या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

___केकावलि. २२३ वरीसारबरासु वध पिला न निष्ठुरपणें, कृपा करुनि ते भवीं तारिले;। जंगजनक तूं , मुलें सकळ जीव, यां भातुकें ____टावुनिहि देशि बा! अमृत नेदिजे घातुकें. ॥ ९० वैरी प्रगट शांतिला धरि, परंतु मीना बंकी सर्व दुष्ट लोक संसारपाशांतून मुक्त होऊन भगवत्स्वरूपी मिळून गेले. तेव्हां तुम्हीं त्यांना मारिलें हा त्यांच्यावर अपकार झाला नसून उलट उपकारच झाला. ईश्वराच्या हातून मृत्यु पावलेले राक्षस संसारसागरांत तरले:-रामाने खरदूषणत्रिशिरांचा संहार करून शूर्पणखेला विरूप केली हे ऐकून, आपणासह सर्व राक्षसकुळांचा नाश करण्याकरितां ईश्वरच रामरूपाने अवतरला आहे असें रावण मनांत समजला व राम जर परमात्म्याचा अंश असेल तर त्याच्या हातून मरण आल्याने मला वैकुंठाचे राज्य मिळेल, नाही तर राक्षसांचे राज्य भोगावयास सांपडेल असा विचार करून, तसेच रामरूपी भगवान् आपल्यावर लवकर सुप्रसन्न व्हावे म्हणून रामाशी विरोधभक्तीने वागण्याचा रावणाने निश्चय केला. ह्या प्रसंगीच्या रावणाच्या विचारांचे प्रतिबिंब अध्यात्मरामायणांतील पुढील श्लोकांत सुरेख दृष्टीस पडते. ते वरील श्लोकाच्या स्पष्टीकरणार्थ उपयुक्त जाणून आम्ही वाचकांस सादर करितों:-यद्वा न रामो मनुजः परेशो मां हंतुकामः सबलं बलौधैः । संप्रार्थितोऽयं द्रुहिणेन पूर्व मनुष्यरूपोऽद्य रघोः कुलेऽभूत् ॥ ५९ ॥ वध्यो यदि स्यां परमात्मनाहं वैकुंठराज्यं परिपालयेऽहम् । नो चेदिदं राक्षसराज्यमेव भोक्ष्यं चिरं राममतो व्रजामि ॥६०॥ इत्थं विचिंत्याखिलराक्षसेंद्रो रामं विदित्वा परमेश्वरं हरिम् । विरोधबुद्ध्यैव हरिं प्रयामि द्रुतं न भक्तया भगवान्प्रसीदेत् ॥ ६१ ॥ [अरण्यकांड-सर्ग ५]. हरिवंशांत शंकर कृष्णाला ह्मणतातः-'नामचि घेतां पोटी घालुनि अपराध सकळ वळलास । करिसि अरिसि निजसम तूं बा! कंसीं काय न कळवळलास'. ॥ (५०.८७). १. संसारांत. 'भवी तारिले' त्यांच्या अपराधांचा त्यांस यथान्याय दंड देऊन मुक्त केले. २. जगाचा उत्पन्नकर्ता बाप. ३. खाऊ. द्वितीयार्थाचा अर्थः-ईश्वरापासून सर्व जगाची उत्पत्ति झाली असल्यामुळे तो जगाचा पिता असून सर्व प्राणिमान त्याची लेकरें होत. ह्या लेकरांच्या कल्याणाकरितां कधी कधी ईश्वराला त्यांना शासन करून भय दाखवावे लागते, तरी शासनानंतर त्याच्यापासून जीवरूप लेकरांना खाऊ अर्थात् सद्गतिच प्राप्त होते. तेव्हां ईश्वर जीवांविषयी निर्दय नसून सदयच आहे. कारण ज्याला दुसन्याचा घात करावासा वाटतो असा मनुष्य त्याला अमृत कदापि देणार नाही. तेव्हां दुसऱ्यास अमृत देणारा मनुष्य त्याचा घात करण्यास कधीही इच्छिणार नाही. ईश्वर रावणकंसादि लाखों दुष्टांचा संहार करून शेवटी त्यांना अमृत (मोक्ष) देतो म्हणून तो त्यांचा घात करणारा नव्हे, उलट तो त्यांचा सदय पिताच आहे. ४. दपटशा देऊन, धाक दाखवून. ५. मोक्ष; (पक्षी) सुधा. ६. घातक्याने. ७. प्रास्ताविक:-'अमृत नेदिजे घातुकें' असें जें मागे सामान्य विधान केले त्याचे या केकेंत उदाहरण देऊन कवि समर्थन करतात... अन्नयाथः-बकी (बगळी) वरी (बाह्यात्कारी) प्रकट (स्पष्ट, उघड) शांतिला (शांत