या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १९ ) होय. त्यांची बहुतेक कविता याच वृत्तांत रचिलेली आढळते. आर्या छंदाची योजना पंतांपूर्वी फारशी कोणी काव्यांत केलेली नसून पंतांनीच तिचा प्रथम प्रचार पाडिला (परिशिष्टई पहा). भस्मासुर आख्यान, भृगुचरित्र ही आख्याने, कांहीं रामायणे, व कृष्ण विजय उत्तरार्धाचे बरेच अध्याय इतके श्लोकवद्ध आहेत; 'दुर्वासभिक्षा' हे प्रकरण त्यांनी ओवीवृत्तांत रचिलें आहे. कृष्णविजय पूर्वार्ध हा सवंध आर्यागीतींत रचिला आहे. पंतांनी ध्रुवचरित्र, अंबरीषाख्यान वगैरे प्रकरणे साकी वृत्तांत रचिलीं असून 'दोहा' वृत्तांत थोडी रामायणे व कांहीं स्फुट कविता ही रचिलेली आढळतात. लहान मुलींकरितां रचिलेली रुक्मिणीस्वयंवर, सीतास्वयंवर, सावित्रीआख्यान, व श्रीरामायण एवढी प्रकरणे त्यांनी अभंगवृत्तांत रचिली आहेत. क्वचित् पदें, आरत्या हीही केली आहेत. त्यांनी आपली काव्ये वहुतेक प्राकृत भाषेतच रचिलीं. तरी एक सबंध रामायण, मुक्तामाला, कृष्णस्तवराज, पांडुरंगस्तोत्रे, शिवार्याशतक, शंकरस्तव, रामस्तुति, हरिसंबोधनस्तोत्र इत्यादि स्फुट प्रकरणे त्यांनी संकृत भाषेत रचिलीं आहेत. पंत काव्यरचना करित असतांना श्रीधरी, नीलकंठी इत्यादि टीकांकडे चांगले लक्ष्य देत असावे असे दिसते. 'प्रन्हादप्रकरण' हे लहानसें (गीति २०) काव्य त्यांनी भागवत सप्तम स्कंधश्लो० १८ 'सत्यं विधातु निजभृत्यभाषितं इ. ह्या श्लोकावरील श्रीधरीटीकेच्या आधारानेच रचिलें आहे. उद्योगपर्वातील श्रीकृष्णोक्ति (अ ३, गी. ५३-६२), तसेंच हरिवंश अ. ४५ (पुष्करप्रादुर्भाव), अ. ५४ (त्रिपुरवध) ह्या प्रकरणांस नीलकंठी टीकेचाच मुख्यत्वे आधार आहे. काव्यरचना करितांना मनासारखें वर्णन येईपर्यंत पंत कधी कधी दोन दोन तीनतीन प्रयत्न करित असावेत असे मानण्यास पंतांच्या काव्यांत जागा आहे (द्रोण. ४.१३-१४). पंतांनी आपल्या ग्रंथांत बहुशः वर्णनसंक्षेपच केलेला आढळतो. मूळ लक्ष ग्रंथ भारताचा सारांश त्यांनी १७१७० गीतींत आणला आहे. तथापि प्रसंगविशेषीं पंत वर्णन विस्तारही करित (परिशिष्ट-ऋ' पहा). मंत्र साधण्याकरितांहि काही ठिकाणी ते वर्णनसंक्षेप करित [परिशिष्ट-ऋ-(इ)]. पंतांनी आपली काव्ये कांहीं खतःच्या प्रेरणेवरून व वरींच दुसऱ्यांनी सुचविल्यावरून रचिलीं आहेत. बृहद्दशम हा त्यांनी वावा पाध्ये यांच्या सांगण्यावरून लिहिला. तो कठिण झाला असें बाबांनी मटल्यावरून नंतर 'मंत्रभागवत' रचिला. 'हरिवंश' पांडुरंगराय नाईक यांचे सांगण्यावरून लिहिला. 'ब्रह्मोत्तरखंड,' 'कृष्णामाहात्म्य', व 'मदालसाख्यान' ही काव्ये स्वगुरुपुत्र सदाशिव पंडितांच्या सांगण्यावरून त्यांनी रचिली. गीतेवर सयमक व निर्यमक अशी दोन प्रकारची गीतिरचना पंतांनी केली आहे. निर्यमक गीतेचे पहिले सहा अध्याय मात्र पंतांचे असून बाकीचे त्यांचा पुतण्या आप्पा पराडकर ह्मणून ब्रह्मावर्तीत राहत असे त्याने केले ह्मणून सांगतात. पंतांनी वैद्यकाचा अभ्यास सुश्रुतादि ग्रंथांवरून चांगला केला असून ते कधी कधी औषधयोजनाही करित असत. तसेच त्यांच्या वैद्यकीवर आर्या असल्याचे सांगतात वावा पाध्ये यांनी भर्तृहरीच्या तीन शतकांवर आर्या रचिण्यास, तसेंच दोन सहस्त्रांत एक अशी संस्कृत पंचकाव्ये रघुवंशादि पंचकाव्यांच्या धोरणावर सर्गादि रचना धरून करण्यास पंतांस सुचविले होते. बाबा पाध्ये यासारख्या विद्वच्छेष्ठाच्या मनांत जेव्हा मोरे