा अर्थाचे वर्णन आहे म्हणून हा संभावनालंकार होय. जेथे एखादी गोष्ट सिद्ध करण्यासारी 'असे असते तर असे झाले असते,' असा तर्क (कल्पना) केला असतो तेथे हा अलं.