या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काजळे, व प्रसिद्ध 'लावणी' कार रामजोशी सोलापुरकर हे पंतांचे स्नेही असून त्यांच्या आर्यचे मोठे भोक्ते होते. या व इतर मंडळीशी पंतांचा पत्रव्यवहार असून पंत आपली काव्ये लेखनार्थ यांजकडे पाठवित. विठोबादादा व त्यांचे पुत्र मैराळवावा ह्यांस पंतांनी पुष्कळ पत्रे पाठविली आहेत त्यांवरून पुष्कळ नवीन गोष्टी कळतात. उभयतां पितापुत्र प्रेमळ भगवद्भक्त असून कीर्तन करित. यांच्या घराण्याशी पंतांचा फार घरोवा असे. दादांस तर पंत गुरुतुल्य मानीत असून काव्यरचनेच्या कार्यात ते त्यांच्या पुण्याशीर्वादाची नेहमी अपेक्षा करित. स्फुट काव्ये भाग १ यांत छापलेली 'विठ्ठलभक्तस्तुति' विठोदादांची स्तुति होय. दादांची वालविधवा वहिण जिजाबाई हीही भगवत्सेवापरायण होती. तिला पंत मातोश्रीतुल्य समजत. दादांना पाठविलेल्या प्रत्येक पत्रांत पंतांनी तिला नमस्कार लिहिले असून तिजवर त्यांनी एका पत्रांत पुढील आर्या रचिली आहे:-भवभय जायास्तव त्या नमितों मी सर्वकाळ जीजीतें, । वहु भूतदया हृदयीं, रंकाची सर्व काळजी जीतें. ॥ रामजोशी हे पूर्वी तमाशा करित. ते पुढे एकदां वारामतीस तमाशा घेऊन गेले. नटाचे तोंड पहाणे शास्त्रविरुद्ध ह्मणून पंत त्यांच्या तमाशास जात नसत. मंडळीच्या आग्रहावरून पंत जोशीवोवांचें कवन ऐकण्याकरितां एकदां माडीवर बसले. ही गोष्ट मंडळीने जोशीवोवांस कळविली. तेव्हां त्यांनी डफावर थाप मारिल्यापासून बोधवैराग्यपर सुंदर लावण्या रचून ह्मणण्याचा सपाटा चालविला. त्या ऐकून पंतांचें मन प्रसन्न झाले व त्यांनी माडीवरून खाली येऊन जोशीबोवांची स्तुति केली व तुमची वाणी रसाळ आहे, नटास पुढे करून तमाशा न करितां कीर्तन करित जा असा उपदेश केला. त्यावर कीर्तनाचे साहित्य आपणाजवळ नाही असें जोशीबोवांनी सांगितल्यावरून 'मी तुमच्यासारख्या कीर्तनेच्छूकरितांच काव्य करित आहे. त्याचा उपयोग तुह्मी कीर्तनांत करावा' असें पंत ह्मणाले. तेव्हांपासून जोशीवोवांनीं तमाशा सोडून कीर्तन करण्यास आरंभ केला. पंतांची आर्या जोशीबोवांच्या कीर्तनामुळेच चहुंकडे फार प्रसिद्ध झाली. यासंबंधी एक अशी आर्या आहे: | जैसी जनकें दिधली सच्चिद्धन राम जो सिता त्याला; । } तैशी मयुरे दिधली आर्या ही रामजोसि तात्याला. ॥ पंतांचे आईवाप त्यांनी अनुशासन पर्व लिहिण्यापूर्वीच ह्मणजे पंत सुमारे ४०।४५ वर्षांचे असतांनाच वारले. विठोबादादांस पाठविलेल्या पत्रावरून पंतांनी आपल्या मुलींस व सुनांसही लिहिण्या वाचण्यास शिकविले होते असे दिसते. त्यांची नातसून रघुकिरातादि काव्ये पढली होती असे सांगतात. स्त्रीजातीविषयी पंतांचे विचार फार थोर होते. त्यांचे पन', रामकृष्णपंत हेही चांगले विद्वान् होते. त्यांचे चुलत सासरे प्रसिद्ध वयाकरणों व नैयायिक विठ्ठल पाध्ये यांनी पंढरपुरास त्यांना राहण्यास वाडा बक्षिस दिला व भागानगरचे राजे चंदुलाल यांजकडून इ. स. १८२६ त सुमारे पाचशे रुपये नाचताराळ गांव इनाम देवविले. हेच विठ्ठल पाध्ये पूर्वी कवित्वशक्तीसंबंधाने पंतांशी मत्सर करित असत. 'मोरोपंतच काय आर्या करितात, मीही करितों' असे यांनी एकदा