________________
केकावलि. बराने प्रमत्त होऊन त्यांनी त्रिलोकास त्रास देण्याचे आरंभिले. त्यांच्या त्रासामुळे सर्व त्रिभुवन जर्जर झाले. तेव्हां देवांनी विष्णूस पुढे करून महादेवाची आराधना केली. शंकराने त्यांस आश्वासन देऊन रथसामग्री सिद्ध करण्यास सांगितले. त्या वेळेस पृथ्वी रथ, चंद्रसूर्य रथचक्रे, मंदरपर्वत अक्ष, चतुर्वेद रथाश्व, ब्रह्मदेव सारथी, षट्शास्त्रे रथाचे दोर, कनकाद्रि धनुष्य, शेष धनुष्याची दोरी, विष्णु शर, अशा प्रकारची रथसामग्री देवांनी सिद्ध केली. नंतर त्या रथावर वसून महादेवाने बहुतकाळपर्यंत घनघोर युद्ध केले व शेवटीं पाशुपतास्त्राची स्थापना करून विष्णुबाण सोडून दैत्यांसुद्धां त्रिपुरांचा नाश केला. तेव्हापासून त्रिपुरांतक किंवा नुसतेच पुरांतक असें नांव महादेवास पडले. त्रिपुरवधकथेतील गूढ रूपक:-हरिवंश हा ग्रंथ महाभारताची पुरवणी होय. त्यांतील भविष्यपर्व अ० १३३ यांत जनमेजयाने वैशंपायनाला त्रिपुरवधांतील तत्व विचारिलें व वैशंपायनाने ते त्याला अलंकारिक भाषेने सांगितले ही कथा आहे. त्याचे स्पष्टीकरण सुप्रसिद्ध टीकाकार नीलकंठ चतुर्धर यांनी त्या अध्यायाच्या टीकेंत उत्तम रीतीने केले आहे. त्यांतील महत्वाचा सारांश मोरोपंतांनी आपल्या हरिवंशांत चांगल्या त-हेने दिला आहे. त्यांतील सार आमच्या तत्वबुभुक्षु वाचकांच्या सोईकरितां येथे देतो:-'जनमेजय भूप पुसे वैशंपायन मुने! मला सांगे । त्र्यक्षापासुनि कैसा त्रिपुरवध ज्ञानसिंधु तूं आंगे. ॥१॥ श्रवण, मनन, आणि निदिध्यासन ही तीन अक्षसम ज्याला । दर्शनसाधनविद्वान् जो म्हणति त्र्यक्ष जाणते त्याला. ॥२॥ जे स्थूल, सूक्ष्म, कारण, देहत्रय हे पुरत्रय स्पष्ट । याचा उच्छेद कसा ज्ञानें तें कथुनि तूं हरी कष्ट. ॥३॥ (वैशंपायन सांगतात ) शंकर म्हणजे बोध, श्रवणमनन तीन साधनें शूळ । कामक्रोधादि असुर, देव शमादि, श्रुतीच या मूळ. ॥४॥ जागृतस्वप्नसुषुप्त्यत्यभिमानी विश्वतैजसप्राज्ञ । याही भोग्य पुरत्रय मायागुणरचित जाणती प्राज्ञ. ४५॥ उठलें तें आकाशी म्हणजे जें प्रकट कारणी झालें । प्राकार ज्यासि कांचनमय अन्नमयाकडेचि हे आले. ॥६॥ मणिंहीं परमविराजित, मणि म्हणजे इंद्रिये असें जाणा । पिंडाला नगराची शोभा योग्या असेल ती आणा. ॥७॥ कर्मे करुनि पुरत्रय साधित; यज्ञादि कर्म जाणावें । गंधर्वपुर तसे ते म्हणजे मिथ्या असेंचि बाणावें. ॥ ८ ॥ वाहति पुरासि वाजी म्हणजे ते इंद्रियाश्व समजावे । या सुरहस्यज्ञाने हृदयगुहेतील सर्व तम जावें. ॥९॥ त्या अश्वांही असुर ग्रासिति अंबर सुवेग ते म्हणजे । जें ब्रह्म कारण तया झांकिति कामादि विजयकृतपण जे. ॥१०॥ समलंकृत कनकप्रभ भवनें त्रिपुरस्थ निर्मिलीं यत्ने । म्हणजे मनःप्रवेशस्थाने ही वर्णिली वधरने. ॥११॥ बहु आयुधे पुरीं त्या स्रक्चंदनकामिनीकटाक्ष असे । कामाचे उद्दीपक अर्थ बुधमनांत भाव हाचि ठसे. ॥१२॥ ऐशा त्रिपुरांत वसे असुरेश्वरः सूर्यनाभ अध्यक्ष । तैसाचि चंद्रनाभहि, यांसि म्हणति चक्षु, मन, असे दक्षः ॥१३॥ अन्यहि बहु दानव त्या त्रिपुरी मदमत्सरादि ते कथिले । पथ मोडिले पुरातन यांही प्राणी सुरादि बहु मथिले'. ॥१४॥ त्रिपुरासुरांनी देवांस पीडा केली. तेव्हां ते ब्रह्मदेवास अथवा ईश्वरास शरण गेले, ईश्वराने शंकरावांचून इतरांस दानव अवध्य आहेत म्हणून त्यास शरण जा असें देवांस सांगितले. त्यावरून ते शंकस शरण गेले. 'शंकर म्हणजे सुखकर कथिला प्रणतांसि ईश्वरें बोध । गेले शरण तयाने चा लागले करूं शोध. ॥ १५॥ ते शंकरासि गेले शरण सकळ देव उग्र तप तपले । जप