या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत लेशहि न विसरले, यमनियमांतें सदैवही जपले. ॥१६॥ त्या सुरतपःप्रभावे जे दानवदार सर्वही भ्याले । बहु कामादिपरिग्रह तृष्णादिक दीन तेधवां झाले. ॥ १७ ॥ केवळ दुर्बळ होता क्षीण न उरलीच शक्ति कांहींच । ते पावले अदर्शन झाले दानव समस्त नाहींच. ॥ १८ ।। ते गुप्त अंतरिक्षी झाले मायावळे असुरभूप । हृदयाकाशी वसले होउनियां लीन वासनारूप.॥१९।। परिपाककाळ येतां योगाचा देवशत्रु बाधाया । बसले जपत सुदारुण मायावी ते स्वकार्य साधाया. ॥ २० ॥ ऐसे होतां गेले सुर शरण हरालयासि योगाच्या । विजयी झाल्या असतां क्षीणा त्या वासना कुभोगाच्या. ॥ २१ ॥ अधिकारी संसारी होउनि उद्विग्न निर्गुणस्थानीं । ज्या प्राप्त होय हृदयाकाशी तेथेंचि लागले ध्यानी. ॥२२॥ सिद्ध महादेव प्रभु झाला ते सुर भयांत ताराया । अभिमत उपासकांतें होय अविद्याभ्रमासि वाराया. ॥ २३ ॥ त्रिपुरांसी युद्ध करी त्र्यक्ष सशरधन धरूनि अतिसत्व । विद्वान् प्रणवीं योजुनि चित्त करी कोशभंग हे तत्व. ॥ २४ ॥ त्र्यक्षे शरसंधाने दैत्य सकल भिन्नदेह ते केले । स्थूळाध्यास उडवितां ध्याने कामादि नष्टतनु ठेले. ॥२५॥ रात्रींत प्रबळ असुर होउनि देवांसि जिंकिती शूर । कामादि बळि स्वप्नीं, होति शमादिक तयापुढे चूर. ॥ २६ ॥ कीं शुक्रे आप्यायित केले ते दैत्य सर्वही हव्ये । पाखंडमार्ग सेवुनि कामादि प्रसरती बळें नव्ये. ॥ २७॥ दिव्यरथस्थित शंकर गर्जुनि दैत्यांसि संगरी दापी । सूक्ष्म शरीर अधिष्ठुनि योगी मर्दी स्मरादि जे पापी. ॥२८॥ देवांनी सिद्धांनी बहु तो शंकर वृषध्वज स्तविला । योगजधर्मसमुच्छ्रित म्हणति वृषध्वज म्हणोनि या कविला. ॥ २९ ॥ असुरांहीं नानाविधशस्त्रांहीं सरथ पाडिला रुद्र । योगी सूक्ष्मशरीरी तो विप्ने पीडिला, जसा क्षुद्र. ॥ ३० ॥ स्तुति होतां गर्दै जो सुस्थित झालों असें मनीं मानी । त्या योग्यातें सूक्ष्मी देहींही प्राप्त होतसे हानी. ॥ ३१ ॥ शंकर तेव्हा कुंठितगति होय शकट जसें पथीं भग्न । की त्या लयांधकारामध्ये योगींद्र जाहला मग्न. ॥ ३२ ॥ ऐसें होतां विप्न, प्रकटे वृपरूप विष्णु रक्षाया । की तो शंकर भजला होता श्रितरक्षणैक दक्षा या. ॥ ३३ ॥ हा धर्म तमोमन्ना जीवांतें उद्धरावया दक्ष । येणेंचि समुद्धरिले स्वाश्रित पावोनि संकटी लक्ष'. ॥३४॥ धर्माने चेतोरथ उद्धरून, लिंगभूमी जिंकून, योग्याला महत्तत्व नांवाच्या प्रदेशांत नेले. तेथेही असुर त्रास देऊ लागले. तेव्हां रुद्र धनुष्यीं अग्नि स्थापूनि दिव्य शर जोडी । त्या दैत्याच्या तिसऱ्या नगरीं ब्रह्मास्त्रयुक्त मग सोडी. ॥ ३५ ॥ अग्नि महावाक्य, धनु प्रणव, चिदाभास होय दिव्य शर, । ब्रह्मास्त्र चरमवृत्तिहि, पुर मूळाज्ञान, म्हणति सुज्ञ वर. ॥ ३६ ॥ कल्याणकरें जीवें असुरपुरें जागृदादि जी तीन । सद्विद्यास्त्रे केलीं भस्म असें वर्णिती सुधी जीन. ॥ ३७ ॥ या त्रिपुराच्या दाहीं सद्धर्मचि मुख्य कारण स्पष्ट । स्तुति शंकरादि करिती हाचि महाविष्णु चुकवितो कष्ट. ॥ ३८ ॥ ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांनी १७ व्या अध्यायाच्या प्रारंभी ह्या रूपकाचा अमळ निराळ्या त-हेने उल्लेख केला आहे. तो असाः-'विश्वविकासित मुद्रा । जया सोडवी तुझी योगनिद्रा । तथा नमोजी गणेंद्रा । श्रीगुरुराया! ॥१॥ त्रिगुण त्रिपुरी वेढिला । जीवत्व दुर्गी आडिला । तो आत्मशंभूने सोडविला । तुझिया स्मृती' ॥२॥ यांत । सत्व, रज, तम ह्या त्रिगुणासच त्रिपुरे झटले आहे. त्रिगुणांनी त्रासलेला जीवात्मा सद्गुरुस्मरण' वा आत्मशंभूनें सोडविला हा भावार्थ. ४. मुरदैत्याचा नाश करणारा. (विष्ट कथासदर्भः- मुर हा कश्यपाला दनूनामक पलीपासून झालेला पुत्र. खान द शिवाने किंवा आ 17 पलापासून झालेला पुत्र. ह्याने देवांनी रात