या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४० मोरोपंतकृत प्रतिक्षण नवीच दे रुचि शुकाहि संन्यासिया; - न मोहिति भंवत्कथा अरसिका अधन्यासि या. ॥ १०० वर्णनाविषयी आपला कंटाळा दाखवितो तो रसिक कसा? त्याला रसिक असे कसे म्हणता येईल ? अर्थात् तो खरा रसिक नव्हे. खरा रसज्ञ पुरुष भगवत्कथारस पुनः पुनः घेण्यास कंटाळत नाहीं.६. गोष्ट, चरित्रकथन. १.क्षणोक्षणीं. द्वितीयार्धाचा अन्वयार्थः-भवत्कथा (आपल्या कथा, भगवंताची चरित्रे) शुकाहि संन्यासिया (शुकाचार्यासारख्या अत्यंत वैराग्यशील व सर्वसंगपरित्याग केलेल्या ऋषीस सुद्धां) प्रतिक्षण (प्रत्येक क्षणास) नवीच (नूतन) रुचि (आवड, गोडी) दे (देती झाली)' या [भवत्कथा] (वर निर्दिष्ट केलेल्या भगवंताच्या कथा) अरसिका अधन्यासि (करंट्याला, दुर्दैव्याला) न मोहिति (मोहित नाहीत). तृतीयचरणार्थः-ज्याने सर्व ऐहिक गोष्टींचा त्याग करून आपले चित्त परमात्म्याकडे लाविले अशा शुकमुनीला सुद्धां भगवंताची कथा प्रतिक्षणी नवी नवी गोडी देती झाली. प्रभुयशाचे वर्णन वारंवार करण्यांतच त्याला आनंद वाढू लागला यावरून शुकाचार्यासारखे जे खरे रसज्ञ आहेत त्यांना भगवंताचे गुणानुवाद वारंवार वर्णन करणे आवडते. अध्यात्मरामायणांत एका भक्तानें प्रभुकथेविषयी असाच उद्गार काढिला आहे:-'कथापीयूषमासाद्य तृष्णामेऽतीव वर्धते.' (याचा अर्थ:हे कथामृतपान करून माझी तृष्णा अतिशय वाढली आहे). २. आवड, गोडी. ३. पाठभेदः-'शुकादि' असाही पाठ आहे. परंतु मुळांतीलच पाठ सरस आहे. खुबीदार शब्दयोजनाः-शुकाचार्यासारख्या परमेश्वराच्या निर्गुणस्वरूपाला भजणाऱ्या ब्रह्मनिष्ठाला जर सगुणावतारकथा वारंवार श्रवण करणे आवडते तर मग कथेच्या पुनर्वर्णनाचा कंटाळा करणारा प्रापंचिक मनुष्य अरसिक व अधन्य कसा नव्हे ? पुढील भागवती ओवीकडे जरा नजर द्यावी:-'श्रीकृष्णाचा स्मरतां काम । स्वयें संन्याशी होती निष्काम । सकामाचा निर्दळे काम । ऐसें उदारकर्म आचरला.' ॥ (एक० भाग १. ३००) ४. संन्याशाला. शुकाचार्य जन्मादारभ्य ब्रह्मचारी असून परमात्म्याच्या चिंतनांत त्यांचा वेळ जात असे म्हणून त्यांना संन्यासी (ऐहिक वस्तूंचा ज्याने सम्यक्-चांगल्या रीतीने, न्यास-त्याग केला आहे तो संन्यासी) म्हटले आहे. सामान्य व्यवहारांत श्रौतस्मार्तादि अग्निसाध्यकर्मांचा त्याग करून निरग्नि होणाऱ्यास संन्यासी म्हणतात.पण गीतेच्या साहाव्या अध्यायाच्या आरंभी सांगितल्या. प्रमाणे कर्मफलावरील आसक्ति सोडून कर्तव्यकर्म करणारा मात्र खरा संन्यासी. संन्याशाचे लक्षण बृहदारण्यकांत असे दिले आहे:-'ब्राह्मणाः पुत्रेपणायाश्च वित्तेघणायाश्च लोकेषणायाश्च व्युत्थायाथ भिक्षाचर्य चरति.' तात्पर्य, लोकेषणा, पुत्रेषणा व वित्तेपणा या तीन ईषणांचा त्याग करून भिक्षावृत्तीने राहाणारा 'संन्याशी.' 'संन्यासा' संबंधी संतमुकुटमणी तुकारामबोवा हे म्हणतात:-(१) ऐसा घेई बा संत्यास । करी संकल्पाचा न्यास ॥१॥ मग तूं राहें भलते ठायीं । जनीं वनीं खाटे भुई ॥ २ ॥ तोडिं जाणिवेची कळा । होई वृत्तीसी वेगळा ॥३॥ तुका म्हणे नभा। होई आणुचाही जाना. ४॥ (२) सहांतें जो नाशी साधी नारायण । संन्यासी तो जाण धन्य एक ॥१॥ तुका