या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ मोरोपंतकृत दिसे क्षणिक सर्व हे भरंवसा घेडीचा कसे असून त्यांचा आराध्यदेव राम होता ह्मणून 'मयूर' व 'राम' ह्या शब्दांवर त्यांनी पुष्कळ स्थळी श्लेषयोजना केली आहे. याची थोडी उदाहरणे:-(१) 'दयामृतघन श्रीमान् कृष्ण लक्ष्मीपती हरी । करी भक्त मयूरातें सुखी हृत्ताप संहरी' ॥ (कृष्णविजय अ०५७ श्लो० ६१), (२) 'वनद प्रभुवर, मोरचि भक्तगण वदान्यतेसि पार नसे' ॥ (मंत्रमय भागवत), (३) 'प्रभुनें दिली द्विजानन-रस-पाकांतील गोड वेद-वडी । भक्त मयूरातीतें, प्रभुघन गातांचि गोडवे, दवडी' ॥ ६८ ।। (गोपीगोडवा), (४) 'राम दयाघन भक्तमयूर प्रियहित सर्वहि करितो । दर्शन देउनि में बहु दुःसह तें तापत्रय हरितो' १०७ (ध्रुवचरित्र), (५) 'राम दयाघन जीवनदाता सदुदार दास ते मोर' । (साधुस्तव ८), (६) 'भक्तमयूर सुखविले सर्वहि करुणाघने घनश्यामें । पूरितसंश्रितकामें श्रीरामें पुण्यकीर्तिच्या धामें' ३१२ (अवतारमाला), (७) 'श्रीराम सरस मुदिर, जे भक्त सकळ नर मोर । साकेत असें प्रिय तसें प्रभुदृष्टिस न रमोर'॥ ८३ (दोहारामायण), (८) 'रामघन सत्प्रसादामृत जो जो बहु वळोनि वर्पतसे । तों तो भक्तमयूर ) स्वार्या केका करूनि हर्षतसे' ।। ३७ (विराटपर्व अ० ७) [बहिन्=मोर. 'मयूरो बर्हिणो वहीं नीलकंठो भुजंगभुक्' इत्यमरः।] व्यु:-बह (मोराचें पीस) ज्याला आहे तो बीं। वर्हमस्त्यस्येति वहीं. । 'फलबहींभ्यामिनन्' (वा० ५।२।१२५ या आधाराने फली आणि वहीं हे शब्द झाले आहेत). 'भजकबर्हिमेघा!' हे संबोधनपद 'उताविळा' या दोपास गुण का मानिले याचे कारण दाखविते, म्हणून हा काव्यलिंग अलंकार जाणावा. केका ८ पृ० ३०, टी० २ पहा. १. क्षणभंगुर, क्षणध्वंसी, थोडा वेळ टिकणारे. २. सर्व दृश्यमान जगत् किंवा मनुप्याचें जीवित हे फार थोडा वेळ टिकणारे आहे:-मनुष्याच्या जीविताची परिमिति जरी शत वर्षे आहे तरी त्यांपैकी त्याच्या वाट्यास येणारी फारच थोडी वर्षे असतात. शिवाय मध्यंतरी अशी कित्येक आकस्मिक कारणे उद्भवतात की त्यामुळे मनुप्याला केव्हां मरण येईल याचा काही नेम नसतो. तसेंच हे भासमान जगत् केवढे जरी अवाढव्य दिसले तरी निरवधि कालाच्या कितव्या सहस्रांश किंवा लक्षांश भागांत तें नष्ट होईल याचा नेम नसल्यामुळे तेंही क्षणिकच समजले पाहिजे. तसेंच मनुष्यजीवित म्हटले म्हणजे दुःखपरंपरा मोजण्याचे एक घड्याळच होय. यांत तुकारामाने म्हटल्याप्रमाणे 'सुख पाहातां जवापाडें । दुःख पर्वताएवढे ॥' अशी वस्तुस्थिति आहे. म्हणून सांपडेल त्या वेळांत भगवचिंतन करून परमार्थसाधन करून घ्यावे. या संबंधाने पुढील उतारे वाचावेः-देहाची क्षणभंगुरताः(१) तडित्सु शरदपु गंधर्वनगरेषु च । स्थैर्य येन विनिर्णीतं स विश्वसितु विग्रहे ॥ [योगवासिष्ठ] अर्थ:-विद्युल्लतेचे ठायीं, शरदृतूंतील अभ्राचे ठिकाणी व गंधर्वनगराचे ठिकाणी स्थिरपणाचा निश्चय ज्याने केला असेल तो या क्षणभंगुर देहाचे ठिकाणी स्थिरपणाचा विश्वास धरो. (२) आयुनश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षणं यौवनं प्रत्यायांति गताः पुनर्न दिवसाः कालो जगद्भक्षक: भास्तीयतरंगभंगचपला विद्यच्चलं जीवितं तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना ।। चाय पाहता पाहतां आयुष्य प्रत्येक दिवशीं जात आहे; तारुण्य क्षणभंगुर आहे; गेले