या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रावाविषयी मत चांगले नव्हतें (तुकारामस्तुति २२). पुढे बाजीराव गादीवर असतांना व ब्रह्मावर्ती पदच्युत झाल्यावर असतांना कोणाही हरदासाची कथा करावयाची झाल्यास यजमानाचे आज्ञेवरून कारभारी पुढील पांच कलमें हरिदासास कळवित असत:-(१) सगळी कथा चार घटकांत आटपावी; (२) यजमान कथेस येऊन बसल्यावर सभेकडे हरदासाने पाठ करूं नये; (३) कथेत कृष्णचरित्र लावावें; (४) लावलेले आख्यान अर्धवट न ठेवतां संपविलेच पाहिजे; (५) मोरोपंतांची आर्या कथेत ह्मणूं नये. ६ कुटुंबसौख्य, स्नेहसंबंध व स्वभाव. ___पंतांचे कुटुंब फार मोठे होते. त्यांचे वडील, मातोश्री, सख्खे व चुलतबंधु, भावजया, स्त्री, स्वतःचे व बंधूंचे पुत्र व कन्या, बहिण, त्यांची आत्या वगैरे माणसे एका वाड्यांतच राहत असत. त्यांची स्त्री रमाबाई ही मोठी साध्वी होती. तिच्या नेत्रास कांहीं विकार असल्यामुळे वंधूचे आग्रहास्तव पंतांनी आनंदीबाई नांवाची दुसरी स्त्री केली. दोघी स्त्रियांपैकी वडील रमाबाईस मात्र संतति झाली. त्यांचे व त्यांच्या बंधूंचे जावई, व्याही, साड, मेहुणे वगैरे गणगोतही बरेंच असून सर्व माणसांचे पंतांवर मोठे प्रेम असे. पंतांनी गंगावकिलींत व विष्णुपदवकिलींत या सर्वांचा उल्लेख केला आहे. त्यावरून त्यांच्याविषयी पुष्कळच गोष्टी कळतात. पंतांस रघुनाथ व रामकृष्ण असे दोघे पुत्र असून एक कन्या होती. धाकटा रामकृष्ण हा पंतांस त्यांच्या ३१ व्या वर्षी झाला. याला पंढरपुरकर प्रसिद्ध धर्मसिंधुकार काशिनाथबाबा पाध्ये यांची कन्या आवडी ऊर्फ आऊताई दिली होती. त्या वेळी रामकृष्णाचे वय सुमारे चवदा पंधरा वर्षांचे होते. पाध्यांचे घराणे पंतांचे गुरुघराणे असल्यामुळे त्याजविषयी पंतांच्या मनांत मोठी पूज्यबुद्धि होती. त्यांत त्या घराण्याशी शरीरसंबंध झाल्यावर तर त्या उभयतांमधील स्नेह फारच वाढला. कोंकणांत संगमेश्वर तालुक्यांतील ६८ गांवची 'ज्योतिष, धर्माधिकरण, उपाध्येपण, पुजारीपण' यांची वृत्ति पाध्येघराण्याकडे फार दिवसांपासून चालत आली होती. ही वृत्ति पाध्यांच्या घराण्याकडून निघाल्यावर सुमारे इ. स. १७५८।५९ या वर्षी अनंत पाध्ये पंढरीस आले. हे मोठे विरक्त भगवद्भक्त असल्यामुळे पंत त्यांना फार पूज्य मानित. यांचे पुत्र काशिनाथ पाध्ये व चिठ्ठलपाध्ये. पंत आपली काव्ये अभिप्रायार्थ व शोधनार्थ यांचेकडे पाठवित; व काशिनाथ वाबाही आपल्या व्याह्याच्या कविता मोठ्या आवडीने वाचून त्यांचे संशोधन करित. बाबा जसे धर्मशास्त्रांत निष्णात होते तसेच ते मोठे निस्पृह भगवद्भक्त होते. पंढरपुरास श्रीविठ्ठलाचे उपचार बाबांनी पुष्कळ वाढविले. खतः एवढा अधिकार असून बाबा पंतांस गुरु समजत. त्यांनी पंतांच्या धर्तीवर 'रुक्मिणीपत्रिका' ह्मणून एक लहानसें प्रकरण रचिले आहे. त्याच्या शेवटी 'श्रीमदार्याचार्य मयूरेश्वरशिक्षित महामहोपाध्याय काशिनाथविरचित' असा उल्लेख आहे. भागवत दशमस्कंधावर ह्या दोन्ही व्याह्यांनी टीका केली आहे. बाबांची 'तोषणीसार' नांवाची टीका प्रसिद्ध असून पंतांचे बहशम व मंत्रभागवत हे ग्रंथ सर्वश्रुतच आहेत. सदाशिवपाध्ये क-हाडकर, ताहराबादकर महिपतिसुत विठ्ठल गोसावी, विठोबादादा चातुर्मासे, मैराळबोवा, बीडकर कौस्तुभभट, बाळंभट