या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. कथांसि उपमा दिली सुरभिची, दिसे नीट ती; . परंतु बहु मंदै मी, म्हणुनि सच्छृती वीटती; । कथा निरुपमा तयांप्रति पYपमा शुद्ध तें। नव्हेचि; न विचारिलें बुधजनासि म्यां उद्धतें. ॥ ५९ १. केकान्वयः-कथांसि सुरभिची उपमा दिली ती [मला] नीट दिसे, परंतु मी बहु मंद म्हणुनि सच्छूती वीटती, कथा निरुपमा, तयांप्रति पशूपमा तें शुद्ध नव्हेचि, म्यां उद्धतें बुधजनासि न विचारिलें. प्रास्ताविकः-कथेला कामधेनूचीही उपमा साजत नाहीं, ती निरुपम आहे. म्हणून तिला कामधेनूची उपमा देण्यांत आपल्याकडून प्रमाद झाला असें कवि दर्शवितात. २. ठीक, योग्य. मी कथेला जी कामधेनूची उपमा दिली ती माझ्या मते ठीक दिसते. ३. मूर्ख. 'मंदोऽतीक्ष्णे च मूर्खे च स्वैरे चाभाग्यरोगिणोः । अल्पे च त्रिषु पुंसि स्यात् हस्तिजात्यंतरे शनौ ।' (मेदिनी). प्रथमार्धाचा अर्थ:-मी आपणाकडून योग्य अशीच उपमा कथेला दिली, परंतु सी जडबुद्धीचा असल्याकारणाने माझी उपमा अयोग्य ठरून ती ऐकून, साधूंचे कान विटतील म्हणजे कंटाळतील. त्यांना ही उपमा गौण वाटेल. ४. सत्-(साधूंचे)+श्रुति (कान)=साधूंचे कान. व्यु:-ज्यांनी ऐकू येते त्या श्रुती (कान). वेदाला श्रुति ह्मणण्याचे कारण केका २७ पृ० ७६ टी० ५ यांत दिले आहे. ५. निर् (नाहीं) उपमा (साम्य) ज्यांला अशा. कथेला कोणाचीही उपमा शोभण्यासारखी नाही. स्वतः ई. श्वर निरुपम तेव्हां त्याची गुणकथाही निरुपमच. हरिकथेचे माहात्म्य तुकोबांनी आपल्या अनेक अभंगांत उत्कृष्ट रीतीनें वर्णिले आहे. पुढील दोनच चुटके पहा:-(१) कथा हे भूपण जनांमध्ये सार । तरले अपार बहुत येणें ॥ १ ॥ नीचिये कुळींचा उंचा वंद्य होय । हरीचे जो गाय गुणवाद ॥ २ ॥ देव त्याची माथां वंदी पायधूळी । दीप झाला कुळी वंशाचिये ॥ ३ ॥ त्याची निंदा करी त्याची कुष्टवाणी । मुख संवदणी रजकाची ॥ ४ ॥ तुका म्हणे नाहीं चोरीचा व्यापार । विठ्ठलाचे सार नाम ध्यावें ॥ ५ ॥ (२) कथा दुःख हरी कथा मुक्त करी । कथा याचि बरी निगोबाची ॥१॥ कथा पाप नाशी उद्धरिले दोषी । समाधि कथेसी मूढजना ॥२॥ कथा तप, ध्यान, कथा अनुष्ठान । अमृत हे पान हरिकथा ॥३॥ कथा मंत्र, जप, कथा हरी तापमान कांप कळिकाळासी ॥ ४ ॥ तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान । समाधि लागोन उभा तेथें ॥५॥ ६. पशु+उपमा धेनु+साम्य-कामधेनूची उपमा. कामधेनू देवांचे मनोरथ पूर्ण करणारी असली तरी ती पशूच; तेव्हां भगवत्कथेला पशूपमा दिली हे मी योग्य केलें नाहीं. ७. कथांला पशूपमा दिली हे कृत्य. ८. पंडित लोकांस. कथेला पशूची उपमा दिली ही माझ्याकडून चूक झाली. धेनूची उपमा मी कथेस देऊ नये व असे करतांना मी पंडितांचा सल्ला घ्यावयाचा होता. पंत व त्यांचे कवितादूषकः-मोरोपंतांच्या वेळेस त्याच्या कवितेस क्षुल्लक गोष्टीवरून नांवें ठेवणाऱ्या पंडितांस अनुलक्षून व्याजोक्तीने त्यांनी लि. हिले असावे. कारण लगेच पुढे खुबीने त्यांनी आपल्या उपमेचे नम्रतापूर्वक मंडण केलें आहे. १४ मो० के०