या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत पंतांच्या वेळेस त्यांच्या 'सत्कृती'ला नांवें ठेवणारी पंडित मंडळी पुष्कळ होती. त्यांस पंतांनी आपल्या काव्यांतून मधून मधून फटकारे दिलेले आढळतात. याविषयी विशेष मजकुर प्रस्तावनेंत पहावा. कै० माधव चंद्रोवा ह्यांनी 'सर्वसंग्रह' मासिकपुस्तकद्वारा पंतांच्या काव्यांचा उद्धार करण्याचे आरंभिल्यापासून पंतांच्या काव्यांवर बऱ्याच विद्वानांनी निरनिराळ्या गोष्टींसंबंधाने आक्षेप घेतले आहेत. काहींच्या मतें अनुप्रास, यमकें इत्यादि अलंकारांचा थाटमाट तेवढा त्यांच्या काव्यांत दृष्टीस पडतो, खरें कवित्व त्यांत मुळीच नसते; काहीजण मोरोपंतांनी नेमकी अक्षरें साधून आपलीं रामायणे व कांही इतर काव्ये रचिलीं व अशा रीतीने त्यांनी आपल्या बुद्धीचा अपव्यय केला म्हणून कवीवर रुसले; कित्येक मोरोपंतांनी व्यासवाल्मीकादि कवींच्या काव्यांची नकल केली, त्यांच्या कल्पना सर्व व्यासवाल्मीकांच्या ग्रंथांतल्या अतएव उष्टया म्हणून त्याजवर रागावले; कांहीजणांनी मोरोपंत केवळ भाषांतरकार, त्यांच्या काव्यांत सत्कवींत असणारे काव्यगुण दिसून येत नाहीत, खरें कवित्व आंगी असते तर त्यांनी पुराणग्रंथांचे केवळ अर्थवाहकत्व न पत्करतां कालिदास, भवभूतीप्रमाणे त्यांनी स्वतंत्र ग्रंथरचना खचित केली असती, म्हणून त्यांची कविता रसिक वाचकांच्या आदरास पात्र नाही असे ठरविलें; कांहीजण पंतांच्या काव्यांत भक्तिरस तेवढा असून तोही पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या भक्तिरसाच्या मासल्याचा आडदांड व वेपर्वाईचा असतो म्हणून नाके मुरडतात; व कांहीं कांही तर मोरोपंतांना अनेक प्रांतांतील भाषांचे ज्ञान चांगले होते व मराठी व संस्कृत या दोघींसंबंधाने तर त्यांचा हातखंडा होता पण त्यांनी त्यांचा चांगला उपयोग केला नसून पुष्कळ संस्कृत शब्द, सबंध संस्कृत वाक्ये, लांब समास व परक्या भाषेतले शब्द या सर्वांचा आपल्या काव्यांत गोंधळ करून निरनिराळ्या उंच व हलक्या कापडांचे तुकडे एकत्र करून शिवलेल्या एखाद्या भिक्षेकऱ्याच्या गोधडीप्रमाणे त्यांनी आपली कविता विरूप, नीरस व क्लिष्ट मात्र केली ह्मणून तिचा तिरस्कार करितात. वरील टीकाकारांपैकी एकदोघांचे अभिप्राय वाचून मोरोपंतांच्या भक्तांना करमणूक होईल व मोठमोठी मंडळी चांगला शोध न करितां कधी कधी विलक्षण विचार (विकार :) कसे प्रकट करितात ते दिसून येईल. म्हणून ते संक्षेपाने पुढे दिले आहेत:-(1) Moropant is decidedly the degenerate poet of the degenerate Sanskrit age, when the Brahmins betray a great want of invention, arrangement and originality, when whatever is old is admired immoderately and when unable to write original treaties in any department, but actuated by be desire of writing, they reproduce the sentiments of the old Sanskrit poca in Marathi, for the good of the ignorant as they allege. Read Moroparcs as much as you like, you will find nothing new, but the stale thoughts are elaborate, grandy, artificial style, and loaded with ornaments which cannot put disgust a reader of taste.' (Elphinstone School-paper. December 1863) यांतील सारांश:-संस्कृत कविता ज्या काळी अगदीं नीचस्थितीस जाऊन पोंचली त्या काळच्या हलक्या कवींपैकीं अगदी हलका कवि मोरोपंत हा होय. त्या कालच्या ब्राह्मण लोकांत कल्पना शतरचनाचातुर्य व स्वतंत्र स्फूर्ति हे गुण मुळीच आढळत नसून लोकांत प्रत्येक जुन्या