या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ मोरोपंतकृत न्याय होतो. प्रस्तुत स्थळी 'घडति' हे क्रियापद 'तिला' या शब्दाकडे लागत असून पुन्हा 'या' कडे त्याचा संबंध पोचतो म्हणून येथे 'काकाक्षिगोलक' न्यायाचा उपयोग झाला. ८. कष्ट, दुःख. ९. प्रियजनांमध्ये (आवडत्या माणसांमध्ये) उत्तम (सर्वांत आवडता) जो तूं परमेश्वर त्या ! प्राणसख्या! १०. या बालकाला. हे प्राणसख्या ! आईला जे श्रम होताल तेच तिच्या बालकालाही होतात. लहान मुलाच्या मातेची प्रकृति जर बरी असली तर बालकाचीही प्रकृति बरी असते. तिची प्रकृति विघडली तर त्या पोराचीही बिघडते, म्हणून मातेच्या शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष्य पोंचविले म्हणजे मुलाच्या स्वास्थ्याकडे निराळे लक्ष्य द्यावयास नको. याचविषयी तुकारामाचा एक अभंग आहे:'माता सुखी तरी बाळकासी सुख । नाहीं तरी दुःख सर्वकाळ ॥.' मातेची योग्यता:-मातेच्या शरीरस्वास्थ्यावर बालकाचे सुखदुःख अवलंबून असते एवढेच नव्हे, तर तिच्या मानसिक शक्तीवर म्हणजे तिच्या बुद्धिवैभवावरच पुष्कळांशी मुलाची बुद्धि अवलंबून असते. मूल पुढे चांगले किंवा वाईट निपजणे ह्याची सर्व जबाबदारी आईवर असते, असें फ्रान्सचा बादशाहा नेपोलियन याचे म्हणणे असे. मातेची योग्यता एवढी मोठी आहे की प्रत्यक्ष मुलांचा बाप जरी दुर्गुणी असला तरी माता जर सद्गुणी व सुशील असेल, तर तिच्या वर्तनाचा परिणाम मुलांवर होऊन ती सुद्धा सद्गुणीच निपजतात. मनुष्य कितीही विद्वान् व श्रीमंत असो त्याला जर सुमातेच्या हाताखाली शिक्षण मिळाले नसेल, तर त्याच्या विद्येचा व लक्ष्मीचा त्याच्या वर्तनावर व्हावा तितका हितकर परिणाम होत नाही. यासंबंधानें 'बव्हर्थ जनमनोहर स्वल्पाक्षर मधुर सत्य बोलणारे' अर्वाचीन इंग्रज ग्रंथकार स्माइल्स्साहेब यांच्या ग्रंथांतून घेतलेला पुढील छोटासा उतारा वाचनीय आहे:'No mere educational advantages, no surroundings of wealth or comfort, will recompense for the want of good mothers. It is they who mainly direct the influences of Home, which is the seminary not only of the social affections but of the ideas and maxims which govern the world. Nations are gathered out of nurseries, and the leading strings of children become in the hands of good mothers the reins of moral government'. ऋतुध्वज राजाची महाबुद्धिमती व पतिव्रता राणी मदालसा हिने आपल्या विक्रांत, सुवाह, शत्रुमर्दन व अलर्क ह्या पुत्रांस त्यांच्या जन्मापासून बोध करून त्यांना उत्कृष्ट ज्ञानसंपन्न केले ही कथा मार्कंडेयपुराणांत (२५-३६) सविस्तर सांगितली आहे. त्याचप्रमाणे 'विदुला' राणीने 'संजय नांवाच्या आपल्या पुत्राला तो रणांगणांतून पळून आला असतां खरमरीत उपदेश करून पुन्हा युद्धार्थ परत पाठविला या (उद्योग० अ० १०) प्रसंगाचे स्मरण आमच्या भारतीय वाचकांस होईलच, त्याचा थोडासा चुटपुटता मासला येथे दिला आहे:-'विदुला म्हणे 'अहारे ! क्लीवा ! मंदा कसा पळालास । कां वांचलासि अयशस्कर ऐसा तूं न कां गळालास. ॥ ३५ ॥ अरि हरिल राज्य मग तूं वरिशिल वृत्यर्थ काय माधुकरी। सुखकर सुकर्म टाकुनि असुखकर कुकर्म कोण साधु करी ॥ ३६॥ मद्यौवन, संजय हे निजनामहि बुडविलें तुवां दगडें । झगडे | अरिरथ चक्रांही स्पष्ट लोष्टसा रगडे ॥ ३७॥ अधमा ! तुवां मरावें क्षणहि न वुडवूनि वाचाव । काळा! यासम अन्यहि जे असतिल त्यांहि मानवां चावें ॥ ४१ ॥ निजलासि