या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. 60 असेंहि उपदेशिती गुरु रहस्य मंदा 'रुचे अत्युत्कृष्ट असें त्याने स्वमतीने निवडून काढिलें तें तें न्यूनच आहे असे वाटू लागले असा भाव दाखविला. असें होतां होतां अखेरीस भगवत्कथांचे अनिर्वाच्य महत्व इंगित होण्याकरितां पंतानें चमत्कार केला. मी स्वमतानें काढिलेले उपमान उपमेयाशी लावून पाहतां मला मंदाला वर दिसते, परंतु हे ज्ञात्या जनाला मान्य होण्याजोगें नाही. मी जर पंडितांस विचारिलें असतें तर याहून उत्तम उपमान त्यांनी मला दाखविले असते! मी त्यांजला विचारिलें नाहीं हे माझें औद्धत्य आणि यामुळे भगवत्कथांस सम्यक् उपमान प्राप्त झाले नाहीं ! ! इत्यादि तर्क फारच उत्कृष्ट रीतीने वर्णनीय वस्तूचे महत्व मात्र इंगित करितात.' [मोरोपंतावरील निबंध-पृ० ६८-७३.] ९. 'उद्धतें' हे साभिप्राय विशेषण आहे, म्हणून हा 'परिकर' अलंकार समजावा. या केकेचा अर्थ हंसकृत निबंधांत दिला आहे तो असाः- भगवत्कथांला कामधेनूची उपमा दिली ती चांगली दिसते; परंतु मी मंदमति आहे; यास्तव ती मला नरी चांगली दिसली तरी ती विद्वज्जन अथवा साधुजन ह्यांच्या कानास गोड लागणार नाही. ते ही उपमा पाहून नाक मुरडतील. कां तर, भगवत्कथा निरुपमा आहेत; त्यांजला जगत्रयांत उपमानच नाही, इतकी ज्यांची महती, त्या कथांना पशूची (कामधेनूची) उपमा मी योजिली ! हर हर ! हे कांहीं बरोबर झाले नाहीं !! म्यां उद्धताने पंडितजनांलाही या संबंधाने विचारिलें नाहीं! विचारिले असते तर मी योजिलेल्या उपमानापेक्षा उत्तम सम्यक् उपमान त्यांनी मला सांगितले असते!' केकासौंदर्यः-'भगवत्कथांची महती अनिर्वाच्य आहे हा अर्थ कवीने व्यंग्याने सूचविला असून, ह्या पद्यांत व्यंग्यार्थासच प्रधानत्व आहे. वाच्यार्थापासून, कवि मंदमति, अविद्वान् आहे; त्याला उपमादि योजना माहीत नाहीत; पंडितांला विचारून तो कविता करीत असतो इत्यादि गोष्टी दिसतात. पण हा कवितेचा अर्थ नाही हे कोणीही कबूल करील. प्रबंधरचना पहातांना स्पष्टच आहे की, वरपासून भगवत्कथांचे महत्वच कवि वर्णन करीत आला आहे आणि तोच ओघ ह्या केकेंतही उघडच दिसतो. तेव्हां अशा ठिकाणी कवीच्या बुद्धीचें व विद्येचे वर्णन असण्याचा अगदीच संभव नाही. ते वर्णन, इष्टार्थ जो भगवत्कथामहत्व या गोष्टीस पुष्ट करण्यापुरतेच कवीने घातले आहे. भगवत्कथामहत्ववर्णनाच्या संबंधानें, नैषधकारांच्या डोक्यावर बसणारा पंडित असला की तो मोरोपंतासारखीच आपणाकडे लघुता घेऊन, तें वर्णन करील, तेव्हांच काव्यचमकीन इष्टार्थसिद्धि होईल. वरील पद्यांत पंतानें स्वलघुता दाखविली आहे, ह्यावरून तो पंडित नव्हता असें कालत्रयीं म्हणतां यावयाचें नाहीं व असें म्हणणाऱ्यास पंताच्या कवितेचा अर्थ समजला नाहीं असेंच म्हटले पाहिजे.' [मोरोपंतावरील हंसकृत निबंध-पृ० ६८-७०.] १. अन्वयः-'निजस्तव जसा तसा रुचे, वंदारुचे अगुण न घे' असेंही रहस्य गुरु मंदा उपदेशिती; म्हणोनि (हे देवा!) निगमस्तुता तुला भलतसें वानितों, परंतु मी हृदयी महाजनभयास मानितों. प्रास्ताविक:-कथेला कामधेनूची उपमा देऊं नये तर खरीच. पण दिली, त्याला एक कारण आहे. ते कोणते हे या केकेंत कवि सांगतान २. थोर पुरुषः साधु; उपदेशक. ३. अज्ञान मनुष्याला, मूखोला. केकार्धाचा अर्थ: