या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ मोरोपंतकृत गुरूक्तिस करावया सेफळ, जानकीजीवना! १. गुरु-पिता, त्याच्या उक्तीस-वचनास-पित्याच्या वचनास. २. फलयुक्त, सार्थ, खरी. रामास वनवासास पाठवितों असें रामपिता दशरथ याने कैकेयीस दिलेलें वचन खरें करण्याकरितां राम वनांत गेले. कथासंदर्भ:-इक्ष्वाकुकुलोत्पन्न दशरथराजास कौसल्या, सुमित्रा व कैकेयी अशा तीन मुख्य स्त्रिया होत्या. बहुतकाळपर्यंत राजास संतति झाली नाही म्हणून त्याने कुलगुरु वशिष्ठाच्या सूचनेवरून ऋष्यशृंगाला ऋत्विज करून पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञसमाप्तीचे वेळी अग्निकुंडांतून प्राजापत्य पुरुष निघून त्याने राजास पायसपात्र दिले. त्याच्या प्राशनाने तिघीही राण्या गर्भवती होऊन त्यांना योग्य काळी पुत्र झाले. ज्येष्ठ राणी कौसल्येला श्रीविष्णूच्या अंशानें चैत्रशुद्ध नवमीस सुमुहूर्तावर राम झाला. त्याचप्रमाणे सुमित्रेस लक्ष्मण व शत्रुघ्न व कैकेयीस भरत असे पुत्र झाले. लक्ष्मण हा शेषाचा अंश होता. ह्या चारी बंधूंचे व्रतबंध झाल्यावर त्यांना वशिष्ठाने सांग वेदोपवेद शिकविले. नंतर काही दिवसांनी विश्वामित्रऋषीने स्वयज्ञसंरक्षणार्थ दशरथापासून रामलक्ष्मणांस मागून घेतले. अयोध्येहून ऋषीच्या आश्रमाकडे जात असतांना मार्गात रामाने ताटिका नामक राक्षसीचा वध केला (के० ५५ पृ० १४६ टी० पहा). पुढे आश्रमास गेल्यावर रामलक्ष्मणांच्या साह्याने राक्षसांचा उपद्रव नाहीसा होऊन विश्वामित्राचा यज्ञ निर्विघ्नपणे सिद्धीस गेला. त्यानंतर ऋषि रामलक्ष्मणांना बरोबर घेऊन जनकाच्या बोलावण्यावरून सीतेच्या स्वयंवराकरितां मिथिलेस जाण्यास निघाले. मार्गात रामाने शिलारूप प्राप्त झालेल्या गौतमभार्येस पदस्पर्श करून स्त्रीरूप दिले (के० ३६ पृ० १०१ टी० १ पहा). मिथिलेस गेल्यावर शिवधनूचा भंग करून रामाने सीतेचें पाणिग्रहण केले. लग्नानंतर सर्व मंडळी अयोध्येस परत आल्यावर काही दिवसांनी दशरथानें रामास यौवराज्याभिषेक करण्याचे ठरविले. पण मध्यंतरी कैकेयीची दासी मंथरा हिनें भरताला सिंहासनावर बसवून रामाला वनवासाला पाठविण्याविपयी राजाचे मन वळवावे म्हणून कैकेयीला सल्ला दिली. त्यावरून कैकेयीने पूर्वी देवदैत्यांच्या . युद्धप्रसंगी आपणांस राजाने दोन वर दिले होते, त्यांपैकी एका वराने त्याने रामाला चौदा वर्षे वनवासास पाठवावें व दुसऱ्या वराने भरताला राज्याभिषेक करावा असें मागितले. हे कठोर भाषण ऐकून राजाला मरणप्राय दुःख झाले. पण पूर्वी देऊ केलेले वर आतां देत नाही असें त्या सत्यप्रतिज्ञ राजास तर ह्मणवेना. तसेच सर्व अयोध्येचे प्रेमस्थान अशा रामाने वनवास करावा हेही त्यास बरे वाटेना. अशा स्थितीत पित्याला पाहून पित्याचे भाषण सत्य करण्याकरितां पितृभक्त राम वनवासास जाण्यास निघाले. तेव्हां प्रियपत्नी सीता व बंधु लक्ष्मण हहा त्याजबरोबर जाण्यास निघाले. अरण्यवासास जाण्यांत रामाचा दुसराही एक हेतु होता. रावणादि राक्षसांनी देवांना व ऋषींना अतिशय त्रासवून सोडले होते. त्यांच्या त्रासांतून देवमुनाना सोडवावे, तसेच आपल्या दर्शनाकरितां हजारों वर्षांपासून तीव्र तप करणाऱ्या महर्षीस भेट द्यावी हा त्यांतील गुप्त हेतु होता (केका ८० पहा). अयोध्येहून निघाल्यावर राम शृ ति गुहास भेटून, भागीरथी उतरून भरद्वाजाच्या आश्रमांत गेले. पुढे ते काही दिवस चित्रकटपर्वतावर राहिले. येथेच त्यांना भरताकडून पितृमरणवाता -