या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. प्रमुख- सा-प्रस-जे अतिप्रिक प्रभुत्व तरि हेच की करुनि दे कृपा दान तें, . स्वसाम्य यदुपार्जने मिरविजे स्वपादानतें, । मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. ३. अहो! या चतुर्थ चरणांत तुल्ययोगिता नामक अलंकार झाला आहे. याचे लक्षण व स्पष्टीकरण केका ५८ पृ० १५६ यांत केले आहे. तुल्ययोगितची आणखी उदाहरणे:-- ( १ ) विटली न वामनाते श्री, अन्याही सती न दीनातें । [सुकतां सिंधु, सराशी लावील कसें महानदी नातें ॥] ( वनपर्व अ० ४ गी० २२१), (२) स्वपतिगळां पहिली श्री जों, साध्वी स्त्रीहि तो वळेचि पडे; । [ते दंपती न डोळे व्यर्थ विना प्रेम बोवळे चिपडे ॥ ] ( वनपर्व अ० ४ गी० २९८), (३) [ भस्म कराया घेउनि गेला तो दैवहतक लंकेला । ] रक्षा स्वकीर्तिला रविकुळदीपा त्याहि गतकलंकेला (वनपर्व अ० ११ गी० १२८), (४) [ निजबंधुवधशोभे वीर नृपति सात्यकीतवें भांडे ।] ज्याच्या नेत्रांतुनि जळ पळ पळ रक्तौघ तनुंतुनी सांडे ॥ ( कर्णपर्व अ० ९ गी० १०). १. अन्वयः- प्रभुत्व तरि हेच की कृपा करुनि तें दान दे, यदुपार्जने स्वपादानतें स्वसाम्य मिरविजे, जरि [प्रसाद ] लाघवा निवारिना मग तो प्रसाद काय? अहो! राघवा! दशमुखानुजा कसे विसरलां? प्रास्ताविकः-मागल्या केकेंत भक्तजनांवर अनुग्रह करितांना प्रभु अधिक उणे पाहत नाही असा जो कवीने आपला अभिप्राय दर्शविला, त्याचेंच यांत ते समर्थन करितात. प्रथमार्धाचा अन्वयार्थः- प्रभुत्व ( स्वामित्व ) तरि हेच (ह्यालाच ह्मणावें) की कृपा करूनि तें दान दे ( भक्तांवर दया करून ते प्रभुत्व असें देणे देते की ) यदुपार्जने ( ज्या दानाच्या प्राप्तीने ) स्वपादानतें (=आपल्या पायांच्या ठिकाणी पूर्णत्वाने नम्र झालेल्यानेशरणागत भक्ताने ) स्वसाम्य (आपली बरोबरी) मिरविजे ( मिरवावी ). प्रभु त्यालाच म्हणावें की जो आपणास शरण आलेल्या दीन भक्ताला असें दान देतो की त्याच्या योगानें तो दीन भक्त लोकांत प्रभूची योग्यता किंवा बरोबरी पावतो: आपल्या आश्रितजनांला स्वतःच्या योग्यतेस चढविणाऱ्यासच प्रभु हे नांव शोभते. इतर केवळ नांवाचेच प्रभु. कविहृद्गतार्थ व केकासौंदर्यः- देवा! तुम्ही मात्र आप ल्यास अनन्यभावाने शरण येणाऱ्या भक्तजनांवर कृपा करून त्यांना आपल्या अगदी बरोबरीने करून सोडतां ह्मणून प्रभु ही पदवी तुम्हांलाच शोभते-असा कवीचा हृद्गतार्थ. येथे आमच्या मार्मिक वाचकांस कृष्णदर्शनास येणाऱ्या भक्त सुदाम्यावर अनुग्रह करून देवाने त्याला आपल्या बरोबरीची संपत्ति देऊन त्याला आपल्या बरोबरीचे करून सोडलें या श्रीकृष्णली. लामृतांतील कथातरंगाची अवश्य आठवण होईल. तसेंच प्रभूचे एकनिष्ठ भक्त मरणोत्तर सायुज्यमुक्ति पावून प्रभुस्वरूपांत मिसळून जातात, हीही गोष्ट ह्यासंबंधीं ध्यानात ठेवण्यासारखी आहे. २. दया, अनुग्रह. ३. स्व (आपले)+साम्य (बरोबरी)=आपली बरोबरी ४. यत+उपार्जने. ज्याच्या लाभानं. ५. मिरविले जात भूषण म्हणन धारण जातें, ६. स्व+पाद+आनते आपल्या पायीं नम्र होणान्याने, शरणागत भक्ताने..