________________
केकावलि. उदारपण तें बरें, सुखवि जें सुपात्रा सदा; पुनः जन्ममरण व स्वर्गनरक अशा रूपाने उद्भूत होतात. परंतु जीवाने अथवा अंतरात्म्याने आपल्या आकाशस्वरूपाची स्थिति धारण करून स्वस्वरूपाकडे लक्ष्य लाविलें म्हणजे त्याच्यांत वासना व कल्पना राहण्याचे कारण जे अबोधरूपी अमंगल अज्ञान ते नष्ट होऊन, त्याचंच मंगळपण म्हणजे शुद्धपण त्याच्याच प्रतीतीस येते, म्हणून त्यालाच शिव (शिव= मंगल) म्हणावे असें शिवाचे लक्षण आहे.' (वेदोक्त धर्मप्रकाश ) शिवाच्या (सांबाच्या) पिंडीच्या पूजेत योगमार्गातील गूढ रहस्य आहे. (शंकराच्या पूजेचा विचार.) 'सांबावर, म्हणजे भ्रूमध्यस्थानी, अर्धचंद्राकृति मनोमय कल्पून, तिच्या मध्यभागी शुद्ध स्फटिकासारखा एक बिंदु कल्पावा, आणि आपले मन त्याजवर स्थिर करावें, म्हणजे दृढ अभ्यासाने समाधी होते. परंतु ती कल्पना कशी करावी हे ध्यानात येण्याकरितां दगडाची अर्धचंद्राकृति शाळुका करावी, आणि तिच्या मध्यभागी बाण स्थापावा, आणि पाण्याची अभिघेकधार धरून, त्या धारेकडे पाहून त्याप्रमाणे मनाची संकल्परूपी धार मनोमय कल्पिलेल्या अर्धचंद्राकृति शाकुंकेतील बिंदूवर स्थिर करावी, व शाकुंकेतील बाणाला पिंडी अथवा लिंग नांव आहे असे समजावें. याचप्रमाणे विष्णु, गजानन, देवी, सूर्य यांच्या लिंगरूपी म्हणजे विंदुरूपी धारणा समजाव्या. लिंग म्हणजे चिन्ह, किंवा भजनीय आकृति.' (वेदोक्त धर्म.)(कामदाहांतील रूपक) शंकर हे नांव भक्तिज्ञानवैराग्यसंपन्न पुरुषाला पुराणांतून कांहीं स्थळीं लाविलेले आढळतें असे वर सांगितलेच आहे. ज्ञानी पुरुष विचाराने कामविकार शमवितो तथापि तो वासनारूपाने स्वप्नावस्थेत उद्भूत होऊन त्याच्या मनःक्षोभाला कारण होतो. अशा रीतीने काम ज्ञान्याच्या लिंगशरीराला स्वप्नावस्थेत त्रास देऊ लागतो तेव्हां ज्ञानी किंवा योगी अग्निचक्राचे ठिकाणी अर्थात् भ्रूमध्यस्थानी ध्यान करून कामविकाराचा नाश करितो. हेच शिवाने आपल्या मस्तकावरील तृतीय नेत्रांतील अग्नीच्या योगाने कामदाह केला ह्या कथेतील तात्पर्य. ३. क्षीरसमुद्र. प्रथमार्धाचा अर्थः हे मदनांतका! सदाशिवा! व्याघ्रपादऋषिपुन उपमन्यूनें दग्धप्राप्तीच्या इच्छेने तुमची एकनिष्ट सेवा केली; त्यावर प्रसन्न होऊन तुम्हीच त्याला दुग्धसमुद्र दिलात हे तुमचें औदार्य फारच सुपात्री झाले. वृकासुराला जो तुम्हीं वर दिला तो अस्थानी झाला. उलट पक्षी उपमन्यूला दिलेला वर फारच सुपात्री झाला. १. औदार्य. तृतीयचरणार्थः–तेंच औदार्य श्रेष्ठ की में सत्पात्री झालेले असून त्यापासून त्या माणसाला सदोदित सुख प्राप्त होते. सत्पात्रीं औदार्य: ही पंक्ति किती तरी अर्थपूर्ण आहे! आमची सर्व पुराणे व भारतरामायणादि ग्रंथ ह्यांत गोंवलेल्या सत्याचे उत्तम समर्थन करतात. दैत्यदानवांना दिलेल्या वरांपासून कल्याणापेक्षा त्यांचे अकल्याणच - जास्ती झाले. कोणत्याही मनुष्यावर औदार्यबुद्धीने कृपा करण्यापूर्वी दोन गोष्टी लक्ष्यात ठेवल्या पाहिजेत. एक तर ज्या मनुष्याला दान द्यावयाचें तो सत्पात्र आहे की नाही हे पहावयाचे. दुसरी गोष्ट त्या देण्यापासून त्याला नेहमी सुख होईल किंवा नाही ते पहावयाचे. कदाचित त्याला काही वेळ त्यापासून सुख होईल पण नेहमी जर सुख झाले नाही तर तें औदार्य विशेष चांगले असें म्हणता येणार नाही.