________________
२१० मोरोपंतकृत ८२ अयुक्त बहु ज्या जनास्तव घडे पडे सांकडे, - तदुक्तिहुनि आमुचें बहुत बोलणें वांकडे? ॥ 'जगत्रयमनोहरा! बेलगुणैकरत्नाकरा ! ह्मणे 'कनकरंकु द्या मज, महा प्रयत्ना करा.' । ___१. माणसाकरितां. तृतीयचरणार्थ:-ज्या प्रियमाणसाकरितां तुम्हांला पुष्कळ अनुचित गोष्टी कराव्या लागल्या असून संकटही भोगावी लागली. येथे कोणत्या जनास्तव वे कवीने स्पष्टपणे न सांगतां मोघम ठेविलें, तरी पुढल्या केकेवरून तो जन म्हणजे रामभायी रीता हे स्पष्ट आहे. सुवर्णमृगासंबंधी सीतेने धरलेल्या हट्टामुळे रामाला तपोनिधि मुनीवा सहवास सोडून वानरांचा स्नेह जोडावा लागला व सीताप्राप्त्यर्य पुष्कळ संकटें भोगावी लागून दारुण युद्ध करावे लागलें-असा कवीचा अभिप्राय. २. संकट, दुःख. ३. त्या जनाच्या भाषणापेक्षां तें भाषण पुढील केकेंत दिले आहे. ज्या सीतेच्या भाषणाने तुम्हांला पुष्कळ अयोग्य गोष्टी करण्यास लावून संकटांत पाडले त्यापेक्षां माझं बोलणे देवा! ज्यास्ती यांकडे आहे काय? अर्थात् 'नाही' हे अपेक्षित उत्तर हा प्रश्नालंकार झाला. ४. त्रिभुवनसुंदरा! रामा ! अन्वयः-'जगत्रयमनोहरा! बलगुणैकरत्नाकरा! [तुम्ही महा प्रयत्न करा [आणि मज कनकरंकु द्या [असें] [सीता] म्हणे. प्रियाहि तुज अशी कुकार्य आज्ञापिती जाहली; कामुक सुधा त्यजूनि अंगनाज्ञा पित्ती [हे] प्रगट [आहे. प्रास्ताविकः- यांत सीतेची 'अयुक्त उक्ति' दिली आहे. ५. बलगुणांचा मुख्य समुद्र अशा! बलसामर्थ्य, आणि गुणऐश्वर्यादि षड्गुण यांचा सागर. समुद्रांत रत्ने असंख्य सांपडतात म्हणून त्यास रत्नाकर (रत्नांची खाण) असे म्हणतात. 'जातौ जातौ यदुत्कृष्टं तद्रत्नमभिधीयते.' 'बलं गंधरसे रूपे स्थामनि स्थौल्यसन्ययोः । पुमान् हलायुधे दैत्यप्रभेदे वायसेऽपि च ।।.' केकासौंदर्य:- 'जगत्रयमनोहर व बलगुणैकरत्नाकर' ह्या दोन विशेषणांनी रामाला हाक मारण्यांत सीतेने मोठे चातुर्य दाखविले आहे. ही दोन्ही विशेषणे फार लडिवाळपणाने व रामाने आपले काम खचित करावे या हेतूने योजिलेली दिसतात. ६.सुवर्णमृग. कथासंदर्भ:- मागें केका ८० पहा. 'भारतीय रामायणात, कनकमृग धरून आणण्याविषयी सीतेची रामाला उक्ति पुढीलप्रमाणे दिली आहे:-'ती रामासि म्हणे, 'जी! अवलोका, मृग असोनि सोन्या या । भेद नसेचि, गृहा हा न्यावा, दुसरे असा न्याया. ॥ १८ ॥ आणा धरोनि मृग हा, कैसा दिसतो मनोरम? उठावें, । जातो की धांवा जी! आहे की हरिणहृदय मउ ठावें ॥ १९ ॥' [वनपर्व-अ० ११.] ७. परिश्रमाला तीन चरणांचा अर्थः- 'हे त्रैलोक्यसुंदरा! बलगुणसमुद्रा! रामचंद्रा! तु कितीही परिश्रम पडले तरी मजकरितां सोसून मला तेवढा सुवर्णहरिण मार शून द्या' अशा प्रकारचे कुकार्य करण्याविषयी तुमच्या लाडक्या बायक आज्ञा केली हे तिला फार अनुचित होते. नसो हाला रून आ तुमच्या लाडक्या बायकोनें तुम्हांला