या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०) दर पढून मग संस्कृत काव्ये, नाटकें, व अलंकारशास्त्र वगैरे ग्रंथांचे अध्ययन केले. न्याय व वेदांत ग्रंथांचेही त्यांनी थोडेबहुत परिशीलन केले होते. पंतांनी आपणास शिकावयास किंवा वाचावयास लागणारे चाळीस ग्रंथ स्वतः हातांनी लिहिले असून काही इतरांकडून लिहून घेतले आहेत असे त्यांच्या पंढरपुरच्या दप्तरावरून दिसतं. बहुतेक ग्रंथांच्या शेवटी संवत्सर, मास, तिथि, यांचा निर्देश असून गुरु, पिता व आपण स्वतः इतक्यांच्या नांवाचा उल्लेख केलेला आढळतो. पुढील ग्रंथ पंतांनी खुद्द लिहिले आहेतः- १ रघुवंश (इ. स. १७५०). २ नैषधोदय, ३ अनर्थ्यराघव सटीक (१७५२), ४ चित्तप्रबोध (१७५४), ५ वाणीभूषण (१७५६) हा ग्रंथ मुंगीसारख्या अगदी वारिक अक्षरांनी लिहिला आहे], ६ प्रबोधचंद्रोदय (१७५८), ७ रसमंजरी, ८ राघवपांडवीय काव्य, ९ रसतरंगिणी, १० पंचदशी (१७६०), ११ षट्पदी टीका, १२ कुवलयानंद (१७६१), १३ विक्रमोर्वशीय (१७६५), १४ पार्वतीपरिणय, १५ काव्यप्रकाश (१७६७), १६ नरहरिकृत समश्लोकी (१७७३), १७ मालविकाग्निमित्र (१७७८), १८ भगवन्नाम कौमुदीटीका, १९ रामकृष्णकाव्य, २० वेदांतसारतत्वदीपिका, २१ अधिकरणरत्नमाला, २२ विद्वन्मोदतरंगिणी, २३ रसमंजरीटीका, २४ हनूमन्नाटक, २५ शाकुंतल, २६ मत्स्यनीति, २७ जैमिनीकृत कुशलवोपाख्यान, २८ नागानंद, २९ बृहदारण्य, ३० दशावतारखंडप्रशस्ती, इत्यादि. या शिवाय १ भामिनीविलास, २ ज्ञानेश्वरी, ३ भट्टीकाव्य, ४ कुमारसंभव, ५ छायाभिधा रसमीमांसाव्याख्या, ६ वसंततिलक भाण, ७ नेमिनिर्वाण इत्यादि ग्रंथ दुसऱ्याकडून लिहून घेतले आहेत. पंत फार जलद लिहित. भारतचंपू नांवाचा एक मोठा संस्कृत ग्रंथ त्यांनी कोल्हापुरास दुसरा गृहस्थ सावकाश वाचित असतांना एकीकडे वसून भराभर लिहून काढला असे सांगतात. यावरून पंतांनी काव्यनाटकांचा व अलंकारशास्त्राचा चांगलाच व्यासंग केला होता व कालिदासादि महाकवींची काव्ये व नाटके त्यांच्या उत्तम परिचयाची होती हे दिसून येते. पंचमहाकाव्यांचा व नाटकांचा पंतांस कितपत परिचय होता या प्रश्नाचे यावरून चांगलेच समाधान होतें (केकावली पृ० २१८-२२० पहा). त्यांना पुढे पुराण सांगावें लागत असल्यामुळे व भारतभागवतरामायण हे ग्रंथ, व विष्णुपुराण, माकडेय पुराण इत्यादि पुराणांचे काही भाग त्यांनी महाराष्ट्र भाषेतच रचिले असल्यामुळे मूळ ग्रंथाशी त्यांचा उत्कृष्ट परिचय असावा हे स्पष्ट होते. वरील हकिकतीवरून पंत पन्हाळगडी पाध्यांकडे शिकत असतांना त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम उपयोग केला व गुरुकृपेस स्वतःस पात्र केले असें दिसून येते. पाध्ये व पंत या उभयतांमधील प्रेस आमरण कायम राहिले. पुढे वारामतीस गेल्यावर पंत नवीन काव्ये रचिलीं ह्मणजे प्रथम गुरूकडे पाठवित. त्यांनी पसंत करून दुरुस्त केल्यावर मग दुसऱ्यांस वाचावयास देत. मधून मधून ते पन्हाळ्यासही भेटीकरितां जात असत. संस्कृत ग्रंथांचे पंतांनी चांगले अध्ययन केले होते ह्मणून त्यांचे प्राकृत ग्रंथाकडे दुर्लक्ष नव्हते. ज्ञानेश्वरी, परमामृत या जुनाट ग्रंथांशी त्यांचा परिचय असून एकनाथ, नामदेव, रामदास, वामनपंडित, तुकाराम यांच्या ग्रंथांचे परिलिन त्याना लक्ष्यपूर्वक केले. प्रसिद्ध नाझरेकर श्रीधरकवि हे त्यांच्या जन्माच्या फक्त एकच वर्ष अगोदर मृत्यु पावले. त्यांचे 'विजय, 'प्रताप', 'लीलामृतादि' ग्रंथ व त्यांचे