या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ककोपाल तदाश्रितमृगासि ती सुखसमृद्धि बा! जी वना. ॥ ४८ हुँखेंचि सुख बाळका प्रकट होय मातेचिया; तिला घडति जे श्रम, प्रियजनोत्तमा ! तेचि या।। १. आम्ही कसा तरी तुझा उद्धार करूं, मग त्यांत आम्हांला धांवण्याचे श्रम पडले तरी हरकत नाही, त्याची काळजी तुला नको असें देवा ! आपण जर म्हणाल तर त्यावर माझे पुढीलप्रमाणे उत्तर आहे. तत्+आश्रितमृगांसि त्याच्या आश्रयास राहणाऱ्या मृगादि पशूना. 'मृग' शब्दाने येथे फक्त हरिण न घेतां एकंदर पशुवर्ग समजावा.२.उदकतपादि सुख देणाऱ्या वस्तूंची विपुलता. अरण्याला जी उदकतृणच्छायादिकांची विपुलता असते तीच त्या अरण्याला आश्रय करून राहणाऱ्या हरिणादि पशूस असते. जर वन उदक तृणादिकेंकरून टवटवीत असेल, तर त्या वनांत राहणारे पशुही टवटवीत असतील; अर्थात् ती टवटवी जर त्या वनाला नाही; तर मृगांलाही नाही, येथे काव्यार्थापत्ति जाणावी. येथे 'वन' शब्द श्लिष्ट दिसतो. 'वन' शब्दाचे अरण्य व जल असे दोन अर्थ होतात. 'वनं सलिलकानने' इत्यमरः. 'वन' शब्दाचा जल किंवा जलसंचय (तडाग) असा अर्थ घेतल्यास जी सुखसमृद्धि जलसंचयास असते तीच त्या तडागाचा आश्रय करणाऱ्या पशूसही असेल; म्हणजे तडागांत पाणी जर विपुल व निर्विकारी असेल तरच त्याच्या उदकाने तृषा शांत करणाऱ्या पशूची तृषा शांत होईल व त्यांना रोग जडणार नाही. तळ्यांतच पाणी कमी, तर पशूना ते यथेच्छ प्यावयास कोठून मिळणार?-अर्थात् मिळणार नाही. तसेंच देवाला क्षेम नाही, तर भक्तांचे क्षेम कुठून असणार? देवभक्तांचा संबंध इतका परस्पर निगडित आहे की एकाचे जे सुख, तेच दुसऱ्याचे सुख, व एकाचें जें दुःख तेंच दुसऱ्याचे दुःख. हे देव-भक्तांचे नातें माय-लेकरांच्या नात्याने पुढील केकेंत कवि स्पष्ट करितात. ३. अरण्याला, उदकाला. शेवटच्या चरणांत अर्थातरन्यासालंकार झाला आहे. केका २ पृ० ८ पहा. ४. मातेचिया सुखेंचि बाळका सुख प्रकट होय, [हे] प्रियजनोत्तमा! | देवा!] तिला जे श्रम घडति तेचि या [बाळका घडतात]. म्हणोनि [हे] जीवा! विपजलधिसेतुला सकललोकजीवातुला तुला पळ क्षणहि कष्ट न शिवों-असा अन्वय. आश्रयाला जें सुखदुःख तेंच आश्रिताला होय असा आशय मागच्या केकेंत दर्शविलास दुसऱ्या दृष्टांताने दृढ करीत कवि भगवंतास आळवितात. मातेचिया मातेच्या आईच्या) सुखेंचि (सुखानेच, कुशलानेंच) बाळका (बाळकाला, मुलाला) सुख होय हा प्रकट (स्पष्ट) [आहे]. आई जर सुखी तरच तिच्या मुलाला सुख मिळतें. ५. मातेच्या. 'मातेचिया' ह्या त-हेचे षष्टीचे जुनें रूप जुन्या मराठी ग्रंथांतून फार आढळतें. ६. त्या मातेला. ७. व्या०:-'घडति' हे क्रियापद काकाक्षिगोलकन्यायाने पुनः 'यार शब्दाकडे योजिले पाहिजे. काकाक्षिगोलकन्यायः-कावळ्याला एकच डोळा असतो व त्याला आपले बुबुळ दोन्ही बाजूंनी फिरवितां येत असल्यामुळे दोन्ही बाजूंच्या वस्तु त्याला पाहातां येतात. यावरून वाक्यांत एकाच शब्दाचा दोन अथवा अधिक स्थळी उपयोग होतो तेथें ना