या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. १६५ ह्मणे-'स्वकृतिच्या उणें किमपि एक वर्णी न हो; असें तुज कधीं बरें विगतशंक वर्णीन हो !'-। येथें ॥ (अ. वि.) मोरोपंताच्या काव्यांत पर्यायोक्तीची उदाहरणे पुष्कळच सांपडतात त्यांतील थोडी येथे दिली आहेतः-(१) जें सासुरा मुली पितृगमनिं करिति तेहि काननौके तें ॥ (वन० ६-६६) (२) भूप म्हणे 'सति ! जातों निर्लज्ज, कृतघ्न तुज विकायाला । राक्षस, पिशाच येतिल मजपाशीं कठिणपण शिकायाला' ॥ (हरिश्चंद्रख्यान अ० २ गी० ३८) (३) तो हा वैदर्भि! जेणे प्रथमचि तुजला लागला बोळ खावा ॥ (कृष्णविजय ५५.३९) (४) त्या संज्ञप्ती अश्वी शिरला विघ्नार्थ तत्क्षणीं योगी । जो गीष्पतिचा शिष्य, त्रिदशांचा नाथ, तो तितें भोगी ॥ (हरिवंश ४४-३७) ५ (पर्यायोक्तीचे थोरलें व सुरेख उदाहरण) 'जो रथयूथप यूथपवीराधिकलक्षणप्रभावास । ज्याच्या विसरत सोसित नव्हतासि पल क्षण प्रभावास ॥ ४७ ॥ इंद्रा उपेंद्रसा जो आश्रय दुर्योधना महातेजा । पुरुषहि विसरत होते पक्ष्ये चाळावया पहाते जा ॥ ४८ ॥ ज्याच्या दिग्विजयी सुरनर मानवले सुयुद्धयज्ञांनीं । दाता नित्य ब्राह्मणपूजक शुचिशीलरक्षक ज्ञानी ॥ ४९ ॥ जो सहज-कवच-कुंडल-मंडित पंडितजनी असामान्य । सूत म्हणति परि कैसा होईल तशा कुळी असा मान्य ? ॥ ५० ॥ भवदवन करित होता बहुभास्वर थावरूनि हात रणीं । वाटे जणो उतरला ब. हुधा स्वरथावरूनि हा तरणी ॥ ५१ ॥ राधा धात्री त्याची रविपासुनि मदुदरांत तो आला। ज्येष्ठ भ्राता तुमचा कर्ण तुम्ही सर्व उदक द्या त्याला ॥ ५२ ॥ (स्त्रीपर्व). १. अन्वयः-'स्वकृतीच्या एक वर्णी किमपि उणें न हो, असें विगतशंक तुजहो! [देवा !] कधी बरे वर्णीन' [असें मी म्हणे; अशि आवडी असेचि, अत्यादर कां न करिशि? [हे] स्वभक्तसुरपादपा हरि! सत्या दर नसेचि' प्रास्ताविकः-'सुंदर आणि सम्यगर्थवान् अशा शब्दांनी तुझा स्तव करावा अशी मला इच्छा नाहीं असें त्वां समजू नये; तशी इच्छा मला आहे, परंतु तीही पूर्ण करणारा तंच म्हणून स्वाभिप्राय प्रगट करित होत्साते कवि प्रार्थितात.' (य. पां०-०२३ म्हणे म्हणतों. २. स्व (निज)+कृतिच्या (कवितारूप करणीच्या)=भगवत्स्तत्यात्मक कवितेच्या. ३. अक्षरी. वर्ण शब्दाचे रंग, जाति, व अक्षर असे तीन मुख्य अर्थ आहेत. ४. होवो. ५. गेलेली आहे शंका ज्याची असा, निःशंक होत्साता. अहो! प्रथमार्धाचा अर्थः-देवा! सध्यां मी न अडखळतां बिनचुक असें तुझें स्तवन करण्यास समर्थ नाही, म्हणून असे तुझे स्तवन करण्याची इच्छा माझ्या मनांत होत नाही असे आपण समजू नका. तर मी केलेल्या तुमच्या स्तुतींत एकही अक्षर उणे नसावें असें मी फार इच्छितो. पण तुमच्या कृपेशिवाय ही माझी इच्छा सफळ होणें नाहीं यास्तव माझ्यावर एवढी कृपा कराच, असें कवि द्वितीयाधीत म्हणतो.