या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. १५३ तुकाराम, रामदास, वामन वगैरे अर्वाचीन संतांनी स्पष्ट किंवा गुप्त उपहास केल्याचे आढळतें. व्यासांनी अठरा पुराणे, व भारतरामायण ही ऐतिवें वरील अडचण ध्यानांत आणूनच रचिली असावीत असे दिसते. ज्ञानेश्वरीच्या अखेर अखेर ज्ञानेश्वरराय लिहितात:-'एवं सकळ सांख्यसिंधु । श्रीभगवद्गीता प्रबंधु । हा औदार्य आगळा वेदु । मूर्त जाण ॥ १४५६. वेद संपन्न होय ठाई। परि कृपण ऐसा आन नाहीं। जे कानी लागला तिहीं । वर्णीच्याचि ॥ ५७॥ येरां भवव्यथा ठेलियां । स्त्रीशूद्रादिकां प्राणियां । अनवसर मांडूनियां । राहिला आहे ॥ ५८ ॥ तरी मज पाहतां ते मागील उणें । फेडावया गीतापणें । वेद वेठला भलतेणें । सेव्य होआवया ॥५९।। उत्तम अधम ऐसें । सेवितां कवणातेंही न पुसे । कैवल्यदानें सरिसें । निववीत जगा ॥ ६४ ॥ यालागी मागिली कुटी । भ्याला वेद गीतेच्या पोटीं । रिगाला आतां गोमटी। कीर्ति पातला ॥ ६५ ॥ म्हणोनि वेदाची सुसेव्यता । ते हे मूर्त जाण श्रीगीता । श्रीकृष्णे पंडुसुता । उपदेशिली ॥ ६६ ॥ (अध्याय १८ श्लोक ६६ वरील टीका) वेद सर्वांनी वाचूं नये असा निषेध असल्यामुळे तो सर्वांस उपयोगी पडत नाही. ह्या स्वतःच्या कमीपणाला लाजून व कार्पण्यनिंदेला भिऊन तो पुढे गीतारूपाने प्रकट झाला-हें वरील ओव्यांचे तात्पर्य. सारांश, वेदरूपी कामधेनु ही भलत्यांना दुहूं देत नाही, फक्त द्विजवत्साकरितांच ती दुग्ध देते. पण गीताभागवतरामायणादिग्रंथ ही कामधेनु सर्वांना सारखीच उपयोगी पडते. ब्राह्मणानें हरिकथा अवण केली तर त्याला जास्त पुण्य लागते व शूद्राने श्रवण केली तर त्याला कमी लागते, किंवा उलट पाप लागते अशांतला प्रकार मुळीच नाही. कोणत्याही जातीचे मनुष्याने भगवत्कथेचें मनन कितीही वेळ केले तरी ती इष्टफलप्रदाना ( पापविमोचना ) विषयीं कधींही असमर्थ होत नाही. एवढेच नव्हे तर आम्रफलाप्रमाणे भगवत्कथा जितकी जितकी जास्त चाखावी तितका तिला रस जास्त सुटतो व ती प्रतिक्षणी शुकादि तपस्विवरांला सुद्धा नवीच रुचि देते. (केका १०० पहा). भलते कोणत्याही जातीचे, असाहि अर्थ संभवतो. भगवद्भक्त आणि वर्ण विचारः-भगवद्भक्ताची जात कोणतीही असो, तो ईश्वराला सारखाच प्रिय होतो व लोकांनीही त्याच्या हलक्या जातीकडे न पाहतां त्याच्या अधिकाराकडे पाहून त्याची सेवा करावी अशाविषयीं वेद, उपनिषदें, पुराणे वगैरे संस्कृत ग्रंथांतून व ज्ञानेश्वरी, दासबोध वगैरे अर्वाचीन साधूंच्या ग्रंथांतून पुष्कळ वचनें आढळतात. ज्ञानदेव, रामदास, तकाराम. नामदेव, रोहिदास, चोखामेळा वगैरे संतमंडळी जातिभेद मानीत नव्हती हे सुप्रसिद्ध आहे कनाथ महाराच्या येथे जेवला ही गोष्ट पुष्कळांना ठाऊक असेल. यासंबंधी पुढील वचनें पड़ा। (१) "ब्राह्मण म्हणजे केवळ ब्राह्मणाचा मुलगा अथवा ऋषि म्हणजे ऋषीचा मुलगा नव्हे, ब्राह्मणाच्या कुळांत जन्म घेतल्यानेच ब्राह्मण किंवा ऋषीच्या कुळांत जन्म घेतल्यानेच ऋषि होत नाही. ऋषींमध्ये प्रमुख ऋषि जे वशिष्ठ ते मूळचे ऋषि नव्हते, त्यांना मागाहून वरुणाने ऋषि केलें असें ऋग्वेदमंडल ७ सूक्त ८८ मंत्र ४ ('वसिष्ठं ह वरुणो नाव्याधादृषि चकार' व. रुणानें वशिष्ठाला म्हणजे मंत्रकर्त्याला आपल्या नावेत बसविले आणि ऋषि केलें) यांत स्वतः वशिष्ठाने सांगितले आहे. यापेक्षाही दुसरें चांगले प्रमाण ऋग्वेदमंडल १० सूक्त १२५ मंत्र ५ यांत आहे. या मंत्रांत आकाशवाणी ('वागाम्भृणी') म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराची वाच