या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत अवश्य शरणागतव्यसन तो स्वयें वारणे तुम्हां विहित मुख्य हैं; न पुसतां करा हो! खरी निजोक्ति; खर काय तो अधिक ? संहरा हो! खैरी. ॥५६ करीत नाही. या दोन चरणांत कार्य (हेतुमान्) आणि कारण (हेतु) यांचें कथन केले आहे म्हणून हा हेतु नामक अलंकार समजावा. [मागें केका ३२ पृ०९० पहा.] ६.स्व (आपल्या)+पण (पणाचें, प्रतिज्ञेचें)+रक्षणा (संरक्षण करण्या) कारणे (करितां) = भक्तांची संकटें मी दूर करीन' अशी जी तुमची प्रतिज्ञा ती खरी ठरावी म्हणून. १.जरूर शरण+आगत+व्यसन=शरण आलेल्यांचे व्यसन म्हणजे संकट. ३. तर. ( स्वतः, जातीने, अंगानें.(५.) निवारण करणें, दूर करणे. प्रथमार्धाचा अर्थःदेवा! आमच्या भिडेमुळे म्हणा किंवा तुम्हालाच तसे वाटते म्हणून म्हणा पण तुम्हाला भक्तांची संकटें तर दूर केलीच पाहिजेत. कारण भक्तांची संकटें दूर करून त्यांचा सर्वस्वी योगक्षेम चालविण्याविषयीं तर तुम्हीं विडाच उचलिला आहे. तेव्हां कांही झाले तरी आपल्या प्रतिज्ञेचे रक्षण हे तुम्हाला केलेच पाहिजे. याविषयी तुकारामाचा एक अभंग आहे तो पहावाः-पडतां जड भारी । दासी आठवावा हरि ॥ मग तो होऊ नेदी शीण । आड घाली सुदर्शन ॥ हरिनामाच्या चिंतनें । वारा वाटां पळती विप्ने ॥ [तुकाराम-अभंग १६४४.] रामदासाचाही ह्याच अर्थाचा एक श्लोक आहे:-सदा चक्रवाकासि मार्तड जैसा, उडी घालितो संकटी स्वामि तैसा । हरीभक्तिचा घाव घाली निशाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥ ६) योग्य, उचित. ७. भक्तांचे संकट दूर करणे हे पुसणे विचार करणे. केका ६७ चरण ४ पहा. 8) निज+उक्ति आपले भाषण. 'न पुसतां (करूं न करूं असा विचार न करितां) निजोक्ति (आपले भाषण, भक्तांचे संकट दूर करण्याविषयींचे आपले प्रतिज्ञावचन) खरी (सत्य) करा हो' मनात काही विचार न आणतां भक्तदुरितनिवारणाची आपली प्रतिज्ञा खरी करून दाखवा. १० प्रसिद्ध तो खर ह्या खरीपेक्षा काय अधिक आणि ही खरी काय कमी समजतां? तो खर जसा वध्य तशी ही ख ही वध्य आहे, यास्तव हिचा संहार करा. (११) खरी शब्दावर येथे कवीने शेषयोजना केली आहे. गाढवा अथवा विषयवासनारूपिणी राक्षसी. द्वितीयार्धाचा अर्थःआपल्या भक्तांना विषयवासनागाढवीच्या जाचापासून सोडविणे हे तुमचे आद्यकर्तव्य होय. तिकडे लक्ष्य देऊन भक्तपरित्राणाविषयींची तुमची प्रतिज्ञा तुम्ही खरी करून दाखवा. ती खरी करावयाची म्हणजे तुम्हाला ह्या विषयवासनाराक्षसीला मारून तिच्यापासून आमची सुटका केली पाहिजे. ती तुम्ही करा. कारण ह्या विषयवासनेपासून आम्हाला फार त्रास होतो. गोकुळांतील लोकांना खरासुरापासून कांहीं इतका त्रास झाला नाही.