या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २४९ । जशी तुज, जिला स्वयें ह्मणसि तूं शरीराधिका; । तिचे न घडतां, रमाहृदयवल्लभा ! सेवन घयी । ऐसा तूं त्रैलोक्याच्या ठायीं । स्वामी पाही श्रीकृष्णा!' ॥ २३० ॥ (एक-भाग० अ०६) (२) 'रासक्रीडा गोपिकांप्रती । कोणी ह्मणेल कामासक्ती । तेथे कामाची कैंची प्राप्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥१५२ ॥ जेथे क्रीडे आत्माराम । तेथें केवि रिघे बापडा काम । माझे कामें गोपिका निष्काम । कामसंभ्रम त्यां नाही. ॥१५६ ॥ विषयबुद्धि तें मुख्य अज्ञान । तें असतां मी न भेटें जाण । असतां वेदोक्त जाणपण । तेणेही संपूर्ण न भेटें मी ॥ १६६ ॥ जाणीव नेणीव गेलिया निःशेष । माझे पाविजे निजात्मसुख । श्रुति जाणोनि हे निष्टंक । गोकुळी त्या देख सुखार्थ आल्या १६७ ॥ त्याचि जाण समस्त श्रुती । गोपिकारूपें गोकुळा येती। रासक्रीडामिपं एकांतीं । माझी सुखप्राप्ति पावल्या.' १६८ ॥ (अ० १२) (३) 'सकाम भक्ताचे पुरवूनि काम । त्यांसी मी करी नित्य निष्काम । निजभक्तासी निजधाम । मी पुरुषोत्तम पाववीं २४. २९६ ॥ यालागी गोपींची कामासक्ती । म्यांचि आणूनी निष्कामस्थितीं । त्यांसी दिधली सायुज्यमुक्ति । जाण निश्चिती उद्धवा २९७ ॥ म्यां गोपिकांसी काम केला । की निःशेष काम त्यांचा हरिला । न विचारितां या बोला। कृष्ण व्यभिचरला मूर्ख म्हणती' २९८॥ 'कपिलगीते'वरील हरिदास आचरेकर यांच्या टीकेंत (तृतीयप्रसंग १-८) 'आत्मा' हा कृष्ण, 'सद्भाव' हा नंद, 'प्रवृत्ति' ही यशोदा, निवृत्ति' ही देवकी, 'देह' हे गोकुळ, 'हृदय' हे आंगण, 'विकल्प' हे दैत्य, 'अविद्या' ही पूतना, 'अनुहात' ही मुरली, 'वृत्ति' ह्या गोपिका, 'त्रिकूट' हे वृंदावन, 'उन्मनी' ही राधा व 'आदिमाया' ही रुक्मिणी असें कृष्णलीलेचे रूपक सोडविले आहे. श्रीकृष्णाच्या चौरकर्माबद्दल सुद्धा ग्रंथांतून समर्पक कारणे दिली आहेत. एकनाथाच्या- 'आवरि आवरि आपुला हरी' ह्या गवळिणीच्या पद्यांत 'श्री कृष्णाने भ्रांतीचे कवाड उघडून, मायेचें कुलुप मोडून, क्रोधाची अर्गळा काढून, अज्ञानाची खीळ तोडून अविद्येचे शिंके तोडलें, दंभाचा डेरा फोडला, प्रपंचताकाचा सडा घातला, अहंकाराचा घुसळखांव पाडला, संकल्पविकल्पाची दुधाणी फोडली व सचित ह्या शिळ्या लोण्याची धूळधाण केली, प्रारब्धाचे शिळे दही खाल्लें व क्रियमाण दूधही गट्ट केले; व जातांना द्वेषाचे रांधणे व कामाचे पाळे फोडून, सुचित दुश्चित तुपाच्या घागरी बाहेर टाकन दिल्या' असें रूपकपर वर्णन केले आहे. ह्या टीपेंत कृष्णासंबंधी ऐकू येणाऱ्या आक्षेपांच्या णाची दिशा मात्र दाखविली आहे. सत्यान्वेषणाची हौस असणाऱ्या शोधकांनी संतमंडळींच्या साह्याने स्वतःच्या अंतःकरणांतच याचा विस्तार करावा. सारांश भगवान् श्रीकृष्ण पर्ण निर्वि. षयी असून त्यांनी सकाम गोपिकांस देखील निष्काम केले. राधाकृष्णाचें प्रेम ह्मणजे भजकमज्याचे आत्मापरमात्म्याचे अथवा जीवशिवाचे प्रेम. भक्ताचे अंतःकरणांत राधेच्या प्रेमाची पोल प्रकाशते तेव्हां चित्प्रकाश व भगवत्साक्षात्कार तेथें सहज होतो. या परममंगल प्रेमास वैषयिक मानणारे लोक अत्यंत हतभागी समजले पाहिजेत. १. शरीरापेक्षा अधिक प्रिय, पंचप्राणांहून आवडती. २. रमा (लक्ष्मी) तिच्या हृदयाचा वल्लभ (प्राणेश्वर, प्रियकर) असा कृष्ण, त्या! रमविते (रमयति) ती (मा गो.