या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २११ प्रियाहि अशि जाहली तुज कुकार्य आज्ञापिती; सुधा त्यजुनि कामुक प्रकट अंगनाज्ञा पिती. ॥ स्वदास समयीं जपे, तरि न दे वरा, चाकरी १. प्रिया-प्रियकर-असूनही. २. वाईट कुत्सित, हलकें काम. कनकमृग धरून आणण्यासारखें क्षुल्लक काम. प्रास्ताविकः-सीता तुमची प्रिया असतांही तुम्हांला तिने सुवर्णमृग आणण्यासारखें क्षुद्र काम करण्यास आज्ञा केली हे आश्चर्य नव्हे काय ? वास्तविक तिने तुम्हांला क्षुल्लक व ज्यापासून तुम्हांला फुकट त्रास मात्र व्हावयाचा असले काम सांगावयाचे नव्हते. बरें तिने सांगितले, पण तुम्ही तरी तिच्या म्हणण्यास 'हो' कार कसा दिलात? पण लाडक्या बायकोने केलेली आज्ञा मोडणे तुमच्याही जीवावर आले व तुम्ही तिच्या म्हणण्याप्रमाणे कनकमृग आणण्यास धांवला. तुम्हीही सारासार विचार न करितां केवळ स्त्रीचे प्रिय करावे ह्या उद्देशाने 'कुकार्या'चा स्वीकार केला यावरून कवि म्हणतात, 'देवा! तुम्हीं केलेंत ते ठीकच केलें.' प्रथम भगवंताला दोष देऊन नंतर तुम्हीं केलें तें ठीकच केलें असें म्हणण्याचे कारण कवि अर्थांतरन्यास अलंकाराचा आश्रय करून चरम चरणांत सांगतात. ३. आज्ञा करणारी. हा शब्द रामचंद्र कामुक म्हणूनच स्त्रीच्या आज्ञेत वागणारे होते असे दाखविण्याकरितां कवीने खुबीने योजिला आहे. ४. अमृत. ५. स्त्रीलंपट पुरुष, स्त्रैण. कामी पुरुषाला स्त्रीची आज्ञा पालन करणे-मग ती आज्ञा योग्य असो वा नसो-अमृतापेक्षां ज्यास्त आवडते. स्त्रैणपुरुषांना देवभोग्य अमृतापेक्षा स्त्रीच्या अधरामृताची जास्ती योग्यता वाटत असल्यामुळे ते आपल्या स्त्रीच्या अर्ध्या वचनांत असतात. सीतेच्या प्रेमाकरितां तुम्हांस स्त्रैण व्हावे लागले व म्हणून तुम्ही तिची आज्ञा अयोग्य असतांही पाळली-असें कवीचे म्हणणे. 'कामी पुरुष अमृतापेक्षां स्त्रीच्या आज्ञेचे पान करणे म्हणजे ती ऐकणे जास्त प्रियकर समजतात' ह्या सामान्य वचनाने 'तुम्हीं सीतेची आज्ञा अयोग्य असतांही ती ऐकिली' ह्या विशेष वचनाचे समर्थन केलें म्हणन हा येथे अर्थातरन्यास अलंकार झाला. ६. सुंदरस्त्रीची आज्ञा. व्यु०-'अंग' शब्दास प्राशस्त्यबोधक 'न' प्रत्यय लागून 'अंगना' हा शब्द झाला आहे. याचा अर्थ 'सुंदर स्त्री' असा होतो. ७. प्रास्ताविकः-'सीतेने रामास कुकार्य करावयास सांगितले एवढेच नव्हे तर ती लक्ष्मणाशीही चांगल्या रीतीने वागली नाही' असें कवि यांत सांगतात. सदा दासासारखी आपली सेवा करणारा निजसेवक (लक्ष्मण). ८. जपत असे.अ पदास (लक्ष्मण) समयीं जपे (ज्या प्रसंगी में काम करावयाचें तें फार निष्ठापूर्वक करण्यास तत्पर असे) तरि [सीता] वरा (आशीर्वचनास) न दे (न देती झाली), [दास चाकरी (सेवा) न चुके, परि [ती] देवराचा (दीर लक्ष्मण त्याचा) श्रम सार्थक न करी; [सीता देवराला भलतेंचि (अयोग्य शब्द) वदेही (बोलली देखील); देवा!] तें (बोलणे) तिसचि (सीतेलाच) कोप टाका (राग सोडा) [व] पुसा (विचारा); 'बा। (देवा!) मृदु (मऊ) असें (आहे) म्हणोनि (म्हणून) मज कापुसा (मला कापुसाला) न धोपटा (धोपटूं नका, मारूं नका).' प्रथमचरणार्थः-लक्ष्मणाने सीतेची अत्यंत निष्ठापूर्वक सेवा केली, तरी तिने त्याला कधी तोंडाने बरें देखील म्हटले नाही