या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत असें जैरि म्हणाल हो प्रियतमा ! जंगज्जीवना ! रसाने वरील ग्रंथ जसे काय उचंबळत असतात! असत्यता ही मनोरंजकतेस स्वभावतः मुळीच विरुद्ध नसून उलटी तीस पुष्कळ अंशी अनुकूलही आहे. तर ह्या कवीची धर्मविषयक मते अलिकडच्या मतांहून कितीही भिन्न असली, किंवा वादविषयक काव्यांत त्याने ईश्वराचे वर्णन कोणत्याही पद्धतीने केले असले, तरी कवित्वदृष्टया हे सर्व विचार केवळ बाह्य होत'. (५) 'प्रस्तुत काव्याविषयी (केकावलीविषयीं) मत प्रगट करितांना आणखी एक मोठा विचार मनांत आणणे अवश्य आहे. मूर्तिपूजेच्या धर्मापेक्षां अमूर्तदेवाची उपासना ही कितीही उत्कृष्ट असली, तरी पहिल्या धर्मातील काव्याची परीक्षा कर्तव्य असतां हा दुसरा उंचप्रतीचा धर्म विशेष उपयोगी पडणारा आहे असें नाहीं'. (२) 'यशोदापांडुरंगी' च्या कर्त्यांचा अभिप्रायः-(या काव्यांत पंतांनी परमेश्वराशी अत्यंत सलगी केली आहे त्याचा विचार त्या काळच्या समजुतीकडे लक्ष्य देऊन केला पाहिजे असे प्रतिपादन करित असतां दादोबा ह्मणतात) 'ज्या देशांत व ज्या लोकांत रसभरित ह्मणून प्रसिद्ध काव्ये असतात, त्यांच्या गुणांचे यथायोग्य परीक्षण करण्यास, U आणि त्यांची रुचि घेण्यास त्याच देशाचे डोळे आणि जीभ असली पाहिजे. इतर लोकांच्यानी तसें यथान्याय परीक्षण होणे केवळ अशक्य असें माझें ह्मणणे नाही. कदाचित् ते विशाळबुद्धीचे परीक्षक असल्यास योग्य परीक्षा करूं शकतील. परंतु त्यांच्या रुचीनें जो तद्देशीय सुज्ञांस आनंद होईल, त्याच मानाचा आनंद अन्यदेशीय विद्वानांस होणार नाही. याची कारणे बहुत आणि सूक्ष्म आहेत. ज्या लोकांत वंशपरंपरेनें ज्यांचा सहवास असतो, त्यांचा पूर्वापर व्यवहार, रीतिभाति, विद्या, ज्ञान, आचार या सर्व गोष्टींच्या संघटनाने त्यांची मने तशीच रंगलेली असतात, ह्मणून त्यांच्या काव्याने जे हर्षशोकादि विकार त्यांच्या मनांवर होतील, तसे विकार अशा संघट्टनाच्या अभावामुळे ज्यांची मनें तशी रंगलेली नसतात त्यांजवर होणार नाहीत. अशा विचाराने पाहिले असतां हे स्तोत्र (केकावलि) प्रौढ आणि रसिक काव्यांत गणिले पाहिजे.' तसेच या काव्यांत पंतांनी देवाला एकेरी शब्दांनी संबोधिले आहे त्यासंबंधी पुढील सुभाषित वाचनीय आहे. 'ताते सुतानां सुरतेंऽगनानां । स्तुतौ कवीनां, समरे भटानां । त्वंकारयुक्ताहि गिरः प्रयुक्ताः । रसाधिकाश्चारुतरा भवंति' ॥ बापाशी मुलगा लाडिकपणाने बोलत असतां, । रतिप्रसंगी स्त्रिया प्रियकराशी विनोद करित असतां, योद्ध्याच्या समरप्रसंगी, 'तूं' या करा शब्दाने बोललेली भाषणे पुष्कळ रस (वत्सल, शंगार व वीर) उत्पन्न करून रमणीय दिसतात. १. काही प्रतीत 'झणि' असा पाठभेद आढळतो. २. अत्यंत आवडत्या देवा!. 'तर' व 'ईयस्' हे प्रत्यय आधिक्य दाखवितात; तसेंच 'तम' व 'इष्ट' हे प्रत्यय आत्यंतिक भाव दर्शवितात. ३. जगाच्या प्राणा! जगाला आधारभूत जो तूं त्या !. 'प्रियतमा' व 'जगजीवना' या दोन संबोधन पदांनी कवीने भगवंताविषयी अत्यंत प्रेमभाव प्रकट केला आहे. तसेच ही दोन्हीं पदें साभिप्राय आहेत म्हणून परिकराकुर अलंकार जाणावा. याचे एक सुरेख उदाहरणः-सीता रामाला म्हणते-'दोषज्ञसेव्य उपकसिंधो । सर्वेकवंद्य ! नृपसत्तम ! दीनबंधो! । कां त्यागिले मज वनीं करुणांबुवाहा ! दारुण राघवा! हा' ॥ (कशलवोपाख्यान ४-५५). केका ४ पृ० ११ पहा.