या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत 820 Phapician heal thepelb मोरोपंतकृत चिकित्सक 'भला भला' म्हणुनि फार वाखाणिला; जरी बहुजनामयद्रुम समूळही खाणिला, । तथापि अतिदुःसहस्वगदशत्रुच्या अंत्यया विना, न हृदयीं धरी सरुज पामर प्रत्यया. ॥ कार होतो. 'संभावनं यदीत्थं स्यादित्यूहोऽन्यस्य सिद्धये । यदि शेषो भवेद्वक्ता कथिताः स्युर्गुणास्तव' (कुवलयानंद). व्यंग्यार्थसिद्धिकरितां कल्पन संभावना कवि म्हणेल । वक्ता सहस्रमुख होइल तरिच विभो! तुझे गुण स्तविल (श्रीविप्र०). याची उदाहरणे:-(१) आत्याबाईला मिशा असल्या तर काका म्हटले असते. (२) मी जर चतुर्मुख होईन तर विष्णूला वर्णीन. (३) मी जर पुरंदर (सहस्रनेत्र) असतो तर हे सुंदरि! तुझें अंगसौंदर्य पाहतों. (४) तेज तुम्हां असतें तरि उरता हाणोनि न विट लातेला । अहितायुला न पीता ? तेजस्वी दीप न विटला तेला. ॥ [मोरोपंत-विराटपर्व-अ० १ गी० १०१] १. धन्वंतरी, वैद्य. (प्रास्ताविक):-'हजारों पाप्यांचा उद्धार परमेश्वराने केला असला तरी माझा उद्धार होईपर्यंत मी परमेश्वराचे गुणानुवाद गाणार नाहीं (शाबासकी देणार । नाही). याबद्दल कवि व्यावहारिक दृष्टांत देऊन स्वोद्धारासाठी प्रार्थना करतात. [कोणी] चिकित्सक 'भला भला' म्हणुनि [लोकांनी जरी] फार वाखाणिला, [आणि त्याने] जरी बहुजनामयगुम समूळही खाणिला, तथापि अतिदुःसहस्वगदशत्रुच्या अत्ययाविना सरुज पामर हृदयीं प्रत्यय न धरी-असा अन्वय. २. बहु (पुष्कळ)+जन (लोक)+ आमय (रोग, व्याधि, गद)+द्रुम (झाड). रोगव्याधिगदामयाः' इत्यमरः. ३. मूळासकट, पाळांमूळांसह. 'समूळ' हे क्रियाविशेषण अव्यय समजावें. 'ही' समुच्चयार्थक अव्यय जाणावें. ४. खणून काढिला, नाहींसा केला. रोगाचें मूळ खणून काढिले. पुष्कळ लोकांचे रोग त्याने जरि निःशेष बरे केले असले. ५. अति (अत्यंत)+दुःसह (सहन करण्यास अशक्य)+स्वगद (आपले रोग) [हेच+शत्रू त्यांच्या. ६. नाशावांचून. दुसऱ्याचे सर्व रोग बरे केले असले तरी आपल्या अंगांतील असह्य रोग त्याने बरे केल्याशिवाय रोग्याला धन्वंतऱ्याच्या हुषारीबद्दल विश्वास येत नाही. ७. स (सह)+रुज् (रोग)=रोगी. रोगपीडित [रुज्=रोग, स्त्री रुग्रुजाचोपताप' इत्यमरः]. ८. साधारण मनुष्य. नीच, बुद्धिमंद. ९. विश्वासाला. केकार्थः-एखाद्या वैद्यविद्याविशारद धन्वंतन्याने हजारों लोकांचे दुःसह रोग बरे करून सर्वत्र वाहवा मिळविली असली तरी ज्याप्रमाणे एखाद्या शुद्ध मनुष्याला आपल्या अंगांतील कठीण रोग त्याने बरा केल्याशिवाय त्याच्या विद्येची खात्री वाटत नाही, त्याप्रमाणे जोपर्यंत देवा! तुम्ही उद्धार करित नाही तोपर्यंत हजारों पाप्यांचा उद्धार केला असला तरी त्याबद्दल माझी खात्री पटत नाही, म्हणून माझा उद्धार करून आपल्या दयालुत्वाविषयी माझा उडणारा विश्वास स्थिर करा. येथें दृष्टांत अलंकार झाला आहे. प्रकृत विशेषार्थाच्या पुष्टीसाठी अप्रकृत अर्थाचा दाखला त्यास दृष्टांत ह्मणतात. के० ४ वरील टीपा पहा. उदाहरणः-(१) 'अक्षज्ञ नसोनि भरी भरला व हारविला । पडतां गांठ गतश्री होय शशी दोष काय हा रविला' (उद्योगपर्व). हे ही केका संस्कृतशब्दप्रचुर आहे.