या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २३३ मंत्रावरून त्यांतील अकरा देव स्वर्गात, अकरा पृथ्वीवर व अकरा अंतरिक्षांत राहातात असे कळून येते. तेहतीस देवांत अग्नि, वायु, इन्द्र, मित्र, वरुण, अश्विनौ देव, मरुद्गण, ब्रह्मणस्पति, सोम, सविता, द्यावापृथ्वी, विष्णु, पूषा, भग, उषा, अर्यमा, रुद्र, सूर्य, त्वष्टा, ऋभु, अदिति हे विशेषेकरून मुख्य मानतात. शतपथ ब्राह्मणामध्ये (४-५-७-२) अष्टवसु (पंचमहाभूतें, सूर्य, चंद्र, व नक्षत्रे), एकादश रुद्र (दशप्राण व जीवात्मा ) द्वादशादित्य ( संवत्सराचे बारा महिने ) इंद्र ( विद्युत् ) व प्रजापति ( यज्ञ ) असे तेहतीस देव मानले आहेत. इंद्र व प्रजापतिबद्दल यू व पृथ्वी मानून अष्टवसु, एकादश रुद्र, व द्वादशादित्य हे बाकीचे एकतीस असेही मानतात. ऋग्वेदांत सांगितलेले बहुतेक सर्व देव कशाचे तरी अभिमानी देव असून रूपकसिद्ध आहेत. उदाहरणार्थ 'अग्नि' ह्मणजे जगतांतील जे कांहीं तेज आहे तदभिमानी देवता, 'वरुण' ह्मणजे रात्रीचा अभिमानी देव 'इंद्र' ह्मणजे आकाशांतून पाऊस पाडणारी जी शक्ति तदभिमानी देव, 'सविता' ह्मणजे सूर्यरूप देव, 'मित्र,' ह्मणजे दिवसाचा अभिमानी देव, 'मरुत्' ह्मणजे वादळांचा अभिमानी देव, व 'यू' ह्मणजे अंतरिक्षावरील प्रकाशानें व्याप्त झालेल्या प्रदेशाचा अभिमानी देव. 'यू' देवाला पति मानून पृथ्वीच्या अभिमानी देवतेला त्याची पत्नी मानिली आहे व ही सर्व देवांची मातापितरे होत असेंही सांगितले आहे. धूलोक, पृथ्वी आणि अंतरिक्ष इत्यादि जो अवकाश अथवा पोकळी तिला अदिती अथवा अखंड पोकळी असें ह्मणून देवता मानली आहे. हिच्या पोटांत सूर्य, चंद्रादि संपूर्ण प्रकाशगोल वर्ततात ह्मणूनच हिला पौराणिक ग्रंथांतून देवमाता मानिली आहे. 'उषा' ह्मणजे प्रभातकालची देवता. हिला सूर्य अथवा इंद्रदेवाची योषा, तसेच इतरत्र कन्या असे मानले आहे. इंद्र हा वृत्राचा (अर्थात् मेघाचा) शत्रु, शचीपति (पराक्रम करणारा) व वज्रधारी (विद्युद्धारी) आहे; मरुत् - देव त्याचे साह्य करितात, ह्या गोष्टी; तसेंच पुरूरवस् (पुष्कळ किरणें ज्याला आहेत असा सूर्य) व उर्वशी (चहूंकडे पसरणारी उषा देवी) यांचा विवाह, इंद्र उषेचा व रात्रीचा जार आहे इत्यादि गोष्टी वरीलप्रमाणेच रूपकसिद्ध आहेत. वेदांतील सर्व देव हे एकाच परमात्म्याच्या भिन्न शक्ति ह्मणून वर्णिल्या आहेत. वास्तविक परमेश्वराचे स्वरूप 'एकमेवाद्वितीयं' असेंच वर्णिले आहे. वेदांतील देवस्तुतीचा मासला पृ० १६२त दिला आहे. त्यावरून त्यांतील सौंदर्य व उदात्तता ही दिसून येतात. कलियुगांत वेद अधर्मी व नास्तिक यांच्या हाती पडल्यामुळे व मुखीं गेल्यामुळे मलिन व सत्वहीन होतात. वेद कधीं मळावयाचे नाहीत पण तेहि कलियुगांत जसे मलिन होतात. तहत मातेची बुद्धि कदाचित् या कलियुगांत कुपुत्राविषयी मळेल. ३. दुष्टाविषयीं, कुपुत्राविषयीं. ४. बुद्धि. ५. एखादे वेळेस तरी. ६. कृपा, दासावरील दया. 'तव दया न दीनावरी' याचा अर्थः-भगवंताची कृपा दीनदुर्बळाविषयीं कधीही कंटाळावयाची नाही. पाप्यावर दया करण्याविषयी ती कदापि माघार घेत नाही. या कलियुगांत मातेची बुद्धि एकवार कुपुत्राविषयीं अकृप होईल पण भगवत्कृपा आपल्या पापी पुत्रावर प्रसाद करण्यास कधीच चुकणार नाही. कारण भगवंतांच्या दये पढ़ें कळिकाळाचें कांहीं चालावयाचें नाहीं. पृ० ५२ यांत बायबलांतून व ज्ञानेश्वर उतरलेली वचनें याशी समानार्थक आहेत. 'नमितां न लोटिला त्वां पायें कोणीहि