या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६० मोरोपंतकृत कारणे, कार्ये व त्यांचे सहकारी मनोविकार ह्यांस काव्यशास्त्रांत अनुक्रमें स्थायीभाव, विभाव, अनुभाव, व व्यभिचारी अथवा संचारी भाव ह्मणतात. जे भाव ( मनोविकार ) पुष्कळ काळपर्यंत चित्तांत घोळत असतात, इतर भावांनी नाश न पावतां त्यांस आपल्यांतच मिळवून घेतात व जे विभाव, अनुभाव व व्यभिचारी भाव याने पुष्ट होऊन रसरूप होतात त्यांस स्थायीभाव ह्मणावें. विभाव ह्मणजे रत्यादि मनोविकारांची कारणे. ह्याचे आलंबन व उद्दीपन असे दोन प्रकार आहेत. ज्याच्या आश्रयाने मनोविकार उत्पन्न होतो तो आलंबनविभाव. जे उत्पन्न झालेल्या मनोविकारांस वाढवितात ते पदार्थ उद्दीपन विभावांत गणतात. मनोविकारांची कार्ये ज्या चिन्हांनी किंवा क्रियांनी स्पष्ट होतात ते अनुभाव होत. याचे कायिक, मानसिक, आहार्य व सात्विक असे चार भेद आहेत. मुख्य मनोविकारास वाढविणाऱ्या इतर मनोविकारांस व्यभिचारी भाव ह्मणतात. हे व्यभिचारी भाव तेहेतीस मानतात. वरील सर्व गोष्टी लक्ष्यांत घेऊन रसाची व्याख्या साहित्यशास्त्रज्ञांनी अशी केली आहे:-'विभाव, अनुभाव, व व्यभिचारी भाव ह्यांच्या साह्यानें वृद्धिंगत झालेला जो स्थायीभाव त्यास रस ह्मणावें.' दृश्य काव्य ह्मणजे नाटके ह्यांच्या अवलोकनाने व श्राव्य काव्य ह्मणजे भारतादिक ह्यांच्या वाचनाने किंवा श्रवणाने प्रेक्षकांस आणि वाचक श्रोत्यांस जो विलक्षण आनंद होतो त्यास रस ह्मणावे अशीही रसाची स्थूल व्याख्या काव्यशास्त्रज्ञ करितात. हे रस नऊ ( कोणी शांत रस वगळून रसाची संख्या आठ मानतात.) आहेत:- शृंगारहास्यकरुणरौद्रवीरभयानकाः । वीभत्साद्भुतशांताख्याः काव्ये नवरसाः स्मृताः ॥ ( अलंकारशेखर २० वी मरीचि ). शृंगार, हास्य, करुण रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्भुत, शांत हे नवरस. यांचे स्थायिभावः- रतिहासश्च शोकश्च क्रोधोत्साहै। भयं तथा । जुगुप्सा विस्मयो भावः निवेदः स्थायिनो नव' ॥ वरील रसांचे रति, हास, शोक क्रोध, उत्साह, भय, जुगुप्सा, विस्मय व निवेद हे नऊ अनुक्रमें स्थायीभाव समजावे. कोणी कोणी वत्सल, भक्ति, व प्रेयान् हे नवीन रस सुचवितात. भक्तिरसास कोणी देवताविषयक रतिभावांत गणतात. केकावलींतील मुख्य रसः-शांत (किंवा भक्ति) रस हाच 'केकावलीत' मुख्य आहे. शांतरसांत देवताविषयक रति अत्युत्कट झाली म्हणजे अलीकडे त्याला भक्तिरस असें म्हणतात. केकावलीत भक्तिरसाची जणूं काय भागीरथीच वाहत आहे असे रसज्ञांस वाटते. शांतरसाचा स्थायीभाव विषयसुखाविषयी किंवा प्रपंचाविषयी तिरस्कारबुद्धि ( निवेद ) हा होय. पुण्य ताथक्षत्र, साधुसमागम, भगवत्कथाश्रवण, संतचरित्रश्रवण, कामादि षडिपूंचा त्रास, देहाची क्षणभंगुरता, वृद्धावस्था इत्यादिक निर्वेदाची कारणे किंवा विभाव समजावे. प्रेमाश्रु वाहणे, कंठ सद्गदित होणे व अष्टसात्विकभाव दाटून व भक्तीने गहिवरून प्रभूस शरण जाणे ह्या क्रिया अनुभाव होत. स्मरण, धैर्य, चिंता, हर्ष, उताविळपणा, चांचल्य, इत्यादि सहकारी मनोविकार हेच व्यभिचारी भाव होतात व अशा रीतीने निवेदाची पूर्णता होते. केकावलीत मुख्यत्वे जरी शांतरसाचा परिपाक फार चांगला उतरला आहे, तथापि त्यांत कांहीं स्थळी रसाभास झाला असून कांहीं स्थळी रससंकरही झालेला आढळतो. एकंदरीने विचार केला असतां 'केकावली' हे. च्या काव्यांपैकी अत्युत्कृष्ट ठरते. एवढेच नव्हे तर एकंदर महाराष्ट्रकाव्यरत्नाकरांत दे. कावली'सारखी काव्यरलें थोडीच आहेत. सुरभिपक्षी रस म्हणजे दूध, कथापक्षी