या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २५१ आर्याः-(१) "अप्रकृतारोपार्थचि करिती धर्मा निषेध जो प्रकृतीं। सत्कविमतिचातुर्ये शुद्धापन्हुति तयासि बुध ह्मणती. ॥१॥ नोहेचि हा निशापति जो गगनीं सुप्रसन्न भासतसे । तरि काय, अहो परिसा, स्वगंगेचे प्रफुल्ल पद्म असें ॥ २ ॥ अप्रकृतारोपार्थ=उपमानाचा आरोप करण्यासाठी; प्रकृती उपमेयाच्या ठिकाणी. वर्णनीय वस्तूचे ठिकाणी तत्तुल्य अन्यधर्माचा (गुणाचा) आरोप करण्यासाठी त्याच्या मूळधर्माचा आणि कवीने बुद्धिविलासाने तकिलेल्या अन्यधर्माचाही निषेध करणे यास शुद्धापन्हुति अलंकार ह्मणतात. जसे, चंद्राचे ठिकाणी हे आकाशगंगेचे कमल आहे असा आरोप करण्याकरितां हा चंद्र नव्हे अशा रीतीने त्याच्या चंद्रत्वरूप मूलधर्माचा निषेध केला आहे. (२) तो धर्मनिषेध जरी कवि वर्णी युक्तिपूर्वक प्रकृतीं। तरि अधिक चमत्कारिक कवि त्यासी हेत्वपन्हुती ह्मणती. ॥३॥ संतापद ह्मणुनि नव्हे इंदु, ह्मणूं रवि तरी निशा आहे, । हा जलधितूनि निघुनी वडवानळ उडुनि उडुगणी राहे ॥ ४॥ मूलधर्माचा निषेध करतांना योग्य कारण (हेतु) दाखविले असतां ती हेत्वपन्हुति होते. येथे चंद्राचे ठिकाणींच वडवानलत्वाचा आरोप करण्याकरितां तीव्रत्व (संतापदायकत्व) आणि रात्रिभवत्व या दोन हेतूंनी (कारणांनी) क्रमाने चंद्रत्व व सूर्यत्व यांचा निषेध केला आहे. (३). कवि वर्णनीयधर्म प्रतिषेध करी जरी दुजा वरती। आरोपाया त्यातें पर्यस्तापन्हुती तिला ह्मणती. ॥ ५ ॥ जो हा गगनीं भासे सकलंक, अपूर्ण तो नव्हे चंद्र । तरि सुंदरीमुखचि विधु होय खरा अधरमधुसुधासांद्र. ॥ ६ ॥ जेथें कवीनें कांही एका पदार्थावरील धर्माचा निषेध अन्य वर्णनीय पदार्थाचे ठिकाणी त्या धर्माचा आरोप करण्याकरितां केलेला असतो तीस पर्यस्तापन्हुति असें ह्मणतात. वरील उदाहरणांत चंद्राचे ठिकाणी चंद्रत्वरूप धर्माचा जो निषेध केला आहे तो वर्णनीय अशा सुंदर स्त्रीच्या मुखावर चंद्रत्वाचा आरोप करण्यासाठी केला आहे. पर्यस्तापन्हुतीचेही दोन भेद आहेत. हेतुपर्यस्तापन्हुति व शुद्धपर्यस्तापन्हुति. धर्माच्या आरोपाचे व निषेधाचे कारण सांगितले असतां हेतुपर्यस्तापन्हुति. (४) शंका येतां प्रकृती भ्रांतिनिवारण कवींद्र जरि करिती । सांगून तत्व तरि ती भ्रांतापन्हुति ह्मणूनि आदरिती. ॥ ७ ॥ ताप करूनि शरीरा कापहि दे साजणी करूं काय । हाय ! ज्वर काय ? सखे ! नाहीं मदन प्रिये ! मधुसहाय. ॥ ८ ॥ वर्णनीय पदार्थाविषयी शंका आली असतां खरी गोष्ट सांगन जेव्हां भ्रांतिनिवारण करितात तेथें भ्रांतापन्हुति अलंकार होतो. वरील उदाहरणांत नायिकेने ताप व कांप देतो अशा रीतीने मदनाचा वृत्तांत सांगितला असतां तो ज्वराकडेही साल लागत असल्यामुळे सरळ बुद्धीच्या सखीने 'सखे! ज्वर काय?' ह्मणून विचारितांच मिय ज्वर नाही, मदन होय' अशा प्रकारे खरे सांगून भ्रांतीचे निवारण केले आहे. ही भ्रांति कधी खरी व कधीं कल्पित असते. (५) इतरांच्या शंकेस्तव सत्यार्थ- निषेध चतुर जरि करिती । तरि ती रसिकाभिमता छेकापन्हति कवींद आत. - रिती. ॥ ९ ॥ सखि ! जल्पना करीतचि चरणीं संलग्न माझिया झाला । अजि काय कांत सं. दरि ! नोहे नूपुर सखे सुदृढ जडला. ॥ १० ॥ कोणी एकाचे कोणापाशी कांहीं एकांत भाषण चालू असलेले दुसऱ्याने ऐकले असतां पूर्वीचे भाषणाचे तात्पर्य वेगळंच वर्जून खऱ्या अर्थ निषेध केला असल्यास छेकापन्हुति अलंकार होतो. जसें कोणी नायिका आपल्या