या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. उरी भृगुपदाहती मिरवितोसि, अद्यापि ती, सारांशरूपाने आमच्या बहुश्रुत वाचकांची स्मरणशक्ति ताजी करण्याकरितां येथे दिली आहे:"यांत 'असुर' हा एक मोठा चमत्कारिक शब्द आला आहे. याचेच आह्मी देवाः' असे भाषांतर केलें आहे. साधारण संस्कृतांत 'असुर' शब्दाचा अर्थ देव असा होत नसून देवशत्रु दैत्य असा होतो. पारसिकांच्या धर्मात हिंदूंच्या देवास 'देव' असे म्हणतात पण त्यांच्या भाषेत त्याचा अर्थ भूत, दैत्य असा होतो. पारशी लोक आपल्या स्वतःच्या देवांस 'असुर' ('अहुर') म्हणतात. यावरून आम्ही वेदाच्या आलीकडील संस्कृतांत आमचे देव खेरीज करून जे इतर देव त्यांस 'असुर' असे म्हणतों आणि आमच्या देवांस ते 'देव' (=दैत्य) ह्मणतात असें झालें. दुसरी 'असुर' शब्दाविषयीं अशी चमत्कारिक गोष्ट लक्ष्यात ठेवण्याजोगी आहे की, ऋग्वेदांत आणि इतर वेदांत 'सर' शब्द मुळींच येत नाही. तो मागाहून 'असुर' शब्दापासून पुढील रीतीनें उत्पन्न झाला. प्रथम 'असर' असे सर्व देवांस आपण म्हणत होतो. नंतर तो शब्द दुसऱ्या लोकांच्या (पारसिमादिकांच्या देवांस अथवा वाईट देवांस म्हणजे दैत्यादिकांस तुच्छनार्थी लावू लागलों, आणि याहन जे भिन्न म्हणजे आमचे (चांगले) देव त्यांस नांव पाहिजे तें 'असुर' यापासूनच आम्ही कादिले. 'असुर' ( जिवंत असणारे) याची खरी व्युत्पत्ति 'अस्' धातूपासून असलेली आम्ही क्षणभर विसरून 'असर' शब्दांत जो 'अ' आहे तो 'न' या अर्थी आहे असें गैर समजून 'सुर' शब्द केला आणि 'असुर' म्हणजे वाईट देव नव्हेत ते 'सुर' असे समजून 'सुर' हे नांव आम्ही भावांस लाविले. याप्रमाणे दुसरी उदाहरणे:-'अदिति' शब्दावरून 'दिति' आणि तिचे त्य हे आपण निर्माण केले; तसाच 'विधवा' शब्दापासून (हा शब्द वि-धवा असा असे गैर समजून) 'धव' म्हणजे नवरा आम्ही निर्माण केला आहे, आणि त्यानंतर मा-धव', 'रमा-धव', 'उमा-धव' हे शब्द प्रचारांत आले." ३. लक्षावधि ४. या ठिकाणी देवाप्रमाणे क्षमाशील कोणी नाही असें वर्णिले आहे म्हणून येथें असम अलंकार झाला आहे. जेथें उपमाच नाहीं असें वर्णन असते, तेथें असम नामक होतो. 'सर्वथैवोपमानिषेधोऽसमाख्योऽलंकारः' [रसगंगाधर-पृ० २१०]. 'उपमानिषेध नोडर निरुपम उपमेय होय तरि असम । ललनामुखसौंदर्या उपमा नाही, तसेंच तडामा (श्रीविप०). याची उदाहरणे:-(१) हे राजा! जो तुझी बरोबरी करतो असा पुरुष आज नाही, झाला नाही व होणार नाही. (२) 'की मजवरि प्रसाद श्रीमद्गुरुचा जगीं असामान्य.' [उद्योगपर्व-अ० ११ गी० ९३]. ५. क्षमाशील. १. छातीवर, वक्षस्थलावर. २. भृगुनामक ऋषीच्या पदाची (पायाची) आहति (ताडण)-भृगूचा लत्ताप्रहार. कथासंदर्भ:-भृगुऋषीनें क्षमागुणपरीक्षणार्थ भगवंताच्या उरांत लात मारली ही कथा भागवत-दशमस्कंध-अ० ८९ श्लो० १-१४ त पुढीलप्रमाणे दिली आहे:'सर्व देवांत श्रेष्ठ कोण असा ऋषिमंडळींत एकदां प्रश्न निघाल्यावरून त्या विचाराचे निर्णयार्थ ऋषींनी ब्रह्मपुत्र भृगूस पाठविलें. भृगु प्रथम ब्रह्मदेवाच्या सभेस गेला, तेथे त्याने नमस्कारपर्वक पित्याची स्तुति न केल्यामुळे ब्रह्मदेव त्याजवर रुष्ट झाले. पित्याची स्तुति करून तेथून तो कैला