या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५८ मोरोपंतकृत अभीष्ट वरितात, 'जे तव कथेसि विश्वासती; भली असुरवंचनी, श्रुत असेचि विश्वास ती;। कथा कशि सखी तिची ? ठंकवुनी हरी संचितें, तरी अमृत दे, असें संदय, दाखवी वंचितें. ॥ १०५ न १.प्रास्ताविकः-मोहिनीपेक्षा कथेची योग्यता मोठी आहे असें दर्शवून त्यांच्या वंचनेत (फसवण्यांत) महदंतर आहे असें वर्णित होत्साते कवि म्हणतात. अन्वयार्थः-'जे (लोक) तव (तुझ्या) कथेसि (कथेला, कथेवर) विश्वासती (विश्वासतात, विश्वास ठेवतात) [ते] अभीष्ट (इच्छित मनोरथ, मनकामना) वरितात, (प्राप्त करून घेतात); मोहिनी] भली (पक्की) असुरवंचनी (दैत्यांस ठकविणारी) ह्याप्रमाणे] ती विश्वास (जगास त्रिभुवनास) श्रुत असेचि (ठाऊक आहेच); कथा तिची (मोहिनीची) सखी (सोबतीण) कशी (कशाची)? [भगवत्कथा] ठकवुनी (फसवून) संचितें (संचितकर्मे, सांचविलेली पापपुण्यांची कम) हरी (हरण करिते, त्या कर्माचा नाश करून त्यांस संसारदुःखापासून सोडविते), तरी (तथापि) अमृत (मोक्ष) दे (देते), सदय (दयालु पुरुष) वंचितें (वंचना करून, फसवून) असें (ह्या प्रकारचे कल्याण) दाखवी (दाखवितो). प्रथमार्धाचा अर्थ:-जे भगवत्कथेवर आपल्या उद्धाराविषयी विश्वास ठेवितात त्यांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. पण तशी गोष्ट मोहिनीची नाही. मोहिनीने आपल्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणाऱ्या दैत्यांस फसविले; ही गोष्ट त्रिभुवनांतील सर्व लोकांस माहित आहेच. २. विश्वासतात, विश्वास ठेवितात. ३. दैत्यांस फसविणारी; त्यांना अमृताची आशा लावून ते न देणारी. ४. जगास, त्रिभुवनास. ५. त्या मोहिनीची. ६. फसवून. ७. (मोहिनीपक्षी) संचित धनें, (कथापक्षी) पूर्वजन्मार्जित संचितकम. द्वितीयार्धाचा अर्थः-आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे मनोरथ पूर्ण करणारी भगवकथा व विश्वास दाखवून फसविणारी मोहिनी या दोघींची योग्यता सारखीच कशी बरे होईल? होणार नाही. म्हणून मोहिनीपेक्षां भगवत्कथा निःसंशय श्रेष्ठ, आतां भगवत्कथा ही आपल्या भजकांस एका प्रकारे फसविते खरी, पण तिच्या फसविण्यांत व मोहिनीच्या फसविण्यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे. भगवत्कथा देखील आपल्या भजकांची पूर्वजन्मार्जित कर्मे त्यांना कळू न देतां त्यांच्यापासन हिरावन घेऊन त्यांचा नाश करिते, पण इतके केले तरी ती त्यांना अमृत (मोक्ष देते. मोहिनी आपल्या भजकांस ठकवून त्यांची संचितें (संचित धन) हरण करिते, पण ती त्यांना अमृत (सधा) दत नाही. यावरून भगवत्कथा जरी आपल्या भजकांस वरकर विते तरी अशा रीतीने ती त्यांचे कल्याणच करिते. यावरून कवि एक साधारण नियम सांगतात. दयाळु पुरुष दुसन्याला फसवून सुद्धा त्याचे कल्याणच करितो म्हणजे दुसऱ्याचे कल्याण करण्याकरितांच दयावंत पुरुषाला फसवणूक करावी लागते. ८. सुधा, मोक्ष. मोहिनीपक्षीं सुधा; कथापक्षी मोक्ष. ९. दयायुक्त, दयालु, कृपावंत.