या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावली. तुम्ही करुनि दाविली, शिवुनि गल्ल सत्या देरें. । तसें मज करा, कैरांबुज धरा शिरी मावरा ! दिले. यावरून ध्रुवाला फार वाईट वाटून तो रडत रडत आपल्या मातेजवळ गेला. मातेने आपल्यावर ईश्वराची कृपा नाही म्हणून तुला असें दुःख झाले असे सांगून त्याचे समाधान करण्याचा यत्न केला. पण त्यामुळे ईश्वराची आराधना करून त्यास प्रसन्न करण्याचे ध्रुवाच्या मनांत आले व तो अरण्यांत निघून गेला. तेथे त्याला नारदानें मंत्र सांगून जप कर म्हणजे तुला ईश्वर भेटेल असे सांगितले. शेवटी ध्रुवाची भक्ति पाहून ईश्वर त्याला प्रसन्न झाले व 'काय पाहिजे ते माग' असे म्हणाले. ईश्वराची गांठ पडली तेव्हां ध्रुवाला देवाची स्तुति करण्याची इच्छा झाली, पण काय बोलावें, कशी स्तुति करावी, हे त्याला कळेना म्हणून भगवान् विष्णूंनी त्याच्या गालास आपल्या हातांतील शंख लावून आपले स्तवन करण्याचे ध्रुवाला सामर्थ्य दिले; व शेवटीं अढळपद देऊन आपण गुप्त झाले. अन्यत्र पंत हेच मागणे देवाला मागतात:-'त्वं चेदद्य प्रसादं ध्रुव इव कुरुषे देव! बाले मयीह स्तोतुं स्यामेव कामं निपुणतरकविः श्राव्यभव्यप्रबंधः । कः स्तोता तात! जातस्तव जगति विनानुग्रहाद्विप्रदेवेष्वन्येष्वप्यब्जयोनिः प्रभुरपि भवतोऽनुग्रहादेव सुज्ञः ॥ [मोरोपंतकृत स्फुटकाव्ये, पांडुरंगस्तोत्र-१६]. पंतांनी एक सुरस साकीबद्ध 'ध्रुवचरित्र' लिहिले आहे. त्यांतील पुढील साक्यांवरून या केकेंतील कथासंदर्भ विशेष स्पष्ट होईल:-'ध्रुवमतिजाड्य ब्रह्ममयदरें स्पशुनि गाल हरी तें। वात्सल्य असे परिसुनि जनहो हर्षुनि गाल हरीतें ॥ ५८ ॥ जागविली निजली होती त्या बाळाची जी वाचा । बोध दिला ऐसा लाजावा ज्या महिमा जीवाचा ॥ ५९ ॥ परमानुग्रह करुनि शिकविलें प्रभुनें भाषण मग तें । किति वर्णावें अमृत कसें हो त्या सूक्तिपुढे तगते ।। ६२ ॥ ८. स्तवनाविषयी ९. अभिरुचि.. १. गाल. २. शंखाने. अन्वयार्थः-ध्रुव स्तवनिं (स्तुति करण्याविषयीं) आवडी (आवड, उत्कट इच्छा, अभिरुचि) धरि (धरिता झाला) म्हणोनि (म्हणून) तुम्हीं दरें (शंखाने) गल्ल शिवुनि (गालास स्पर्श करून) अत्यादरें (मोठ्या आदराने ती आवड] सत्या (खरी) करून दाविली (करून दाखविली). प्रथमार्धाचा अर्थः-ध्रुवाने परमेश्वराचे स्तवन करण्याविषयीं पोटांत अत्युत्कट इच्छा बाळगली म्हणून भगवंतांनी त्याच्या गालाला आपला शंख लावून मोठ्या आदराने त्याची ती आवड पर्ण केली, त्याच्या आवडीचे फळ त्याला दिले. जसें ध्रुवाच्या गालाला शंखाचा स्पर्शक - तुम्ही त्याला आपली स्तुति करण्याविषयीं समर्थ केले तसेंच मलाही आपली स्तति करण्यास सामर्थ्य द्या. ही मागणी पंतांनी आपल्या कवितेत आणखी एक ठिकाणी केलेली आढळते. 'स्तोतुमनसमकरोः किल गल्ले स्पृष्ट्वा ध्रुवं ध्रुवं दरतः । तद्वन्मामादरतः कुरु पुरुकरुणार्य ! निजनुतौ निपुणम् ॥१८॥' [कृष्णस्तवराज-पृ० २३८.] ३. करकमलः व्यु:-अंबु (उदक ज (झालेले)-उदकापासून झालेले. ह्मणजे कमल. ४.मा (लक्ष्मी)+वरा! (वल्लभा!) लक्ष्मीच्या पते! 'इंदिरा लोकमाता मा क्षीरोदतनया रमा' इत्यमरः. अन्वयार्थ:-हेमावर (लक्ष्मीपते) वराभयपरा! (वर आणि अभय देण्याविषयीं तत्पर) अशा देवा ! शंख गई घा] शिरी (डोक्यावर) करांबुज (करकमळ) धरा. देवा! तुम्ही लक्ष्मीपति अर्थात