या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्न बहु होतसां, परि कराल हो! बावरें - शिवापरि वैरासवें हृदय, हे न हो बा! वरें। ज्याला वर द्यावयाचा त्याची पात्रता किती आहे याचा अगोदर विचार केला पाहिजे. ८. करायास योग्य, सोईचे. [पात्रतेचा विचार करून दान दिले असतां ते (वर) सुकर (देण्याघेण्याच्या सोईचे ) [व] सदा (नेहमी, निरंतर ) साजिरे ( अनुभविण्याच्या सोईचे, हितकारक) [होतात ]. पात्रापात्रविचार करून दिलेले वर देण्याघेण्याच्या सोईचे व दात्यास व याचकास हितावह असे होतात. माझ्या योग्यतेप्रमाणे मला वर द्या हे कवीचें भगवंताला सविनय मागणे. ९. सुंदर, हितकारक. दानाचा पात्रापात्रविचारः- 'योग्यं योग्याय दातव्यम्' या म्हणीप्रमाणे प्रत्येक मनुष्याची योग्यता पाहून त्याला दान दिले असतां त्यापासून त्याचे हित होते, योग्यतेपेक्षा मोठा वर दिला तर त्यापासून अनर्थ होण्याची भीति असते. कवीने ह्या आपल्या विधानाचें समर्थन पुढल्याच केकेंत केले आहे. पौराणिक इतिहासाचे वरवर अवलोकन करणाऱ्या वाचकांस सुद्धा कवीच्या वरील म्हणण्याची सत्यता कळून येईल. रावण, कुंभकर्ण, विभीषण, भस्मासुर, प्रल्हाद, बलि इत्यादिकांची उदाहरणे कव्युक्तिपोषक आहेत. (१) पात्रापात्रविचारोऽस्ति धेनुपन्नगयोरिव । तृणात्संजायते क्षीरं क्षीरात्संजायते विषं ' ( सुभाषित). गाईला गवत घातले तर दुग्धोत्पत्ति होते व सर्पाला दूध घातले तरी त्याचे विष होते असा पात्रापात्रविचार करावा. (२) संत विवेकी करिती पाहुनि अधिकार जी दया साजे, । ऐसे प्रसाद त्यांचे देती अन्योन्य न प्रयासा जे' ॥ ७० ( दत्तदयोदय-मोरोपंत.) (३) देती प्राकृतहि प्रभु द्रविण की दातृत्व तेणे जरी । हे सर्वत्रहि वर्तते प्रभुवरा पश्वंतरीं स्थावरी ॥ जे देणे शुचि, नित्य, दुर्लभ, सुखाधार, स्वयें वाढतें । मातृ मोक्षदपादवित्त, न धन, स्वामी! दिले वाढ तें ॥ ( पृथुकोपाख्यान-भगवत्वात्सल्यवर्णन ७). व्यु०:- साजिरा (सुंदर). ' सज्ज' यावरून साज, साजणे, आणि त्यावरून 'साजिरा' म्हणजे शोभणारा, सुंदर अशी 'साजिरा'शब्दाची व्युत्पत्ति दिसते. या केकेच्या तृतीय चरणांत विनोक्ति अलंकार आहे. जे दासाला जिरत नाहीं तें व्यर्थ दिले, म्हणजे पचण्याचा गुण असल्याशिवाय दान शोभत नाही असा भाव आहे म्हणून हा विनोक्ति अलंकार होय. १. अन्वयः- [हे देवा!] [तुह्मी] बहु प्रसन्न होतसां, परि वरासवें शिवापरि हृदय बावरे कराल हो! हैं बावरें होणें] बा! [देवा!] वरें न हो (होवो); वृक असा कृतघ्न हे हरा कसे हो! न कळलें ? तुम्हीं [ देवा!] भवमहाहिचा मोहरा भला जगविला. प्रास्ताविकः-अधिकार पाहून वर द्या असें जें कवींनी मागल्या केकेंत म्हटले त्याचें कारण ते यांत सांगतात. प्रसन्न बहु होतसां:-[देवा!] तुम्ही एखाद्यावर प्रसन्न होऊ लागला म्हणजे फारच होता, मग मागेपुढे कांहीं पाहात नाही. २. वेडे, भांबाव. ल्यासारखें. ३. महादेवाप्रमाणे. शिवः-ब्रह्माविष्णुशिव ह्या त्रिमूर्तीपैकी ब्रह्मा हा विश्वमा विष्णु विश्वपोषक व शिव हा विश्वसंहारक होय. शिव हे नांव ऋग्वेदांत आढळत ना