या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत तशी न ईतरास भी; इस संदंडही हाकिती; तथापि बहु लाथळी; मग अँदंड मी हा किती ॥ ५४ खराः' इत्यमरः. उपमेची समर्पकताः-मनुष्याच्या विषयवासनेला पशूची, त्यांतही गाढवीची उपमा देऊन अप्रत्यक्षपणे मनुष्याला गर्दभ म्हटल्याबद्दल ज्यांना वाईट वाटेल त्यांनी एकनाथस्वाrमींच्या पुढील भागवती ओव्यांकडे जरा नजर पुरवावी. त्यांनी तर ब्रह्मज्ञान नसणाऱ्या मनुष्यांस श्वानसूकरादि पशुंपेक्षांहि हीन मानिले आहे. 'साधीना देहीं ब्रह्मज्ञान । तो श्वानसूकरा प्रमाण । अथवा त्याहोनि हीन । ते विवंचना परियेसी॥३५९॥ पशूसि हाणितल्या लाता । द्वेष न धरी सर्वथा। मनुष्यासि तूं म्हणतां । जीवघाता प्रवर्ते ॥ ३६० ॥ पशूसि लोभ नाहीं संग्राहता। एक आहार होय भक्षिता । मग उरलिया अर्था । त्यागी सर्वथा तत्काळ ॥ ३६१ ॥ मनुष्याचे लोभिष्ठपण । गांठीं असल्या कोटीधन । पोटा न खाय आपण । मग त्यागितां प्राण त्यजील ॥ ३६२ ॥ सायंप्रातर चिंता । पशुंसि नाहीं सर्वथा । मनुष्याची चिंता पाहतां । जन्मशतां न राहे ॥ ३६३ ॥ अमितधनें असतां गांठीं । तरी चिंता अनिवार मोठी । नाथिलेचि भय घे पोटीं । अविश्वासी सृष्टी नरदेही ॥३६४॥ काम क्रोध सलोभता । चिंता निंदा अतिगर्वता । हे मनुष्याचेनि माथां । पशूसि सर्वथा असेना॥३६८॥ पशूसि ऋतुकाळी गमन। मग स्त्रियेशी नातळे आपण । पुरुषासि नित्य स्त्रीसेवन । गरोदरहि जाण न सोडी ॥ ३६७ ॥ न साधितां आत्मज्ञान । केवळ जे विषयी जन । ते श्वान शूकरांपरिस हीन । माणुसपण त्यां नाहीं ॥ ३६९ ॥ (अध्याय ९) (६.)येथे गुणकथा आणि महासुरभि, विषयवासना आणि रासभी, यांत अभेद आहे म्हणून हा अभेदरूपक अलंकार समजावा. (७.)शुकाचार्यास. कथासंदर्भः-पराशरसत्यवतीपुत्र व्यासास शुकीचे रूप धारण केलेल्या एका अप्सरेपासून झालेला पुत्र. हे आजन्म ब्रह्मनिष्ठ असून परमभागवत होते. एकदां यांचे उग्र तप पाहून इंद्राला भय वाटले व त्याने यांची तपश्चर्या भंग करण्याकरिता वसंत व काम या प्रबल आयुधांना बरोबर देऊन रंभेला पाठविलें, पण यांच्या निःसीम विषयपराखलखतेपुढे तिचे कांहीं न चालून ती यांना शेवटीं शरण गेली. यानेच परिक्षिति राजास 'भागवत' सांगितले. शुकाचा अधिकार व्यासापेक्षाही मोठा होता असें भागवत प्रथमस्कंधांतील कथेवरून दिसून येते (८. गवळ्यास. ही विषयवासना गाढवी जशी शुक हाच कोणी अहीर (गवळी) त्यास मागे एकदां भ्याली तशी इतरास भीत नाही. एका शुकाचायान मात्र विषयवासना खरोखरी जिंकली. १. इतर लोकांना, विश्वामित्रादि मुनिजनांला. (२.) दंडधारी लोक. 'सदड हा शब्द श्लेषयुक्त आहे. ह्याचे येथे दोन अर्थ होतात. हातात काठी असणारे व ज्यांनी विषयवासनेचा त्याग केल्याचा अथवा इंद्रियनिग्रह केल्याचा दर्शक असा जो दंड तो धारण केला आहे असे संन्यासी, योगी, तपस्वी. त्रिदंडी:-'कोणास शाप न देणे हा वाग्दंड, काम्यकर्म न करणे हा कर्मदंड व कदापि ग्राम्यविषयांचे चिंतन न करणे हा मनोदंड असे तीन दंड धारण करणाऱ्या योग्यालाच त्रिदंडी यति ह्मणतात. 'वाग्दंडः कर्मदंडश्च । मनोदंडश्च ते त्रयः । यस्यैते नियता दण्डाः स त्रिदंडी महायतिः ॥ (मार्कडेयपुराण अ० ११ अलकदत्तात्रेयसंवाद). एक अर्थः-ह्या विषयवासनारूपी गाढवीला हांकून देण्या