या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. १८७ म्हणें मनिं, 'यथार्थ जें स्वमत वर्णिती शैव तें न वैष्णव दुराग्रही; परम मुख्य ही दैवते.' ॥ पूजितपादपद्म, असा अनादि परमेश्वर आमचे संरक्षण करो. पहिली पांच विशेषणे जशीच्या तशीच घेतली तर शंकराला लागतात, पण ती अनादि घेतली (म्हणजे त्यांतून आद्याक्षर काढून घेतले) तर ती विष्णूला लागतात. या श्लोकांत कवीने शिव व विष्णु अशा दोघांही देवांचा आशीर्वाद मागितला आहे. यांतील विशेषणांचें स्पष्टीकरण असें:-गवीशपत्रः-गवीश म्हणजे वृषभ (नंदी) वाहन आहे ज्याचे असा शंकरः (आद्याक्षराचा लोप करून) वीश म्हणजे पक्षिपति गरुड पत्र (वाहन) आहे ज्याचे असा विष्णु. नगजातिहारी-नगजा-पार्वती तिची आति-दुःख तें हारी-हरण करणारा, पार्वतीचे दुःख हरण करणारा पक्षी, गजाची आति हरणारा-गजेंद्रपीडा हरण करणारा विष्णु (गजातिहारी). कुमारतात:-कुमार-कार्तिकेय त्याचा तात शंकर; पक्षी, मार-मदन त्याचा तात विष्णु. शशिखंडमौलि:-शशिखंड-चंद्रबिंब ज्याच्या डोक्यावर आहे तो शंकर; पक्षी, शिखंड-मयूरपिच्छे डोक्यावर आहेत ज्याच्या तो विष्णु. लंकेशसंपूजितपादपद्मः लंकेशानें पूजित आहे पादकमल ज्याचे असा शंकर; पक्षी, क-ब्रह्मा, ईश-शिव यांनी पूजित आहे पादकमल ज्याचें तो विष्णु, परमेश्वर-शंकर, पक्षी रमेश्वर विष्णु. अनादि-ज्याला, आदि नाहीं तो; पक्षी, आद्याक्षररहित असा परमेश्वर अर्थात् रमेश्वर विष्णु. पंतांच्या 'हरिवंशांत हरिहरांचा अभेद पुढीलप्रमाणे वर्णिला आहे. (८) हरिहर हे सर्वोत्तम एकचि बा! यांत लव नसे भेद । वेद प्रमाण येथें याचि ज्ञानें नृपा! सरे खेद. ॥ ज्वलनी ज्वलन, जळी जळ, तेंवि हर हरीत हरि हरी जाण । देहद्वय धरि योगी जैसे तैसेंचि हे तुझी आण. ॥ हरि तो हर, हर तो हरि एकचि परपुरुष नित्य नव दोन । हृदयीं तत्व धरावें मंदापासीं कदापि न वदोन ॥ [अ० ४९ गी० ४-५-७] ब्रह्मदेवाने एकदां स्वप्नांत हरिहररूपं पाहिली त्याचे वर्णनः-पीतांबरधर दरकर चक्रगदापाणि देखिला भर्ग । चर्मत्रिशूळ पट्टिशधर हरि जो अर्पिता चतुर्वर्ग ॥ ४२. ११७ गरुडध्वज हर भगवान् वृषभध्वज हरि विलोकिला व्यक्त । कथिलें रहस्य तुज की कथिसिल तूं त्यांसि जे भले भक्त ॥ ११८ (हरिवंश-मोरोपंत) शंकर कृष्णाला म्हणतात:-'मी हा तूं, तूं हा मी शब्दं अर्थ करूनि, कांहींच । तुज मज अंतर कृष्णा ! वा वंध्यपत्य तेंवि नाहीच. ॥ अ०५० गी० ६२], 'आम्हांत भेद करि जो या होय न पात्र मदुपदेशाला । त्या हा स्वभक्तिरूपा चिंतामणिची न यदुप दे शाला ॥' [अ. ५० गी. ७४]. शंकर मार्कंडेयास म्हणतातः-'सुब्राह्मणांसि सर्वालोकांसह लोकपाळ जे सर्व । वंदिति पूजिति हे किति सदुपासक विधि मुकुंद मी शर्व. ॥ १७३ ॥ देखति अणुहि न साधु ज्ञाते आम्हां तिघांत जे भेद ॥१७४ ॥' [ मंत्रभागवतद्वादशस्कंध ] एवंच शैववैष्णवांतील विरोध भारत, भागवत व पुराणे यांच्या दृष्टीने गर्हणीव आहे. थोडी प्रक्षिप्त वचने तेवढी अनुकूळ दिसतात. ३. म्हणून याकरितां. १. शिवभक्त. २. विष्णुभक्त. ३. हट्टी. द्वितीयार्धाचा अर्थः-शिव मात्र खरा देव, शिवाची उपासना मात्र खरी उपासना, विष्णूची भक्ति करणे पाप आहे. अशा प्रकारची जी शिवोपासकाची मते ती खरी नाहीत. त्याप्रमाणे शिवाची प्रजा