या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत असें करवि कृत्य, जी भुलविते, कधीं न त्यजी;। म्हणोन तुज जाणत्या विनवितों, 'ईला काढ गा ! करीन मग, तूं जरी म्हणसि आपणा गाढ गां.' ॥ - ५३ म्हणसि, [तर, तसे करीन'-असा अन्वय. प्रस्तावनाः-यांत विषयवासनेची निर्भसना करीत कवि ईश्वराला आपला उद्धार करावा ह्मणून आणखी प्रार्थितात. २. पि. शाची, डाकिनी. भूतप्रेतादि योनींची उत्पत्तिः-दहा मरीच्यादिक ऋषींनी देव, महर्षि इत्यादिकांस उत्पन्न केल्यावर यक्ष, राक्षस, पिशाच, गंधर्व, अप्सरा, असुर, नाग, सर्प, पक्षीइ० उत्पन्न केले असे सांगितले आहे. [मनुस्मृति-अ० १ श्लो० ३७.] विष्णुपुराणांत (अंश १ अध्याय ५) ब्रह्मदेवाच्या क्रोधापासून भुतें उत्पन्न झाली असे सांगितले आहे. ३. पुत्र, दारा, धनादि सुखाकडे प्रवृत्ति. पहिल्या दोन चरणांचा अर्थः-विषयवासनारूप जखीण खरोखरीच दुनिवार आहे. ही विषयेच्छा प्राणिमात्रांस मोह पाडून त्यांचे ईश्वराकडचे लक्ष्य काढून ते ऐहिक उपभोगांत आसक्त करिते. तिने झपाटलेला मनुष्य तिच्या ताब्यांतून सुटणे फार कठीण. मनुष्याचे मन स्त्रीपुत्रादि प्रपंचांत रमलें म्हणजे तें परमेश्वरभजनीं रममाण होणे अत्यंत दुष्कर असते. सामान्यतः 'विषय' या शब्दाचा अर्थ स्त्रीपुत्रधनादि प्रपंचाचा पसारा असा होतो तरी बहुतकरून त्याचा अर्थ 'स्त्रीविषयक आसक्ति' असा करितात. स्त्रीविषयक आसक्ति सर्वांत प्रबळ आहे हे कारण उघडच आहे. १. हीच विषयेच्छा ईश्वराकडचे लक्ष्य काढून ऐहिक भोगांकडे लावण्याचे कृत्य करिते. २. मोह पाडते, भुरळ घालते. ३. सोडते. एकदां अंगांत संचरली म्हणजे मग तेथून कितीही प्रयास केले तरी सहसा निघत नाही. ४. भूतवैद्याला, पंचाक्षऱ्याला. तृतीयचरणार्थ:-ह्या विषयवासनेचा असालोंचट व दुष्ट स्वभाव आहे म्हणून ह्या पिशाचिकेचा पंचाक्षरी जो तूं त्या तुला, माझ्या अंगाला झोंबलेल्या ह्या डाकिणीला पंचाक्षरी विद्येच्या बलाने झाडून टाक असें विनवितों (प्रार्थितों). ईश्वरकृपेवांचून मनुष्याची विषयावरील आसक्ति सुटणे अत्यंत दुष्कर म्हणून त्याने आम्हां मनुष्यांवर कृपा करावी-असा कवीचा अभिप्रेतार्थ. केकासौंदर्यः-कवीने येथे भगवंताला 'जाणता' असे म्हणून पिशाचिकानिवारणार्थ जो प्रार्थनाप्रकार योजिला आहे तो सहृदयवाचकांस सरस वाटणारा आहे. 'जाणता' या पदाने भगवंताचें पिशाचबाधानिवारक सामर्थ्य उत्तम ध्वनित केले आहे. या संबंधाने शिवलीलामृतांतील पुढील छोटा उतारा वाचनीय आहे. पिशाचिका व पंचाक्षरी कोण?दाशाह राजा गर्गमुनीला म्हणतोः-'पंचभूतांची झाडणी करून । सावध केलें मजलागून । चारी देह निरसून। केलें पालन गुरुराया ॥१२५॥ पंचविस तत्वांचा मेळ । त्यांत सांपडलों बहुत काळ । क्रोधमहिषासुर सबळ । कामवेताळ धुसधुसी ॥१२६॥ आशा मनसा तृष्णा कल्पना । भ्रांति भुली इच्छा वासना । या जखिणी यक्षिणी नाना । विटंबित मज होत्या ॥१२७॥ ऐसा हा अवघा मायामेळ । तुवां निरसिला तत्काळ । धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ । गुरु दयाळ धन्य तूं' ॥ १२८ ॥ (शिवलीलामृत, अध्याय १) ५. हिला. विषयवासनारूपी पिशाचिकेला. ६. काढून