या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५९ केकावलि. कराणा नि अहाज सला करा श्रवण येवढें, अपटु लोक हांसो मला; - __ अहो! जरि गिळावया प्रियकुमार घे सोमला, । 'सदय...वंचितें' यांतील भावार्थ:-ज्यांत लोकांचे हित आहे परंतु ते त्यांना दिसत नसून उलट अहित वाटते अशा ठिकाणी दयालु पुरुष दुसऱ्याचे वास्तविक हित करण्याकरितां त्याला फसवावे लागले तरी फसवितो. अशा प्रकारचे फसविणे अपायकारक नसून उपायकारकच आहे. म्हणून कथा जरी कधी कधीं भगवज्जनाला फसविते तरी तसे करण्यांत ती त्याचे हितच करिते. 'ठकवुनी...अमृत दे, असे सदय दाखवी वंचितें' यांतील उत्तरपदाचा कोणी निराळाच अर्थ करितात. तो असाः- पूर्वजन्मार्जित जें जें वाईट प्राप्त झाले असते तें मनुष्यांना हितकारकच आहे असे वाटत असते; ते त्यांना सोडावेसे वाटत नाही. कथा जनांना फसवून ती संचितफळे हरण करून मोक्ष देते, म्हणजे चांगले देऊन वाईट काढून घेते. पण मोहिनीने काय केले, तर सुंदर रूप धारण करून 'आपण मोठी दयाळू' असें वरवर दाखविलें, व नांवाला अमृत देऊन त्याचेच हरण केलें. सारांश मोहिनी फसवून सदयपणा वरवर मात्र दाखविते, पण आंतून गळा कापते.” (सुलभ-केकावली.) १०. वंचनेनें. यांत मोहिनीपेक्षां (उपमानापेक्षां) कथेचे ( उपसेयाचे ) श्रेष्ठत्व ( आधिक्य ) वर्णिले आहे म्हणून येथे व्यतिरेक अलंकार झाला. किंवा मोहिनी आणि कथा यांच्या परस्परविरुद्ध क्रियांचा उपन्यास केला आहे म्हणून येथे 'विरुद्धगुणन्यास' (Contrast) अलंकार आहे असेंही म्हणतां येईल. १. प्रास्ताविकः-जो दुसन्याला फसवितो त्याला कृपाळु कसे म्हणावे अशी मागील केकेवर कोणी आशंका घेईल तिचे समाधान करीत होत्साते कवि म्हणतात. अन्वयः-येवढे श्रवण करा, मला अपटु (अडाणी) लोक हांसो (हंसेल तर हंसो); अहो!! जरि प्रियकुमार गिळावया सोमला घे [तरि जी माय तयासि ठकवूनि (फसवून) बहुत शर्करा दे (देते), तिला जी! (अजी!) स्वशिशुवंचनें (आपल्या मुलाच्या फसविण्याने) अदयता शिवे काय ? प्रथमचरणार्थः-मी बोलतों तें नीट लक्ष्य देऊन ऐका व मग वाटेल तर माझ्या बोलण्यास दोष द्या. भजकांस फसविणाऱ्या कथेला मी हितकारी म्हटले म्हणून अडाणी पुरुष मला खुशाल हांसो. त्याची मला परवा नाही. समंजस पुरुष तरी मला हंसणार नाही. २. अकुशल, अडाणी, असमंजस, अज्ञानी. ३. हांसोत. ४. आवडता मुलगा, लाडका पुत्र. 'अहो! जरि...जी!' ह्या कवीच्या भाषणाचा अर्थः-अहो! कल्पना करा की एखाद्या आईचा लाडका मुलगा आहे, त्याने साखरेसारखा दिसणारा सोमलाचा खडा हातांत घेतला व साखर समजून तो मुलगा तो खडा आतां खाणार; तेव्हां अशा वेळी त्या मुलाची आई त्या मुलाच्या हातावर पुष्कळशी साखर देऊन त्याला फसवून युक्तीने त्याच्या हातांतून तो सोमलाचा खडा काढून घेते. तर अशा रीतीने ती आपल्या मुलास फसविते म्हणून त्या मातेला निर्दय म्हणावें काय? अर्थात म्हन