या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि, २४३ चेष्टा) ह्मणतात. आलस्य, उग्रता, व जुगुप्सा हे खेरीज करून निर्वेद (संसार किंवा देह यांविषयीं तुच्छता), ग्लानि, मद, नीडा, चापल्य, औत्सुक्य इत्यादि व्यभिचारीभाव (रसोत्पत्तीस साह्यकारी मनोविकार) समजावे. स्तंभ, प्रलय, रोमांच, स्वेद, वैवर्ण्य, वेपथु, अश्रु व वैस्वर्य हे अष्ट सात्विकभावही संभोगशूगारांत येतात. विप्रलंभशंगाराची व्याख्या वर दिलीच आहे. 'विप्रलंभ' शब्दाचा मुख्य अर्थ संभोगसुखाच्या लोभाने विशेषेकरून अनुरक्त स्त्रीपुरुषांचें फसणे. यांत स्त्रीपुरुषांच्या वियोगावस्थेचे वर्णन असते. ह्याचे विभाव प्रायः संभोगशूगारांत सांगितलेले सामान्य विभाव असून शिवाय समागमास येणाऱ्या अडचणी, गुणस्मरण, पूर्वोपभुक्त पदार्थांचे दर्शन, उत्सवादिक प्रसंग इत्यादि आणखीही आहेत. ह्या व अशाच इतर कारणांनी इष्टजनांविषयी (पुरुषास स्त्रीविषयी किंवा स्त्रीस पुरुषाविषयी) वियोगाचे दु:ख प्रदीप्त होऊन मनुष्यास चैन पडेनासे होतें, वर्ण पांढरा पडतो, अन्नपाणी गोड लागत नाहीं, शृंगारास वाढविणारे जे चंद्रचंदनादि शीतल पदार्थ ते तापप्रद होऊन, तो रोदन करूं लागतो, आलंबनाच्या प्राप्तीविषयीं यन करितो, त्यास इष्ट वियोगाविषयी फार शोक होतो, ग्लानि येते, प्राप्ति कशी होईल याविषयीं तो तर्क बांधतो, कधी कधी विवेक नष्ट होऊन त्यास मोह उत्पन्न होतो, जीवित तुच्छ वाटते, व निवेद होतो. अशा रीतीने चिंता, जडता, स्वप्न, विषाद, अमर्ष, असूया इत्यादिक अन्य विकारही उत्पन्न होतात. स्त्रीपुरुषांचा वियोग होण्याची जी कारणे त्या कारणांवरून विप्रलंभशंगाराचे कोणी अभिलाषा, विरह, ईर्ष्या, प्रवास आणि शाप असे पांच भेद करितात; कोणी अयोग, विप्रयोग आणि मान असे तीनच भेद मानतात. जेव्हां स्त्रीपुरुषांत परस्पर रतिभाव तर उत्पन्न झाला असतो, परंतु उभयतां किंवा दोहोंतून कोणी तरी एक परतंत्र असल्यामुळे परस्पर समागम घडत नाही तेव्हां त्यास जो खेद होतो तो 'अयोग' होय. एक वेळ स्त्रीपुरुषांचा समागम होऊन नंतर वियोग झाला असता त्यास विप्रयोग ह्मणतात. वरील पांच भेदांपैकी प्रवास आणि शाप ह्यांचा समावेश ह्यांतच होतो. प्रियाच्या अपराधामुळे जो प्रेमयुक्त कोप येतो त्यास मान असें ह्मण. तात. हा दोन प्रकारचा. एक प्रणयमान आणि दुसरा ईर्ष्यामान. प्रेमपूर्वक एकमेकांस वश अ. सणे त्यास प्रणय ह्मणतात. त्या प्रणयाचा भंग झाल्याने जो रोष उत्पन्न होतो तो प्रणयमान. मराठीत ह्यास 'रुसवा' हा शब्द आहे. आपल्या सवतीवर प्रियाचे प्रेम आहे असे समजल्यावरून किंवा प्रियाने दुसऱ्या स्त्रीशी समागम केल्याचे समजल्यावरून स्त्रीस जो रोष उत्पन्न होतो तो ईर्ष्यामान होय. ह्या केकेंतील शृंगार संभोग होय. प्रथमार्धात नटी ही आलंबनविभाव असून तिचे नाचणे हे उद्दीपनविभावांत येते. आनंद हा मानसिक अनभावन इतर कायिक व सात्विक अनुभाव होत. हर्ष, औत्सुक्य, मोह, जडता, इत्यादि व्यभिचा. रीभाव गुप्त आहेत. तसेच तृतीयचरणांत 'विलासिनीजन' हा आलंबनविभाव असून तिचे नेत्रकटाक्ष हे उद्दीपनविभाव होत. ह्यांतही कायिक, मानसिक व सात्विक हे अनुभाव, तसेंच हर्ष, औत्सुक्य, जडता, मोह इत्यादि व्यभिचारीभाव वरच्याप्रमाणेच गुप्त आहेत. ह्यांत स्थायीभाव 'रति' हे स्पष्टच आहे. 'नव्हे बुळा...मुका' ह्यांत बुळा हा विलासिनीजनाच्या कटाक्षक्षेपण चुंबनादि शृंगारिक क्रियांस प्रतिकूळ असून त्याला त्यांपासून आनंद होत नाही म्हणून शृंगाररसोत्पत्ति होत नाही. येथे नऊ रसांच्या उदाहरणांसहित त्यांची नांवें ज्यांत दिली