या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४ मोरोपंतकृत गिळी; तशि तुला टपे सुकृतबुद्धिहीना बंकी। जिणें गैरळ पाजिलें, अमृत पाजिलें तीस ता; णास) धरि (धरिते) परंतु मीना (माशास) गिळी (गिळते) तशी (त्या बगळीप्रमाणे) सुकृतबुद्धिहीना (सत्कर्माचरण करण्याची जिला बुद्धि नाही अशी) बकी (पूतना) तुला (बाळकृष्णाला) टपे (टपून राही); जिणें (ज्या पूतनेने) गरळ पाजिलें (तुझांला विष प्राशन करण्यास दिले) तिस (तिला) तां (त्वां, तुझी) अमृत (सुधा, पक्षी मोक्ष) पाजिलें (प्यावयास दिले) [] [तुमचे भलेपण (चांगुलपण, मोठे उपकाराचे काम) खळासि (दुष्टांस) न दिसो (न दिसले तर न दिसो) [पण] भल्या (साधु लोकांना, तुमच्या भक्तांना)[तुम्ही खरे (भले, कृपावंत) दीसतां (दिसतां). प्रथमार्धाचा अर्थःबगळी नदीतीरावर उभी राहून डोळे मिटून बाह्यात्कारी फार सात्विकपणा दाखविते पण एकादा मासा आटोक्यांत आलासा दिसला की त्यावर पटकन् झडप घालून त्याला गिळून टाकते. तिच्याप्रमाणेच पापिणी पूतना वरून मोठे प्रेम दाखवून देवा ! तुमचा नाश करण्यास टपत होती. कथासंदर्भ:-पूतना ही बळीनामक असुरेश्वराची कन्या गोकुळांत सुंदर स्त्रीचे रूप धरून आली व तिने नंदगृहीं जाऊन कृष्ण आपणास फार आवडतो असें दर्शवून त्याला आपल्या मांडीवर घेतले व त्याला फार लाडवू लागली. पण कृष्णाविषयी तिचे हे प्रेम केवळ बाह्यात्कारी असून कृष्णाचा नाश करण्यास ती संधि पाहत होती. म्हणून तिनें थोडा वेळ कृष्णाचे कौतुक करून विषाने माखलेले आपले स्तन त्याला प्यावयास दिले. कृष्णाने तिच्या स्तनांतील सर्व विष शोषून घेऊन अंती तिचे पंचप्राणही ओढले व अशा रीतीने तिचा वध करून तिला उत्तम गति दिली. 'नष्टायु मोहितां भरि गररस वदनीं कुबुद्धि तेहि तरे; । वाखाणितां सुधादिक वरदेश्वर बाळ यश करी हित रे' (पूर्णमंत्रभागवत ६). १. सुकृत-पुण्य, तद्विषयक बुद्धि तिने रहित; पुण्यकर्माविषयीं जीस बुद्धि नाहीं अशी; पापिणी. पूतनेने गोकुळांत येऊन कृष्णभ्रांतीने पुष्कळ बाळें मारली व शेवटी ती नंदगृहांतील बाळ मारावयास आली. २. पूतना ही कंसाची उपमाता होती. ३. ज्या पूतनेने. ४. विष. ५. सुधा; (पक्षी) मोक्ष. तृतीयचरणार्थ:-पूतनेने तुम्हांला मारण्यासाठी विष पाजिले पण तुम्ही उलट तिला अक्षय जीवदान देणारे अमृत पाजिलें, अर्थात् तिला मुक्त केले. तुमची दयालुता यापेक्षा आम्ही कोणती वावा। आपल्यास विष पाजून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पूतनेला भगवंतांनी मुक्ति दिला हे प्रभूचे अत्यंत दयालुत्व दाखविते. 'पूतनेने भगवंतास विष पाजिले पण त्यांनी तिला अमृत दिलें' अशा प्रकारचे वर्णन पंतांनी व इतर कवींनी पुष्कळ जागी केले आहे. त्याची थोडी उदाहरणे:-(१) दत्वा विषमपरिमितं लब्धं त्वत्तोऽमृतं नु पूतनया । पूतनयाद्यवृतस्त्वं कीया तत एव नित्यनूतनया.' ॥ [कृष्णस्तवराज],(२) यज्ञपति विष म्हणेना, झांकुनि नयनें, जगज्जनक थानीं। रुचि आणुनि, पी; तिस दे अमृत, म्हणुनि वेधले जन कथांनी.' ॥ [मंत्रभागवत-दशमस्कंधगाति १२१], (३) देताही विष पावली अमृतता ते राक्षसी पूतना.' । [वामनपंडित-रासक्रीडालोक १८४](४) यो देवकीमिव वकीमपि विश्वयोनिः । स्वीयं निनाय पदमुज्ज्वलयैव मत्या। सर्वापरा.