या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २०३ ७९ बुडोनि शरणागत श्रमतसें अरण्यांत मी. ॥ मुंखासि जंव पातली 'श्रम,' 'अरण्य' ऐशी पैदें, निर्जस्मृतिस जाहली विषयं ती तव 'श्रीपदें। १. दुःख पावतो. २. 'यांत कवीने भगवंताचें दयालुत्व आणि भक्तवात्सल्य दर्शवून आपले बलहीनत्व आणि भगवत्परीक्षणानहत्व ध्वनित केले. हा दृष्टांतालंकार होय.' [य० पां०पृ० २७९.] ३. कवि मोरोपंत. यांत 'तम' पदाने अज्ञान आणि 'अरण्य' शब्दाने भव यांचे ग्रहण करणे इष्ट आहे. अज्ञान आणि भव यांचे निगरण (गिळणे) केले म्हणून रूपकातिशयोक्ति अलंकार झाला. ४. प्रास्ताविकः-मागल्या केकेच्या शेवटी 'श्रमतसें अरण्यांत मी, असें कवीने म्हटले. तेवढ्यावरूनच कवीला रामावताराची कथा आठवून ती ते ह्या व पुढील चार केकेंत वर्णितात. अम व अरण्य एवढे दोन शब्द तोंडांतून बाहेर निघाल्याबरोबर भगवंताला रामावतारी पित्राज्ञापालनास्तव जो चौदा वर्षे सीतेसह वनवास भोगावा लागला व त्यांनाजे श्रम झाले त्या सर्वांची कवीला आठवण झाली. यावरून सर्व वेगांत मनाचा वेग अत्यंत श्रेष्ठ आहे असे वाचकांस दिसून येईल. मनाच्या वेगाविषयीं कौपर नामक इंग्रेजी कवीचें पुढील पद्य वाचनीय आहे: How swift is a glance of the mind, When compared with the speed of its flight, The tempest itself lags behind, And the swift-winged arrows of light.' (Cowper) ५. जेव्हां. ६. पोंचली. मुखास पातलीं-तोंडाशी येऊन पोंचलीं, तोंडांतून बाहेर निघाली. ७. व्यु०-'अरण्य' यांतील 'अ'चा लोप होऊन मराठीत 'रान' झाले. ८. शब्द. ९. आपल्या आठवणीस, माझ्या स्मरणास. १०. स्थान, आश्रय. ११. तुझी, रामचंद्राची. 'तंव' (त्या काळी, तेव्हां) असाही एक पाठ आहे व तो प्रशस्त आहे. पाठभेद:'जंव' शब्दामागून 'तंव' (तेव्हां) शब्द येणे योग्य आहे. अन्वयार्थः-- जंव (ज्या काही श्रम अरण्य ऐशीं पदें ('श्रम' 'अरण्य' हे शब्द) मुखासि पातली (तोंडाशी आली, तोंडांतून निघालीं) [तंव] (त्या काळी) गुरूक्तीस (बापाच्या वचनास) सफल करावया (खरें करण्यास) जी (पावले) त्वरित (लगबगीने) धांवली. ती (प्रसिद्ध) तव श्रीपदें (शोभायमान, किंवा कल्याणकारक पावले) निजस्मृतीस (आपल्या, अर्थात् माझ्या स्मरणास, आठवणीस) विषय (स्थान, आ. श्रय) जाहली (झाली).' प्रथमार्धाचा अर्थः-'श्रम' 'अरण्य' असे शब्द माझ्या तोंडांतून निघतांच देवा! मला तुमच्या सुंदर चरणांची आठवण झाली १२. श्री-मंगलरूप, कल्याणदायक, पदें-पावले भगवंताची मंगलदायको