या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत इतक्यांत सकलचित्तपरीक्षक नारायणाने तिच्या मनांतील अभिप्राय समजून तिला सांगितले की, 'शचि! तुझ्या मनांतील हेतु परिपूर्ण होतील. पण त्यासाठी तूं साठहजार वर्षे हिमालय पर्वतावर तप कर. ह्मणजे मी कृष्णावतार धरीन त्या वेळेस तुला. आपल्या अर्धांगी धारण करीन.' याप्रमाणे वर पावून, व तपश्चर्या करून शची कृष्णावतारी राधा झाली. शचीने भगवत्समागमप्राप्तीस्तव अनंत जन्म तप केले होते; तीच गोकुळांत राधा झाली ही कथा पद्मपुराणांत असून जयदेव कवीने जे राधाकृष्णाख्यान लिहिले आहे त्यांतही तसेंच वर्णन आहे. तसेच पद्मपुराणांतर्गत वृंदावनमाहात्म्यांत राधेचे महत्व फार वर्णिले आहे. त्यांत असे सांगितले आहे की, भजन करणारांनी प्रथम राधेचें नांव घेऊन मग कृष्णाचें नांव घ्यावें. ह्मणजे राधाकृष्ण' अशा सामासिक पदानेच भजन करावें व मूर्ति पूजणे त्या देखील राधाकृष्ण, राधादामोदर, राधामाधव यांच्या पुजाव्या. ब्रह्मवैवर्त पुराणांत राधाकृष्णाच्या भक्तीचे माहात्म्य फार वर्णिले आहे. त्यांत राधेच्याच योगानें कृष्ण शोभतो व कृष्णाच्याच योगाने राधा शोभते असे सांगितले आहे. ('राधया माधवो देवो माधवेनैव राधिका । विभ्राजंते जनेषु इ०') या पुराणाच्या पहिल्या ब्रह्मखंडांत कृष्णापासून सर्व देवांची उत्पत्ति झाली असे सांगून पुढे कृष्ण रासमंडळांत जातांच त्याचे अंतःकरणापासून राधेची उत्पत्ति झाली असे सांगितले आहे. तसेच या पुराणाच्या चवथ्या खंडांत ह्मणजे कृष्णजन्मखंडांत गोलोकचे मुख्य अधिपति राधाकृष्ण यांनी परस्पर प्रेमास्तव गोकुळांत अवतार घेतले, असें वर्णन करून पुढे कृष्णाविषयी अनेक मोठमोठालीं व मनोरंजक आख्याने सांगितली आहेत. हे कृष्णजन्मखंड फार मोठे असून याचे १३२ अध्याय आहेत. भगवान् श्रीकृष्णांनी गोकुळांत जी अनेक विचित्र चरित्रं केली, त्यांतही गोपींशी व विशेषतः राधेशी त्यांनी जी रासक्रीडा केली त्यांविषयी पुष्कळांचा शोचनीय गैरसमज झालेला आढळतो. अशांनी पुढील अल्प लेख वाचून त्याचे मनन करावें. कृष्णचरित्रावरील कांहीं कुतीचे खंडण:- ईश्वराचा अवतार श्रीकृष्ण याचे व्यासांनी वेदांतशास्त्रपर वर्णन केले आहे. त्यांत त्यांनी असे दाखविले आहे की, 'गो' ह्मणजे इंद्रिये, व त्यांच्या अंतर्यामी आत्मा राहून त्यांचे पालन करणारा ह्मणून आत्माच 'गोपाळ,' 'गो' ह्मणजे इंद्रिये त्यांच्या आंतील ज्या ज्ञानवृत्ति त्याच 'गोपिका', 'गो' ह्मणजे इंद्रिये यांच्या ठायीं जो पंचविषयात्मक भोगरस हाच गोरस, हा पंचविषयरूप गोरस आत्मा जो गोपाळ त्याने या शानाने दूर करून, गो झणजे इंद्रिये त्या इंद्रियांच्या वृत्ति झणजे गोपिका ज्या त्यांना काम स्वस्वरूपा लीन केल्या. गोपिका गोपाळाचे ठिकाणी रममाण झाल्या, असे जे लिहिले आहे त्यांतील हे मर्म वेदांतशास्त्रपर आहे.' (वेदोक्तधर्मप्रकाश). भगवान् श्रीकृष्णाना ना गोपिकांशी क्रीडा केली त्याचे आणखी एक गूढ कारण आहे. परमेश्वराने भूभारहरणार्थ कृष्णावतार धरिला तेव्हां त्यांच्या बरोबरच गोलोकवासी राधादिक नित्यसिद्धदेवताही गोकुळांत गोपिका साल्या. तसेंच दंडकारण्यांतल्या ऋषींना रामदर्शनानंतर प्रभूशी क्रीडा करावी अशी इच्छा झाली. रामावतारी त्यांची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे त्यांनीही कृष्णावतारी गोकुळांत स्त्रियांचा जन्म कृष्णाबरोबर देवांनीही प्रभूच्या साहाय्यार्थ पृथ्वीवर अवतार घेतले तेव्हां शच्यादि दे. गोपिकांच्या रूपाने प्रभूबरोबर क्रीडा करावी ह्मणून अवतरल्या. याशिवाय भगवंताशी