या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ मोरोपंतकृत अवश्य करणे खरें प्रणतरक्षण स्वोचित; असे मला कळते. ह्या वेळेस तुजवांचून माझें साहाय्य करणारा दुसरा कोणी बलिष्ट वीर दिसत नाही, तर अजूनही जर मी स्वोद्धाराविषयी अधीर झालों नाही तर मग मी मृत्युमुखी पडलोंच ह्मणून समजावें. काळाने माझा गळा कापल्यावर म्हणजे मी मृत्युमुखी पडल्यावर मग माझा उद्धार कसा होणार? यास्तव सत्वर धांवत येऊन मृत्यु येण्यापूर्वी मजवर प्रसन्न होऊन माझा उद्धार करा. मृत्यु केव्हां येईल याचा मुळीच नेम नाहीं-असा श्लोकार्थ. 'या केकेंत कवीने आपल्या वार्धक्यावस्थेचे प्रतिरूपक फार सुंदर रीतीने दाखविले आहे. यमराजाच्या सेनेच्या शुभ्र पताकेचे प्रथम दर्शन आणि वार्धक्यावस्थेत शुभ्र केसांचे प्रथम दर्शन या उपमानोपमेय धर्माची तुल्यता, तसेंच रोगाच्या आणि त्या सेनेच्या अग्रगामित्वाचे साधर्म्य व त्यांत अग्रगामी नायकांचे झुंज, व त्या झुंजांत तनूचा पराभव, आणि कृतांताचे वर्चस्व, या सर्व उपमानोपमेयांचे साधर्म्य फार सुंदर रीतीने दर्शविले आहे. हा येथे रूपक अलंकार जाणावा यांत जरारूप विषय उपमेय आणि ।। कृतांतकटकामलध्वजत्व में विषयी उपमान, या उभयतांचा अभेद वर्णिला आहे. म्हणून प्रथम चरणांतील रूपकाचा अभेदरूपक प्रकार जाणावा. द्वितीय चरणांत अग्रगामी गदांबरोबर तनूचे द्वंद्वयुद्धरूप विषय्युपमान, आणि तनूचे जर्जरीभूतत्व विषयोपमेय, या उभयतांचे तादूप्य दिसते म्हणून हा ताद्रूप्यरूपक प्रकार जाणावा, यांत आणखी तनूच्या भागण्याने उपमानाचे आधिक्य वर्णन होऊन तेणेकरून तनूच्या जर्जरीभूतत्वोपमेयाचे आधिक्य दिसून येते म्हणून हा अधिकाभेदरूपक उपप्रकार जाणावा.' [य० पां०-पृ० १८७-१८८] या केकेचे संस्कृत भाषांतर प्रि० महादेव शिवराम गोळे यांनी केले आहे ते असें:-'कृतांतकटकामलध्वजजरा स्फुटं लक्ष्यते पुरःसरगदै शं प्रमथिता तनूः क्लाम्यति । सहाय इह मे कुतस्त्वदपरः प्रभावाधिको न तारयसि चेद्धतोऽस्मि खलु कालपाशावशः॥.' (द्वितीयसंस्कृतपुस्तक) या केकेंतील स्वभावोक्ति फार सुरेख साधली आहे. १. प्रास्ताविकः-मागल्या केकेंत कवीने आपण स्वोद्धाराविषयी अधीर का ते सांगितले, यांत 'आपणावर हा आणीबाणीचा प्रसंग आहे, तेव्हां कृपा करण्याची त्वरा करावी' म्हणून कवि भगवंतास प्रार्थितात. अन्वयः-स्वोचित प्रणतरक्षण अवश्य करणे खरें, मग उशीर कां? कृपण मीहि शोचित कां बसों? [हे] प्रभुवरा! तुम्हां एकटें धांवणे उचित नव्हे, [यास्तव कृतांत शिवला नसे तंव पावणे बरे दिसे. अवश्य जरूर. अवश्य करणे खरें अवश्य केले तर पाहिजे, केल्यावांचून सुटका तर होत नाही. २.प्रणत+रक्षण शरणागताचे संरक्षण. (ग्र+नत-प्रणत=शरण आलेला.) ३. आपल्या प्रभुत्वास उचित (योग्य). आपल्या दीनवत्सल, पतितपावन ह्या ब्रीदास योग्य जें शरणागताचे रक्षण म्हणजे तापत्रयापासून त्याची सोडवणूक ही केव्हां तरी तुम्हांला कलाच पाहिजे, मग उशीर कां करितां? 'पंत' 'विश्वेशस्तुती'त म्हणतात:-'तुज साधु पतित स म्हणतात, पतितपावनता। हे प्रत्ययास येऊ, मज जाणनि पादपतित पाव नता'॥१८॥