या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २१३ न में प्रिय, सदोष तें; प्रिय सदोषही चांगले; ____ स्वतोक पितरां रुचे, जरिहि कर्दमी रांगलें. । तुलाचि धरि पोटिशी कशि तदा यशोदा बरें? जरी मळविशी रँजोमलिनकाय तूं अंबरें. ॥ १. प्रास्ताविकः-मागील केकेंत स्वकीय दोषाविषयी प्रभूची दुर्लक्षता दाखविली, तोच भाव दृष्टांतांतरांनी कृष्णावतारलीलाकयगद्वारा सांगतात. अन्वयार्थ.-जें (जी वस्तु) प्रिय न (आवडती नाहीं, आवडत नाही) ते (ती वस्तु) सदोष (दोषयुक्त) [दिसते] [तसेंच प्रिय (जी वस्तु आवडती आहे) सदोषही (ती जरी दोषयुक्त असली तरी) चांगले (निर्दोष अशी दिसते); स्वतोक (आपले मूल. पोटचे पोर) जरीहि कर्दमी (चिखलांत) रांगों [तरी तें पितरां (आईबापांना) रुचे (आवडतें). जरी तूं रजोमलिनकाय (धुळीने ज्याचे अंग भरलें आहे असा) अंबरें (यशोदेची वस्त्रे) मळविशी (मळवीत होतास) [तरि तदा (त्या वेळेस) यशोदा तुलाचि पोटिशी कशी धरी बरें? प्रथमचरणार्थ:-जी वस्तु आपणास आवडत नाही तिला काही तरी दोष लावावयाचा व आपणास आवडत्या वस्तूंत दोष जरी असला तरी तो गुणच भासावयाचा, ही जनाची रीतिच आहे. याला दृष्टांत पुढल्या चरणांत देतात २. आपले मूल. ३. आईबापांना. द्वितीयचरणार्थ:-पोटचं पोर चिखलांत रांगून चिखलाने भरले असले तरी ते स्वतः आईबापांना गोडच वाटते. स्वतःचे मूल कितीही कुरूप असले किंवा त्याचें आंग धुळींत भरल्यामुळे ते कितीही घाणेरडे असले तरी आईबापांना तें प्रियव असते. याला संस्कृतांत 'नापिकपुत्रन्याय' ह्मणतात. एका राजाने एका नापिकाला एक अत्यंत सुंदर मुलगा आणावयास सांगितले असता त्याने आपल्या कुरूप मुलालाच अत्यंत सुरूप समजून राजापुढे नेले तेव्हां राजाला त्याचे आश्चर्य वाटले व रागही आला. पण स्वतःचा मुलगा आईबापांस अत्यंत कुरूप असला तरी अत्यंत सुरूपच वाटतो ह्मणून न्हाव्याकडे बिलकुल दोष नाही अशी प्रधानाने राजाची समजूत करून राग दूर केला. अशी ह्या न्यायासंबंधी कथा आहे. म्हणूनच कालिदासाने शाकुंतलांत 'धन्यास्तदंगरजसा मलिनीभवंति. ह्मणजे 'ज्या आयांची वस्त्रे पोरांच्या अंगावरील धुळीनें मलिन होतात त्या धन्य होत,' असा उदार काढिला आहे. ४. देवा! (कृष्णावतारी) स्वतः तुम्हांलाच. ५. पोटाशी. ६. व्रजपति नंद त्याची भार्या व कृष्णमाता. ७. धुळीने भरलें आहे अंग ज्याचें. प्रास्ताविकःआपले मूल चिखलांत भरून घाणेरडे झाले तरी तें आईबापांना चांगलेच वाटते या सामान्योक्तीच्या स्पष्टीकरणार्थ कवीने येथे प्रत्यक्ष भगवंताच्या लीलावतारचरित्रांतीलच एक उदाहरण दिले आहे. द्वितीयार्धाचा अर्थः-देवा! कृष्णावतारी धुळीने ज्याचे अंग मळले आहे असा तूं जरी यशोदेची वस्त्रे मळवीत असस, तरी तुला यशोदा किती प्रेमाने पोटाशी घेत होती बरें? व्यंग्यार्थः-तेव्हां ज्याला एकदां आपलेंसें झटले तेव्हां त्याने कितीही अपराध केले तरी त्याला पोटाशी धरून त्याच्यावर अनुग्रह करणे हेच आपणास योग्य आहे असें कवि यांत