या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. १९३ गरजजरु तदुक्तिस जन; प्रभो ! जरि निजेमधे चावळे ।। तरि, त्रिभुवनेश्वरा! तव विशुद्ध नामावली __ मुँखीं प्रकट होय, जी करि सुखी जना मावली. ॥ ७३ 'तुझें कुशळ नाम बा! हळुहळू मना ओकळी; [हरिवंश-अ० ९ गी० २२], (२) 'व्यासा! वा! साक्षात् तूं नारायण, जडजनासि ताराया । अवतरलासि दयार्णव बोधे अज्ञान सर्व साराया. ॥' [मह द्विज्ञापना-८५]. (३) 'गरुडध्वजांश भगवान् व्यास द्वापरयुगांत अवतरला । यद्रंथसेतुसंश्रित जन करुनि भवार्णवासि लव तरला. ॥' (मंत्रभागवत स्कं० १ गी०४). (४) ऐसा भगवान् व्यास ब्राह्मणरूपें मुकुंद अवतरला । जन ज्याच्या उपदेशे निजहित जाणुनि सुखेंचि भव तरला'.॥ (आदि० अ०८ गी० ४५). इतर पुराणांतही व्यास हा नारायणाचा अवतार आहे याविषयी प्रमाणे सांपडतात, ९. कथासंदर्भ:-पराशर हा मैत्रावरुणि वशिष्ठाचा नातु व शक्तिऋषीचा पुत्र. याच्या मातेचें नांव अदृश्यंति. ह्याच्या बापास राक्षसाने मारिलें; त्याचा सूड घ्यावा म्हणून ह्याने राक्षससत्र आरंभून पुष्कळ राक्षसांचा संहार केला; शेवटीं पुलस्त्यऋषीचा स्तव ह्यानें सत्रसमाप्ति केली. सत्यवतीला कौमार्यावस्थेत ह्याच्याच । पासून व्यास झाला. १. त्याच्या वचनास. व्यासवचनास जन (लोक) वळे (वळतात, अनुसरतात), अर्थात त्याचे वचन प्रमाण मानून त्याप्रमाणे लोक वागतात. २. निद्रेमध्ये. ३. बरळला, भलभलतें बोलू लागला. ४. स्वर्ग, मृत्यु आणि पाताळ ह्या तीन भुवनांचा स्वामी जो तूं त्या ! ५. अत्यंत पवित्र. ६. नाममालिका. ७. व्यासाच्या मुखांस. त्रैलोक्यपते! देवा! त्या व्यासाची योग्यता काय सांगावी ! तो जरी निद्रेत बरळला-बोलला. तरी त्याच्या मुखांतून अत्यंत पवित्र अशी भगवंताची नांवेंच निघतात. असावधस्थितीत सुद्धा ज्याच्या तोंडांतून भगवन्नामघोष ऐकू येतो, त्याची योग्यता काय वर्णावी! ज्यांना तुर्या अवस्था प्राप्त होऊन ब्रह्मसाक्षात्कार झाला त्यांनी निद्रेत सुद्धां साहजिक रीतीने भगवन्नाम घेणे यांत नवल काय ? ८. लोकांना. ९. आई,माता. भगवन्नामश्रवण किंवा कीर्तन लोकांस मातेप्रमाणे अखंड सुख देते. संसाराच्या तापत्यापासून त्यांची सुटका होऊन त्यांस ब्रह्मानंद. प्राप्ति होते. १०. प्रास्ताविकः-यांत व पुढील केकेंत कवि भगवन्नाममाहात्म्य पनि ११. देवा! बापा! पाठभेदः-'तुझें कुशल नाम जो नर हळूहळू आकळी' असाही पाठभेद यशोदापांडुरंगी' व 'सर्वसंग्रह' यांत आढळतो, परंतु तो विशेष प्रशस्त नाही. १२. आकळिते, का करितें, स्थिर करितं. अन्वयार्थः-तुझें (भगवंताचें) कुशळ (कल्याणकारक किंवा चतुर ) नाम ( नांव) मना ( मनाला) हळुहळू (युक्तीने, सावकाश) आकळी (आकळितें, आकलन करितें). दुरत्यय (दुर्जय) असा (अशा प्रकारचा) महाखळहि (अत्यंत दुष्ट असाही) हा कळी त्यासि (त्या नामास) भी (भितो). हे (नाम) व्यसन (कलिकृतदुःख)[व पाप (कलीने घडविलेले पातक) हरि (हरण करिते). बहु कशास (फार काय सांगावें) हें नाम] योगमायाधवा (योगमायेच्या स्वामी देवा! कायाधवा. १७ मो० के०