या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत . तुम्ही करुनि दाविला ध्रुव कृतार्थ जैसा दरें, ___तसेंचि जरि योजिलें तुमचिया मनें सादरें, । असो; विहित तें करा; परि बरोबरी त्यासवें ____ नसे उचित; तो महाप्रबळ, वंदिजे वासवें. ॥ १. अन्वयः-तुह्मीं दरें जैसा ध्रुव कृतार्थ करुनि दाविला, तसेंचि तुमचिया सादरें मने जरि योजिलें तरी] असो; विहित तें करा, परि त्यासवें बरोबरी उचित नसे, तो (ध्रव) महाप्रबळ, वासवें वंदिजे. प्रास्ताविकः-मला कृतार्थ करावयाला मी आपणाला तीन चार उपाय सुचविले तरी आपल्या मनांतून मला ध्रुवाप्रमाणेच कृतार्थ करणे असेल तर एक वेळ तुह्मास पुनः सांगतों की तसे करण्यास आपण मुखत्यार आहांत पण तितकी माझी योग्यता नाही, अशा अभिप्रायाने कवि प्रार्थना करितात. २. दाखविला. 'दाखविणे' ह्या अर्थी 'दावणे' हा शब्द कुळंबी वगैरे खालच्या प्रतीच्या लोकांतून हल्ली योजलेला आढळतो. ३. कृतकार्य. देवांनी ध्रुवाला भगवत्स्तुती करण्याचे सामर्थ्य देऊन अढळ पदी नेऊन बसविले. ४. दयायुक्त, आदरयुक्त. प्रीतियुक्त. प्रथमार्धाचा अर्थःतुम्हीं ध्रुवाच्या गालाला शंख लावून त्याला जसे स्वस्तुति करण्याचे सामर्थ्य दिले न त्याला संसृतिबंधांतून मुक्त करून अविनाश पद दिले, तशा प्रकारची मजवर कृपा करावी म्हणून जर आपण दयायुक्त अंतःकरणाने योजना केली असेल तर असो. ५. तसे होवो. मजवर आपण कृपा करा. ६. योग्य. तृतीयचरणार्थः-तुम्हांला जे योग्य देसेल, ज्यांत माझें हित आहे असे आपणांस वाटत असेल ती गोष्ट आपण खुशाल रासी (हार परंतु. हा फारशी शब्द आहे. 'सुरतरु करिल बरोबरि न प्रभुपटरेणुधर करीतेशी माझी तुलना करणे कदापि योग्य है। १५.) ९. त्याबरोबर, त्याशी.ए आवाच्या योग्य ध्रुवाचा परमेश्वराच्या का असलेली अनुपनेय भक्ति व त्याचा अधिकार ही फार मोठी; तेव्हां त्याच्या वैराग्यादि सामर्थ्याशी माझ्या अल्प सामर्थ्याची तुलना करणे अत्यंत अनुचित होईल. म्हणून आपण मजवर ध्रुवाप्रमाणे अनुग्रह करावा इतकी माझी योग्यता नाही. आम्हां दोघांत जमीनअस्मानाचें, मेरुमोहरीएवढ्या प्रमाणाचे अंतर आहे. १०. अतिशय शक्तिमान्. भक्तिज्ञानवैराग्यादि शक्तींनी परिपूर्ण. ११. इंद्राने व्यु:- वसुनि (द्रव्याणि) संति अस्य स वासवः ज्याचे भांडार विपुल आहे तो वासव. चतुर्थचरणार्थ:- . देवा! ध्रुव षड्गुणैश्वर्यसंपन्न व भक्तिज्ञानवैराग्यादि शक्तींनी परिपूर्ण असा असल्यामुळे सर्वशक्तिमान् इंद्र देखील त्याला पूज्य मानून वंदन करितो. प्रत्यक्ष देवेंद्राने वंदन करावें एवढा मोठा ज्याचा अधिकार त्याच्याशी बरोबरी करणे देवा! मला कसे बरे शोभेल ? विचारसादृश्यः-ह्या संबंधाने तुलना करण्याजोगा तुकारामाचा एक अभंग आहे. ता हा:-नाही साजत हा मोठा । मज अळंकार खोटा ॥१॥ असे तुमचा रजरेण । संतापायींची वाहाण ॥ २ ॥ नाही स्वरूपी ओळखी । भक्तिभाव करी देखीं ॥ ३ ॥ नाहीं शून्याकारी । क्षर