________________
केकावलि. मळे कलियुगी श्रुती जशि, खळी तिची तेंवि धी। कदाचित विटेल; बा! तव दैया न दीना वैरी, (कदाचित् ) विटेल (कंटाळेल ) की (कारण की) विधी (देव)(दुर्दैव ) शत (शेकडो) निमित्तें (कारणे) रची ( उत्पन्न करिते); जशी कलियुगीं श्रुती (वेद) मळे (मळले, भ्रष्ट झाले) तेंवि तिची धी (आईची बुद्धि) कदाचित् खळी (वाईट पुत्राचे ठायीं) विटेल (भ्रष्ट होईल); जशी भवन्नदी (आपली नदी, गंगा) जगदघक्षयीं (विश्वांतील पातकाचा नाश करण्याविषयीं) कर (हात) नावरी (आवरीत नाहीं) [ तशी] बा! (बापा ! देवा ! ) तव दया (भगवत्कृपा) दीनावरी (दुर्बळावर)[कदाचित् ] न [विटेल] (कमी होणार नाहीं). ८. जन्मदात्री मातोश्री देखील. ९. कारण की. १०. दुर्दैव, प्राक्तन. १. प्रथमचरणार्थ:-जननी कुपुत्राला कंटाळत नाहीं असेंमागील केकेंत सांगितले, पण काही कारणामुळे तीही कुपुत्रास कंटाळेल. प्राक्तन कर्म शेकडों कारणे उत्पन्न करितें तेव्हां ते कोणते ना कोणतें तरी निमित्त रचून मातेच्या मनांत कुपुत्राविषयी कंटाळा आणील. 'शत' ह्मणजे शंभरच' असा अर्थ येथे नसून 'शेंकडों पुष्कळ' असा अर्थ होतो. कलियुगांत. एकंदर युगें चारः कृत, त्रेता, द्वापार व कली. कृतयुगास सत्ययुग असेंही नांव दिलें आहे. या सर्व युगांत कलियुग अत्यंत भ्रष्ट व पापी असें गणिलें आहे. सर्व प्रकारची पातकें या युगांत घडतील ह्मणून प्राचीन ग्रंथांतून भविष्य केले आहे. वास्तविकपणे कृत, त्रेता, द्वापार व कली ही चार युगें मनुष्याच्या आचरणावर अवलंबून आहेत. कर्तव्यदक्ष, धार्मिक व उद्योगी मनुष्याला नेहमीच कृतयुग असून आळशी व अविश्वासी अशा मनुष्याला मात्र नेहमीं कलियुग असते. हा विचार ब्राह्मण ग्रंथांतील पुढील पद्यांत उत्तम रीतीने दिसून येतोः-कलिः शयानो भवति, संजिहानस्तु द्वापरः उत्तिष्ठनेता भवति कृतं संपद्यते चरन् ॥ चरैव चरैव' (बव्हच ब्राह्मण ). कलियुगांत श्रुतिस्मृतीचे माहात्म्य नष्ट होईल याविषयी पुढील सुभाषित वाचनीय आहे:'श्रुतिः शिथिलतां गता स्मृतिरपि प्रनष्टाधुना । गतिविपथमागता विगलिता द्विजानां ततिः । गवामपि च संहतिः समुचितक्रियातश्युता । कृता नु जरया तया कलियुगस्य साधर्म्यता' ॥ अर्थः(जरापक्षी) कान बहिरे झाले, स्मरण नाहीसे होत चाललें, नीट चालतां येत नाही, दांत पडले व इंद्रियांचे योग्य व्यापार त्यांजकडून होणे बंद झाले. (कलिपक्षी ) वेदमाहात्म्य कमी झालें, स्मृतिलोप झाला, सद्गतीचा मार्ग सुटला, विप्रांचे संघ दृष्टीस पडत नाहीत व लोक गाईंचे पालनपोषण करीत नाहीत. तसेंच पुढील कलिकौतुक पहा:-'सीदन्ति सन्तो विलसंत्यसंतः। पुत्रा नियंते जनकश्चिरायुः । परेषु मैत्री स्वजनेषु वैरं । पश्यतु लोकाः कलिकौतुकानि' ॥ आमच्या प्रमाणे ग्रीकलोकांत सुवर्ण, रौप्य, ताम्र व लोह अशी चार युगे समजत असूनः मागे गेलें तें सुवर्णयुग व चालत असलेले लोहयुग असे मानण्याचा त्यांचा संप्रदाय होता. २. वेद. वेदाविषयीं अल्प माहिती:-'मंत्रब्राह्मणात्मको वेदः' असें मायणाचार्यांनी वेदाचें लक्षण दिले आहे. यावरून वेदाचे संहिता आणि ब्राह्मण असे दोन भाग होतात. वेदाच्या मंत्रसम