या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. मृत्यु, प्रसादचतुरा! केसा तरि करा बैरा हा जन. ॥ ६३ पताल असे तीन लोक) त्याची म्हणजे जगत्रयांनी कर्तव्य जी नमस्क्रिया (नम ती जगत्रयनमस्क्रिया, त्याला भाजन-पात्र. तीन लोकः-'यू', 'अंतरिक्ष व 'पृथ्वी' तीन लोक वेदांत सांगितले आहेत. जेथें सूर्यचंद्रादि प्रकाशगोल आहेत तो 'यू' लोक सर्वांत उंच आहे. जेथे वातावरणांत मेघ असतात तो अंतरिक्ष लोक त्याच्या खाली असून सर्वांत खाली आपली पृथ्वी आहे. या तीन लोकांनाच 'स्वः' 'भुवः' व 'भूः' असें अनुक्रमाने म्हणतात. पूर्वी अंतरिक्ष हे जलमय आहे असे समजत. पाताळ लोकाचा उल्लेख वेदांत मुळीच नाही. 'भूः' ' भुवः,' व 'स्वः' याशिवाय 'धूलोकावर 'महः', 'जनः' व 'तपः असे तीन लोक असून त्यांच्या पेक्षाही वरचा 'सत्यं' म्हणून सातवा लोक मानतात. तृतीयचरणार्थः-भगवंताच्या पायाची गोष्ट घटकासर राहूं द्या. त्याच्या पायाच्या धूलिकणासही जगत्रयाने नमस्कार करावा अशी त्याची योग्यता आहे. धूलिकणाची जर ही योग्यता, तर पदकमलाची जास्ती व करकमलाची त्याहूनही जास्ती. म्हणून तुमच्या पायाचा एखादा धूलिकण जरी माझ्या मस्तकावर ठेवाल तरी मी कृतार्थ होईन. १. प्रसाद करण्याविषयी चतुर जे तुम्ही त्या ! अनुग्रहकुशला! खुबीदार शब्दयोजना:-येथे 'प्रसादचतुरा!' हे संवोधनपद फार खुवीदार आहे. प्रथम माझ्या मस्तकावर कर ठेवा अशी प्रार्थना केली, नंतर इतक्या मानास आपण पात्र नाही असें। समजून पदाप्रति प्रणाम करतो असे म्हटले. पण हे दोन्ही उपाय देवाला आवडतव नसतील अशी आशंका धरून पंतांनी 'प्रसादचतुरा' असे पद योजिलें. चतुर्थ चरणाचायें अर्थः-देवा ! तूं चतुर आहेस, तूं हवी ती तोड शोधून काढ आणि मला पावन कर द जो चतुर आहे तो कोणत्या ना कोणत्या तरी उपायांनी स्वभक्तांचे मनोरथ पूर्ण कतिर्षे "लच-असे तात्पर्य. २. कोणत्या तरी प्रकाराने (=कसा जकलेप देवत्सर असे करण्याविपरिणिक वर्णन प्रवताऱ्याच्या वर्णनाशी चांगले नसेल). पवा : तुम्ही प्रसाद या चतुर आहां, तुम्हाला मा मंदाने सुचवावे असे काही नाही, म्हणून तुम्ही कोणत्या तरी प्रकाराने (तुमच्या मनास योग्य दिसेल त्या वरीलपैकी किंवा दु. सरा एखादा योग्य दिसेल त्या उपायाने) माझें कल्याण करा हा कवीचा हृद्तार्थ. “पाडुरंगस्तोत्रां' तील पुढील श्लोक या केकेसंबंधाने वाचनीय समजून येथे दिला आहे:-प्रहादध्रुवनारदर्षिशुकभीष्मव्यासदाल्भ्यादि जे । ते ज्ञानी सुकृती तयांसि दिधलें तें तों न माते दिजे ॥ वश्याजामिळपूतनाघदनुजव्याधादिकां में दिलें । तें द्यावें फल त्याहुनी बहुत मी दुष्कर्म संपादिलें ॥ १२ ॥ ३. कृतार्थ, गतपाप. पंतांनी भगवंताच्या पदाब्जरजाचे दुसऱ्याही केकेंत वर्णन केले आहे. भगवंताच्या रजाचे माहात्म्य भागवतांत पुढील प्रकारे सुंदर वर्णिले आहे:-यत्पादपांसुबहुजन्मकृच्छ्रतो धृतात्मभियोंगिभिरप्यगम्यः. [दशमस्कंध.] तसेंच शंकराचार्यांनी 'सौंदर्यलहरी'त भगवतीच्या चरणकमलाचे माहात्य पुढीलप्रमाणे केले आहे:-तनीयांसं पांसुं तव चरणपंकेरुहभवं, विरिंचिः संचिन्वन् विरचयति लोकानविकलम् । वहत्येनें शौरिः कथमपि सहस्रेण शिरसा, हरः संक्षुभ्यैनं भजति भसितोलनविधिम् ॥ २ ॥' येथे 'सारालंकारमिश्रित प्रौ. ढोक्ति अलंकार जाणावा.' [य० पां०-पृ० २३८.] - १५ मो० के०