या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. १७३ कशी तुळितसां तुमी प्रेकट मेरुशी मोहरी? यांच्या वचनावर किंवा भगवंताच्या ठायीं त्याची केवढी दृढ निष्ठा, आणि केवढे उग्र त्याचे तप, म्हणून सारे विश्व जी ध्रुवाची स्तुति करितं त्याला तो अत्यंत पात्र आहे. व्या०:- पहिल्या चरणांतील 'तो'चा संबंध विश्वासाकडे आणि दुसऱ्या चरणांतील 'तो'चा संबंध ध्रुवाकडे. १. तुलना करितां, तोलतां. ध्रुवाची आणि आपली तुलना (घटना) अत्यंत अयोग्य आहे- ध्रुवाशी आपले सादृश्य बिलकुल नाहीं असें दर्शविले आहे ह्मणून हा विषम अलंकार होय. ( अथ विषमम्-घटनानहयोर्यत्र घटना विषमं मतम् । केयं कनकवर्णाङ्गी सुन्दरी कामिनीमणिः । क पतिस्तादृशो वक्रः कीदृशी घटना विधेः ? ॥१२१॥ इष्टार्थोद्यमनाद्यत्र नेष्टानाप्तिश्च केवलम् । अनिष्टस्याप्यवाप्तिश्चेदपरं विषमं मतम् ॥ पाचालीसङ्गसंमोदकाङ्ख्या रङ्गमन्दिरम् । प्रविष्टः कीचकस्तत्र सद्यो मर्दनमन्वभूत् ॥ १२३ ॥ [ मंदारमरंदचंपू-पृ० १३२.] 'तें विषम वर्णिती बुध जेथे संबंध अननुरूपांचा । कोठे ही मृदुलांगी कोठे तो प्रखर ताप मदनाचा ॥ कार्य विरूप घडे जरि तरि दुसरें विषम तज्ञ ह्मणतात । श्यामा ही तरवारी प्रसवे अति शुभ्र कीर्ति जगतांत ॥२॥ इष्टार्थव्यापारें घडे अनिष्टहि तिजे विषम होय । भक्ष्यार्थ सर्पपेटकिं मूषक शिरतां तयाचि अहि खाय' ॥ ३. (अ. वि.) हा अलंकार समाच्या उलट आहे. पहिल्या व दुसऱ्या 'सम' अलंकाराच्या प्रकारांविरुद्ध विपमाचे अनुक्रमें पहिला व दुसरा हे प्रकार आहेत. 'जेथें परस्परांशी अननुरूप म्हणजे अयोग्य अशा गोष्टींचा संबंध वर्णिला असतो, कारणाच्या गुणाचे क्रमाविरुद्ध कार्याची उत्पत्ति वर्णिली असते, किंवा इष्टा स उद्देशून कांहीं कृत्य करणारास त्यापासून इष्ट अर्थाची प्राप्ति न होतां उलट अनिष्ट अर्थ प्राप्त होतो असें वर्णन असते तेथें विषम अलंकार होतो.' विपमालंकाराचा दुसरा प्रकार विभावनेच्या पांचव्या प्रकाराशी फार सदृश दिसतो. परंतु कार्य व कारण यांजमध्ये एक निवार्य आणि दुसरें निवारक असा विरोध असल्यास पांचवी विभावना आणि तसे नसून केवळ कार्यकारणांत गुणवैषम्य असल्यास विषम होतो' असा दोहोंत भेद आहे. विषमालंकाराची उदाहरणे:- (१) 'क्लीब म्हणुनि पाठविलें मन माराया प्रियेस हाकेला । तों तें तेथेंचि रते पाणिनिने सत्य घात हा केला' ॥ (अ. वि.) (२) ' मदनशत्रुशरासन हे महा । मदनमूर्तिच केवळ राम हा ॥ करिल सज्ज कसा धनु आपण । अहह! ! दारुण! तात तुझा पण' ॥ (वामनपंडित ), (३) 'देवी ह्मणे सखि! धरणि! कांत पडुनि धूळिउपरि मळला गे; । त्या देवा लागावे रज, नवनव ज्यासि सुपरिमळ लागे॥ ( मोरोपंत-हरिश्चंद्राख्यान ), (४) ज्यावरि करीत होत्या बहुतचि दाया दया, सदा सत्व । जीचें साध्वी शतमत, तीचा दायाद यासि दासत्व ॥ रविनें न निरखिली जे स्पर्शलि वातें विशंक न व्यजनें । अवलोकिली पुरी ती ओढुनि नेतां असंख्य नव्यजनें' ॥ (हरिश्चंद्राख्यान ), (५ । 'चित्तीं ह्मणे नृप-अहा चवरी ती झाडणीच की केली। मोळविक्याने काष्टं फोडाया असिलता की नेली' (आदिपर्व), (६) ' ती मृदुलप्रकृति कैसी दुःसहशोकज्वरासि साहेल ? । राहेल सास