या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३८ मोरोपंतकृत अशी तरि कृतज्ञता हरि! तुझ्याच ठायीं अगा! ___ संख्या ! अणुचि मानिशी, करुनि सुप्रसादा अँगा; भुले सुकविवाग्वधू तव गुणा अनानगा; ह्मणेल जन कोण, की यश पुनः पुन्हा तें न गा?॥ ९९ अवतार अनंत आहेत त्यांतही दशावतार मुख्य आहेत. दशावतारांतही कृष्णावतार फारच विलक्षण. याविषयी एकनाथी भागवतांतील पुढील उतारा वाचनीय समजून पुढे दिला आहे:'बहुत अवतारी अवतरला. देव । परि या अवतारीचा नवलाव । देवां नकळे अभिप्राव । अगम्य पहा हो हरिलीला ॥ १८५ ॥ उपजतांचि मायेवेगळा । वाढिन्नला स्वयें स्वलीला । बाळपणीं मुक्तीचा सोहळा । पूतनादि सकळां निजांगें अपी ॥ १८६ ॥ मायेसि दाविलें विश्वरूप । गोपाळां दाविलें वैकुंठद्वीप । परी गोवळेपणाचे रूप । नेदीच अल्प पालटों ॥ १८७ ॥ बाळबळियांतें मारी। अचाट कृत्ये जगादेखतां करी। परी बाळपणाची बोहरी । तिळभरी नव्हेची ॥ १८८ ॥ ब्रह्म आणि चोरी करी । देव आणि व्यभिचारी । पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी । हेही परी दाखविली ॥ १८९ ॥ अधर्मे वाढविला धर्म । अकम तारिलें कर्म । अनेमें नेमिला नेम । अतिनिःसीम निर्दुष्ट ॥ १९० ॥ तेणें संगेंचि सोडिला संग । भोगे वाढविला योग । त्यागेंवीण केला त्याग । अति अव्यंग निर्दोष ॥ १९१ ॥ भक्ति, भुक्ति मुक्ति, । तिन्ही केलीं एक पंक्ती। काय वानूं याची ख्याती। खाऊनि माती विश्वरूप दावी. ॥ १९२ ॥' (एक-भाग अ० १). १. प्रास्ताविकः-यांत कवि भगवंताची कृतज्ञता वर्णितात. २. प्रत्युपकार कर. ण्याची बुद्धि. अन्वयार्थः-अगा! हरि! (हे देवा!) अशी तरि (मागील श्लोकांत वर्णिलेल्या प्रकारची) कृतज्ञता (प्रत्युपकारबुद्धि) तुझ्याच ठायीं [तुझ्याच ठिकाणीं] [असे. सख्या! (गड्या !) अगा सुप्रसादा (पर्वतप्राय उत्तम प्रसादाला) करुनि (भक्तांवर रून) अणुचि (केवळ रजःकण) मानिशी (मानितोस); सुकविवाग्वधू (व्यासवाल कादि कविजनांची वाणीरूपिणी नवरी) तव (तुझ्या, भगवंताच्या) अना (अमर अपूर्व) नगा (अलंकाराला) गुणा (गुणाला) भुले (भुलते, मोहित होते. तें यश (सुकविला भुलविणारी भगवंताची कीर्ति) कोण जन (कोणता मनष्य पुनः पुन्हा न गा (गाऊं नका) म्हणेल (ह्मणणार आहे)? प्रथमचरणार्थ:कोणी आपणावर थोडासा उपकार केला तरी त्याबद्दल त्यावर अनन्यसामान्यउपकार करावयाचे अशी मागील केकेंत उदाहरणांनी स्पष्ट केलेली तुझी कला तुझ्याच ठिकाणी दृष्टीस पडते. इतर कोठेही ती आढळत नाही. 'कृष्णविजयउत्तरार्धा'त सुदामदेवानें कृष्णाविषयी अशाच प्रकारचा उद्गार काढिला आहे. तो असा:-'सुहदर्पित अणुमात्रहि तें ब्रह्मांडापरीस करि थोर' [अ० ८१ गी० ११०]. ३. येथे 'सख्या!' असें भगवंतास संबोधून कवीने भगवंताशी अत्यंत सलगी केली आहे ती 'सख्यभक्ति'ला अनुसरून ठीकच आहे. अशा प्रकारे एकनाथ, तुकारामादि महाराष्ट्र संत