या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २५३ कथा भुवनमोहिनी, अशि न मोहिनी होय ती; रुळतो.' ॥ (द्रोण० १२.८२), (१०) 'सूत वरुनि लाजे कुरुवरगुरुविरहाकुळा कृशा निपट । अरिसेना काढीना धूलिपटलमिष मुखावरूनि पट.' ॥ (कर्ण० ८.२), (११) 'कर्णाने त्या समयीं सात्यकि बहु पीडिला शरस्तोमें । दिधले टेंकर भेरीनादमि वाणपूरितव्योमें.' ॥ (कर्ण० १९.४). १. प्रास्ताविकः-यांत कवि भगवंताच्या कथेचे मोहकत्व वर्णन करितात. २. भुवनाला (चराचर जगताला) मोह पाडणारी; त्रिभुवनास भुलविणारी. अन्वयार्थःकथा भुवनमोहिनी होय], ती मोहिनी अशी न होय; [ती] असुरधी हरो हिणे किती हो! यती भुलविले; जरि [मोहिनीनें] दक्षहा विमोहिला [तरि] नव्हे न ह्मणवे; [परंतु] [महादेवानें] शिरी प्रिया बसविली; [तेव्हां] हा मुनिपथीं कसा दक्ष ? प्रथमचरणार्थः-भगवत्कथा आपल्या मोहकत्वाने सर्व त्रिभुवनास वश करिते. समुद्रमंथनसमयीं अमृताचा विभाग करणारी ती सुप्रसिद्ध मोहिनी ह्या जगन्मोहिनी भगवत्कथेसारखी मोहक नव्हती. ३. कथासंदर्भ:-समुद्रमंथन होऊन त्यांतून अमृत निघाले असता त्याविषयीं देवदैत्यांत भांडण लागले व दैत्यांनी बळाने अमृतकुंभ आपणाजवळ घेतला. तेव्हां देवांनी महाविष्णूचे स्तवन केले. . त्यावरून देवांना अमृत प्राप्त करून देण्याकरितां भगवान् विष्णूने मोहिनीरूप धारण केले व दैत्यांस मोहित करून त्यांच्यापासून अमृताची वाटणी करण्याकरितां अमृतकुंभ आपल्यापाशी घेतला. मोहिनीने देवदैत्यांस रांगेनें वसावयास सांगून आपण प्रथम देवांना अमृत वाढावयास लागली. दैत्यांपैकी राहुकेतूंना मोहि. नीच्या कपटनाटकाचा संशय येऊन ते देवांची रूपे घेऊन देवांच्या पंक्तीत बसले. मोहिनीने सर्व देवांना वाढून ती या देवरूपी दैत्यांकडे येऊन त्यांनाही तिनें अमृत वाढिले व ते त्यांच्या कंठगत होतें न होते तोंच सूर्यचंद्रांच्या खुणांवरून हे दैत्य आहेत असे ओळखून तिने खड्गाने त्यांची शिरें छेदिली. तेव्हां दैत्यांना हे सर्व कपट असून मोहिनीने त्यांना फसविलें असें समजून ते देवांवर धांवले. त्या वेळेस मोहिनीने देवांचे रक्षण करून दैत्यांचा संहार केला. भगवान् विष्णूने मोहिनीरूप धारण केले, त्या वेळेस त्या मोहिनीचे दैदीप्यमान सुंदर रूप पाहन सर्व देव चकित झाले. त्यांत भगवान् शंकर तर तिच्या अलौकिक रूपाने अतिशय मोहित झाले अशी कथा आहे. समुद्रमंथन व मोहिनी अवतार यांतील रूपकः-देवदैत्यांनी स. मुद्रमंथन करून चतुर्दश रने काढली. त्यांत शेवटीं अमृत निघाले. तिच्या करितां देवयान भांडण लागले. तेव्हां विष्णूने मोहिनी अवतार धरून दैत्यांना फसवून देवांना अमृत पाजिलें या कथेत गूढरूपक आहे. भगवंताची माया हीच मोहिनी. माया ही सर्वांस भुलविते ह्मणून तिला मोहिनी ह्मणणे फार योग्य आहे. माया किंवा 'प्रकृति' ही 'पुरुषा'चे अर्धांग व ती परमेश्वराच्या स्वाधीन आहे. सत्वगुणी मनुष्ये हे देव व तमोगुणी मनुष्ये हेच दैत्य. देव परमे. श्वराला अनन्य शरण होते ह्मणून ते मायेला भुलले नाहीत पण तमोगुणी ह्मणूनच अज्ञानी दैत्य मात्र तिला पूर्ण वश झाले. केवळ सत्वगुणाच्या व ज्ञानाच्या जोरावर मायामोहांतन सुटका होत नाही हेच महादेव (मोठा ज्ञानी) मायेला भुलले यांतील तात्पर्य. पूर्णज्ञानी मनुष्य देखील सात्विक अहंकाराने बद्ध झाला असतां जर मायापाशांत पडतो व अमृतास मकतो तर